Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शहरातील आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संगमनेरच्या प्रांताधिकार्यांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध एक मोठी कारवाई केली आहे. पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्फत संगमनेर उपविभागातील गुन्हेगारांविरुद्ध पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी हा निर्णय दिला. त्यांनी उपविभागातील एकूण ८ सराईत गुन्हेगारांचा गुन्हेगारी आलेख तपासून त्यांना अहिल्यानगर जिल्हा, तसेच शेजारील जिल्ह्यांच्या सीमांमधून ६ महिने ते १ वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार (हद्दपार) करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांच्या गोटात खळबळ उडाली असून नागरिकांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये ही कठोर कारवाई करण्यात…
पुणे : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणात अखेर आज पुण्याच्या विशेष न्यायालयाने ऐतिहासिक आणि सर्वात मोठा निकाल दिला आहे. ६५ वर्षीय नराधम दोषी भीमराव प्रभाकर कांबळे याला विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी मरेपर्यंत फाशीची कठोर शिक्षा सुनावली आहे. गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन महिन्यांच्या आत संपूर्ण सुनावणी पूर्ण करून निकाल देणारा हा राज्यातील आजवरचा सर्वात जलद गतीने निकाली लागलेला पहिलाच खटला ठरला आहे. महाराष्ट्र दिनी, म्हणजेच १ मे रोजी नसरापूर येथे ही काळीमा फासणारी घटना घडली होती, ज्यानंतर अख्ख्या राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: आदिवासी बांधवांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि समाजाला नवी दिशा देण्यासाठी ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दिनांक १ जुलै) कोळवाडे येथे सकाळी १० वाजता भव्य आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गोरगरीब आणि आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कटिबद्ध असणारे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शबरी माता संघटना व सकल आदिवासी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने कोळवाडे येथील जय हिंद आदिवासी आश्रम शाळा परिसरात हा मेळावा पार पडणार आहे. या महत्त्वपूर्ण मेळाव्याला महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे आणि संगमनेर तालुका युवक…
संगमनेर: नाशिक-पुणे रेल्वे मार्गाला मंजुरी मिळालेली असतानाही केंद्र व राज्य शासन आणि लोकप्रतिनिधींनी जनतेची सातत्याने दिशाभूल केली आहे. हा महत्त्वपूर्ण रेल्वे मार्ग अचानक का रद्द करण्यात आला, याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या कामात झालेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला पाहिजे, अशी आक्रमक मागणी घारगाव येथे आयोजित बैठकीत करण्यात आली. नाशिक-पुणे रेल्वे मार्ग पुन्हा मंजूर होईपर्यंत आता कोणत्याही राजकीय पक्षाचा आडोसा न घेता, थेट राजकारणविरहीत तीव्र जन-आंदोलन उभारण्याचा ठाम निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. दरम्यान, या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी पूर्णपणे पाठ फिरवल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, हा परिसरात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेरचे युवा विमा अभिकर्ता आदित्य सुनील कडलग यांची सिंगापूर येथे होणाऱ्या जागतिक विमा परिषदेसाठी निवड झाली असून, त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचा ‘सीओटी’ आणि ‘एमडीआरटी’ सन्मान पटकावला आहे. टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी असलेल्या आदित्य कडलग यांनी केवळ पाच महिन्यांत यंदाचे ‘एमडीआरटी’ (Million Dollar Round Table) मानांकन मिळवून आपल्या यशाचे सातत्य राखले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे सिंगापूर येथे २२ ते २५ ऑगस्ट २०२७ दरम्यान आयोजित होणाऱ्या जागतिक विमा परिषदेत त्यांना सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे. आदित्य यांनी २०२३ मध्ये विमा क्षेत्रात पदार्पण करताच पहिल्याच वर्षी एमडीआरटीचा बहुमान मिळवला होता, तर २०२४ मध्ये एकाच वर्षात सलग…
