Author: अनंत पांगारकर

संगमनेर, प्रतिनिधी-  संगमनेर पंचायत समितीच्या कार्यालयात एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मानधन मिळवून देण्याच्या बहाण्याने एका अभियान व्यवस्थापकानेच महिला कर्मचाऱ्याचा गैरफायदा घेऊन तिचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कर्मचारी ही एका महिला बचत गटात समुदाय संसाधन व्यक्ती (CRP) म्हणून कार्यरत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचे मानधन रखडलेले होते, त्यासाठी त्या सातत्याने पंचायत समिती कार्यालयात पाठपुरावा करत होत्या. याच संदर्भात २३ मार्च रोजी दुपारी त्या पंचायत समिती कार्यालयात गेल्या होत्या. तिथे भेटल्यावर त्यांनी अभियान व्यवस्थापक नंदलाल पोपटराव कोकाटे यांना आपल्या रखडलेल्या मानधनाबाबत विचारणा…

Read More

दैनिक राशिभविष्य: २४ मार्च २०२६ मेष: आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर येऊ शकतात, ज्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक कष्ट घ्यावे लागतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेताना घाई टाळावी आणि जोडीदारासोबतचे मतभेद संवादाने मिटवण्याचा प्रयत्न करावा. वृषभ: आजचा काळ प्रगतीकारक आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाचे कौतुक मिळेल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. व्यवसायामध्ये नवीन गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर आजचा दिवस योग्य आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमुळे समाधान मिळेल. प्रकृतीची थोडी काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. मिथुन:…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  इराण आणि इस्राईल यांच्यात सुरू असलेल्या युद्धसदृश परिस्थितीचे पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटताना दिसत आहेत. संगमनेर शहरासह परिसरातील विविध पेट्रोल पंपांवर आज सकाळपासूनच वाहनधारकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान अचानक पेट्रोल पंपावर उसळलेल्या वाहनधारकांच्या गर्दीमुळे खरोखर पेट्रोलचे त्यांचाही निर्माण झाली का याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. या संदर्भात अद्याप प्रशासनाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही अथवा माहिती देण्यात आली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावामुळे येत्या काळात कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची किंवा इंधनाचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पेट्रोल पंपांवर धाव घेतली आहे. त्यामुळे संगमनेर शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या भल्या मोठ्या…

Read More

संगमनेर | प्रतिनिधी दैनिक ‘प्रवरातीर’ परिवारातील मुख्य आधारस्तंभ आणि संस्थापक संपादक शिवपालसिंह ठाकूर यांच्या पत्नी व संपादक धीरज ठाकूर यांच्या मातोश्री अनिता शिवपालसिंह ठाकूर (वय ५५) यांचे आज सोमवारी (२३ मार्च) पहाटे चार वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगमनेर शहरासह माध्यम क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिता ठाकूर या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने ठाकूर परिवाराचा मुख्य आधार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. श्रीमती अनिता ठाकूर या अत्यंत मनमिळावू, प्रेमळ आणि सात्विक स्वभावाच्या होत्या. ‘प्रवरातीर’च्या जडणघडणीत आणि…

Read More

दैनिक राशिभविष्य: २३ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदारी अंगावर पडण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक बाजू भक्कम राहील मात्र अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता असली तरी संवादाने प्रश्न सुटू शकतात. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगतीकारक राहील. मिथुन आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील. घाईघाईने घेतलेले निर्णय भविष्यात त्रासदायक ठरू…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- कायदे, नियम आणि नीतिमत्ता यांचे पालन करणारा प्रत्येक जागरूक नागरिक हीच देशाची खरी ताकद असून, अशा नागरिकांच्या संघशक्तीच्या बळावरच भारत आज जागतिक महाशक्ती म्हणून उदयाला येत आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते आणि चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले. संगमनेर येथील राजस्थान युवक मंडळाच्या वतीने, मालपाणी उद्योग समूहाचे अध्वर्यु स्वर्गीय माधवलालजी मालपाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित ‘मंथन’ व्याख्यानमालेचा समारोप ‘विकसित भारत आणि आपण सगळेच’ या विषयाने झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. धर्माधिकारी यांनी आपल्या व्याख्यानात राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकताना सांगितले की, देशालाच दैवत मानून प्रामाणिकपणे कार्य करणारे शेतकरी, कामगार, शिक्षक, डॉक्टर आणि अभियंते हे घटक…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- नाशिक येथे हजारो भाविकांची आर्थिक, शारीरिक आणि मानसिक लूट करणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या कृत्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणि त्यातील राजकीय लागेबांधे पाहता, खरात याच्यासह त्याला पाठबळ देणाऱ्या बड्या राजकीय नेत्यांची व प्रशासकीय घटकांची सखोल चौकशी करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. पीडित नागरिकांना तातडीने न्याय व आर्थिक भरपाई देण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणीही पक्षाने लावून धरली आहे. या प्रकरणावर भाष्य करताना माकपने म्हटले आहे…

Read More

संगमनेर | प्रतिनिधी संगमनेर तालुक्यात गुरुवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आलेल्या अवकाळी पावसाने आणि पठार भागातील काही गावांमध्ये झालेल्या जोरदार गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. या नैसर्गिक आपत्तीत जांबुत खुर्द आणि जांबुत बुद्रुक या दोन गावांना सर्वाधिक फटका बसला असून, सुमारे १२५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी दिली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून संगमनेर तालुक्याच्या वातावरणात सातत्याने बदल होत होते. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शहर आणि तालुक्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. कोकणगाव, साकूर, घारगाव, जांबुत यांसह अनेक गावांत पाऊस झाला, मात्र पठार भागातील काही ठराविक पट्ट्यात पावसासोबतच मोठी गारपीट…

Read More

दैनिक राशिभविष्य: २२ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर प्रसन्न होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत खेळीमेळीचे वातावरण राहील. आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे, विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यापारामध्ये वृद्धी होईल आणि नवीन गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. मानसिक शांततेसाठी थोडा वेळ एकांतात घालवणे फायदेशीर ठरेल. मिथुन आजचा दिवस संमिश्र फलदायी राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा जवळच्या व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. नोकरीमध्ये कामाचा ताण जाणवेल,…

Read More

संगमनेर | मोहसीन शेख  तालुक्यातील वडगाव पान येथे तीन दिवसांपूर्वी एका बारा वर्षीय शाळकरी मुलीवर झालेल्या अमानुष ॲसिड हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा विविध स्तरांतून तीव्र निषेध केला जात असतानाच, संगमनेर शहरातील मुस्लिम समाजाने रमजान ईदच्या निमित्ताने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. मुस्लिम बांधवांनी आज पीडित मुलीच्या निवासस्थानी जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना मदतीचा हात दिला. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे पीडित कुटुंब सध्या मोठ्या मानसिक धक्क्यात आहे. अशा कठीण काळात त्यांना धीर देण्यासाठी संगमनेर शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पुढाकार घेतला. ईदचा सण असतानाही त्याचे औचित्य साधत मुस्लिम समाजातील प्रतिनिधींनी पीडित…

Read More