Author: अनंत पांगारकर
खतांची लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांना नोटीस पाठवल्याची कृषिमंत्र्यांची सभागृहात माहिती महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : जर बियाणे निर्मिती कंपनीच्या बियाण्यातच दोष असेल, शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असेल तर त्यात कंपनीला दोषी ठरवायचे सोडून गावात असलेल्या छोट्या विक्रेत्यांना दोषी धरण्याचे काय कारण? ज्याप्रमाणे मेडिकलमध्ये आपण औषध निर्मिती कंपनीवर कारवाई करतो मेडिकल विक्रेत्यावर नाही, तसाच हा प्रकार आहे. मात्र आपण कृषी सेवा केंद्र चालकांवरच गुन्हे दाखल करता, असे प्रश्न ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केले. प्रश्नोत्तराच्या तासात थोरात यांनी खते व बी बियाण्यांच्या विषयावरून सरकारला घेरले. थोरात म्हणाले, बीटी बियान्याशी संबंधित कायदा मी कृषिमंत्री असताना झाला. या माध्यमातून आम्ही बियाण्यांच्या किमतीवर…
महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली – कोळसा घोटाळा प्रकरणात दिल्लीच्या न्यायालयाने काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र, आणखी एक दोषी मनोज कुमार जयस्वाल यांना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असल्याची बातमी समोर येत आहे. 13 जुलैला दिल्लीतल्या विशेष न्यायालयाने त्यांना या प्रकरणात दोषी ठरवलं होतं. यासंदर्भात न्यायालयाने काही वेळांपूर्वीच या संबंधातील शिक्षेचा निर्णय दिला आहे. राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, मुलगा देवेंद्र दर्डा, कोळसा विभागाचे माजी सचिव एच. सी. गुप्ता, के. एस. क्रोफा, के. सी. सामरीया, मनोजकुमार जयस्वाल इत्यादींचा या प्रकरणात आरोपींमध्ये समावेश होता. यात दर्डा पिता-पुत्रासह जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल या…
इंस्टाग्राम अँपवर जुळले होते सूत बळजबरीने केलेल्या लग्नाला आरोपीच्या नातेवाईकांची होती उपस्थिती महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अल्पवयीन शालेय मुलीला पळवून नेत संगमनेरातील कॅफे सेंटरमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता घारगावच्या पठार भागात एका महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करत पहिले लग्न झालेले असताना ते लपवून ठेवत तिच्याशी विवाह करून तिच्यावर लग्नाअगोदर आणि लग्नानंतरही बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून केशव बबन काळे याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 363, 366, 376(2N) 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती मिळते. गेल्या तीन-चार दिवसातील ही दुसरी घटना…
आज तुम्ही तिकडे जाऊन बसला नाहीतर तुम्ही माझ्याबरोबर या विषयावर भांडला असतात… मंत्री भुजबळ आणि भुसे यांना थोरात यांनी काढला चिमटा मंत्र्यांकडून वाहतूक सुरळीत करण्याची ग्वाही… भविष्यात पायाभूत प्रकल्प निर्माण करत असताना पर्यायी व्यवस्था करण्याच्या अध्यक्षांकडून मंत्र्यांना सूचना. महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – नाशिक मुंबई रस्ता वाहतूक कोंडीचा सापळा झाला आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या प्रश्नावर मंत्रिमहोदय सांगतात ऑगस्ट 2024 पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, हे अत्यंत असंवेदनशील आणि चुकीचे उत्तर आहे, नाशिक-मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर तातडीने मार्ग काढा, अशा स्पष्ट शब्दात ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात मंत्र्यांना सुनावले. आमदार…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राज्यात दररोज मोठ्या संख्येने मुली आणि महिला बेपत्ता होत आहेत. “राज्यातल्या महिला झाल्या बेपत्ता, सरकारला नाही पत्ता” अशी सध्या स्थिती असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी गेल्या पाच महिन्यात म्हणजेच जानेवारी ते मे राज्यात किती मुली आणि महिला बेपत्ता झाल्या याबाबत गेल्या आठवड्यात सभागृहात धक्कादायक माहिती दिली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा सातवा दिवस आहे. राज्यातून मुली आणि महिला मोठ्या संख्येने बेपत्ता होत आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी आज सभागृहात सांगितले की, जानेवारी 23 मे 23 या पाच महिन्याच्या कालावधीत राज्यातून 19533 मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. आता मात्र…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. महिलांवरील अत्याचारामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरल्याने मणिपूर हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी संगमनेरमध्ये बुधवारी (ता. 