आजचे राशिभविष्य मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि सकारात्मक असणार आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी वेळ उत्तम असून कार्यालयातील वरिष्ठ तुमच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करतील. व्यावसायिक क्षेत्रात फायदेशीर करार होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक बाजू भक्कम राहील, परंतु गुंतवणुकीचे निर्णय घेताना घाईगडबड करणे टाळावे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. वृषभ : गेल्या काही दिवसांपासून रखडलेली महत्त्वाची कामे आज पूर्णत्वास जातील. व्यापार आणि व्यवसायात धनलाभाचे उत्तम योग निर्माण होत आहेत. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना विशेष यश लाभेल. आरोग्याच्या दृष्टीने आज थोडी काळजी घेणे आवश्यक आहे; वाढत्या उष्णतेमुळे शरीरात थकवा किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. आहारावर नियंत्रण ठेवा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शहरातील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या धडक मोहिमेत पोलिसांनी तीन आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल १५ लाख ८५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान अन्य सहा आरोपी पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून फरार झाले आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या विशेष आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गस्त घालत होते. याच दरम्यान, जमजम कॉलनीतील सरकार लॉन्सजवळील एका मोकळ्या जागेत गोवंशीय जनावरांची बेकायदेशीरपणे कत्तल केली जात असल्याची आणि…
भाऊ चासकर – NEET पेपरफुटी, त्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या, फेरपरीक्षेमुळे विद्यार्थ्यांना व पालकांना सहन कराव्या लागलेल्या गैरसोयी यांच्या बातम्यांची शाई वाळत नाही तोच पेपरफुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महाटीईटी परीक्षा रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली आहे. महाराष्ट्र परीक्षा परिषदेचा कारभार यापूर्वीही वादग्रस्त राहिला आहे. पेपरफुटी, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराची अनेक उदाहरणे राज्याने पाहिली आहेत. काही अधिकाऱ्यांना तुरुंगातही जावे लागले आहे. तरीही त्यातून परीक्षा परिषदेने कोणताही धडा शिकलेला नाही, हे दुर्दैवी आहे. शालेय कामकाज, दैनंदिन अध्यापन, विविध उपक्रमांचे फोटो व माहिती अपलोड करणे, असंख्य लिंक भरणे आणि तत्सम इतर अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखाली दबलेल्या शिक्षकांनी प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळत, विविध आजारांना सामोरे जात…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर जवळील कासारा दुमाला येथील भोलेनाथ दुध उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेतील सर्वच मुलांना स्कूल बॅग, वह्या आणि पेन यांचे वाटप करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत झाला होता. या सामाजिक उपक्रमासाठी सह्याद्री ॲग्रोव्हेटचे संचालक नितीन हासे यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे चेअरमन राजेश गुंजाळ यांनी संस्थेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा सादर केला. संस्थेच्या स्थापनेला ४४ वर्षे पूर्ण झाली असून, संस्थेची वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे सहा कोटी रुपयांवर पोहोचली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच संस्थेचे दैनंदिन दूध संकलन सुमारे ४५००…
अकोले: चांगले शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मुख्य पाया असून, शिक्षकांचे समर्पित योगदान आणि त्याला लाभलेली ग्रामस्थांची भक्कम साथ यांमुळेच शिंदेवाडी शाळा खऱ्या अर्थाने समृद्ध झाली आहे, असे गौरवोद्गार विस्तार अधिकारी अनिल गायकवाड यांनी काढले. तालुक्यातील गणोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी येथे श्री व श्रीमती रामनारायणजी बुब ट्रस्टच्या वतीने शाळेसाठी अत्याधुनिक इंटरऍक्टिव्ह डिजिटल बोर्ड व ३५ विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. तसेच अनिकेत बॅटरी हाऊसकडून शाळेला इन्व्हर्टर बॅटरी देणगी म्हणून देण्यात आली. या शैक्षणिक साहित्याच्या लोकार्पण व वाटप सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून अनिल गायकवाड बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच संतोष आंबरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून…