26 जुलै) महिलांचा निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. संगमनेर बस स्थानकापासून बुधवारी दुपारी तीन वाजता नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. मणिपूरमधील महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असून या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. गुन्हेगारीला जात, धर्म, पंथ काही नसून तो गुन्हेगार मानवतेचा दुश्मन असतो. मणिपूरमध्ये सध्या हिंसाचाराबरोबरच महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहे. भारताच्या बहुतांशी भागात…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – मणिपूर हिंसाचाराच्या विरोधात देशभर शांततावादी नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर मध्ये देखील शांतता प्रिय स्त्री-पुरुष नागरिकांचा शांती मोर्चा येत्या शुक्रवारी (ता.28 जुलै) आयोजित केल्याची माहिती समाजवादी जन परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. निशा शिवूरकर यांनी दिली. शिवूरकर यांनी म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून मणिपूर अशांत आहे. केंद्र आणि राज्य सरकार मणिपूरमध्ये शांतता निर्माण करू शकलेले नाही. मणिपूर मधील हिंसाचार आणि तेथे स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराने देशातील संवेदनाशील नागरिक अस्वस्थ झाले आहेत. सरकारने मणिपूर मधील इंटरनेट सेवा बंद केल्याने दहशतीत वाढ झाली आहे. सुमारे 60 हजारावर नागरिक बेघर झाले आहे. दीडशेवर स्त्री-पुरुष मारले गेले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – गुणवत्तापूर्ण शिक्षणाने देशात अग्रगण्य असलेल्या अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या नवीन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयास मान्यता मिळाली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे व नोडल ऑफिसर प्रा. जी. बी बाचकर यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना अनिल शिंदे म्हणाले, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने मागील 40 वर्षात गुणवत्तेने देशात आपला नावलौकिक निर्माण केला. या संस्थेच्या सर्व शाखा आयएसओ मानांकित आहे. सर्व आधुनिक सुविधांमुळे अमृतवाहिनी हे शिक्षणाचे केंद्र बनले आहे. या संस्थेच्या नवीन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयास नव्याने महात्मा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – नशापाणी करण्यासाठी सार्वजनिक जागांचा वापर करणाऱ्या आणि सामाजिक स्वास्थ धोक्यात आणणाऱ्या नशेखोरांवर पोलीस प्रशासनाने कारवाईचे पाऊल टाकले आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करत नशेखोरांवर गुन्हे दाखल केले आहे. पोलिसांनी अनपेक्षित केलेल्या या कारवाईमुळे नशेखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेर शहरातील मोकळ्या जागा, मैदाने, नगरपरिषदेने निर्माण केलेले विविध गार्डन, प्रवरा नदीपात्र, राज हॉटेल ते स्वामी समर्थ मंदिरा दरम्यानचा रस्ता आधी विविध ठिकाणचा वापर दारुडे, गर्दुल्ले, गांजाडी लोक सर्रासपणे करत असल्याने सामाजिक स्वास्थ्याला धोका निर्माण होण्याची चिन्हे होती. पोलिसांकडे या संदर्भात सातत्याने येत असलेल्या तक्रारीची गंभीर दाखल संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी घेतली. नशेखोरांमुळे परिसरातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – बनावट कागदपत्रांच्या आधारे राज्यात 14 लाख 28 हजार शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान’ योजनेवर डल्ला मारला असल्याचे समोर आले आहे. यातून या शेतकऱ्यांनी 1754 कोटी रुपयांची केंद्राची मदत लाटली आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्याकडून या रकमेची वसुली सुरू केली असून आत्तापर्यंत एक लाख शेतकऱ्यांकडून 93 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या धरतीवर राज्य सरकार देखील शेतकऱ्यांसाठी येत्या ऑगस्ट महिन्यापासून ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजना लागू करण्यापूर्वीच हा घोटाळा समोर आला आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. ऑगस्ट पासून राज्य सरकार देखील…
