Author: अनंत पांगारकर
मुंबई, दि. २० मार्च २०२५: परभणीतील आंबेडकरी चळवळीतील तरुण सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप असतानाही, पोलिसांनी ‘आकस्मिक मृत्यू’ असा अहवाल देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. आता न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालातही मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला, हे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. तरीही फडणवीस सरकार दोषी पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करत नाही, हे दुर्दैवी आहे. परभणीतील घटना अत्यंत गंभीर आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे. संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर…
महाराष्ट्र संवाद न्यूज – सातारा, दि. २१ मार्च राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. महिलेने गोरे यांच्याकडे हे प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी एक कोटी रुपये स्वीकारताना तिला सातारा पोलिसांनी अटक केली. काही दिवसांपूर्वी या महिलेने माध्यमांसमोर येत जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. महिलेने गोरे यांच्यावर नग्न फोटो पाठवल्याचा आरोप केला होता. हा मुद्दा विधानसभेतही गाजला होता. आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. आरोप करणाऱ्या महिलेलाच खंडणी प्रकरणात अटक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.…
अहिल्यानगर, दि. २१ मार्च – अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याच्या घृणास्पद गुन्ह्यात, विशेष न्यायालयाने आरोपी अजय उर्फ विनायक राजेंद्र गर्जे (२०, खडांबे खुर्द, राहुरी, अहिल्यानगर) याला २० वर्षे सक्तमजुरीची कठोर शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय, विविध कलमांनुसार त्याला दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील मनीषा केळगंद्रे-शिंदे यांनी दिली. विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी मोरे यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील मनीषा केळगंद्रे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. खटल्यात एकूण १० साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. ही धक्कादायक घटना १७ डिसेंबर २०२२ रोजी घडली, त्यावेळी पीडित मुलगी १२ वर्षे २ महिन्यांची होती. आरोपी अजय उर्फ विनायक…
संगमनेर, दि. २१ मार्च – प्रतिनिधी संगमनेर खुर्द येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोला काल (गुरुवारी) सायंकाळी भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे मोठे साम्राज्य पसरले होते. यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत होता, तसेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता. संगमनेर खुर्द येथे नगरपालिकेचा कंपोस्ट डेपो आहे. संगमनेर शहर व उपनगरातील सर्व कचरा या डेपोत आणून टाकला जातो. तेथे या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. गेल्या काही दिवसांपासून या डेपोत मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. या डेपोला काल सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले आणि धुराचे लोट परिसरात पसरले. आगीची माहिती मिळताच संगमनेर नगरपालिकेच्या…
मुंबई दि. २१ मार्च – विशेष प्रतिनिधी गोहत्या करणाऱ्यांवर यापुढे थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात येईल, असा सक्त इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील ससाणे नगर येथे फटाके फोडण्यावरून दोन गटात झालेल्या हिंसक घटनेच्या पार्श्वभूमीवर, अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. या घटनेत कुरेशी आणि ससाणे कुटुंबात झालेल्या हाणामारीत ससाणे कुटुंबातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. जगताप यांनी आरोप केला की, कुरेशी कुटुंब हे गो तस्करीमध्ये गुंतलेले असून, त्यांच्या दहशतीमुळे पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. तसेच, आरोपीला अटक होऊनही लगेच जामीन मिळाला. जामिनावर सुटल्यानंतर त्याने…
मुंबई दि. २१ मार्च – विशेष प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधान परिषद आणि विधानसभा सभागृहांमध्ये सभापती आणि विधानसभा अध्यक्ष पक्षपाती आणि एकांगी भूमिका घेत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. गुरुवारी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. विधानसभेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात संसदीय परंपरांचे पालन व्हावे, नियमबाह्य कामकाज होऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षांनी राज्यपालांकडे केली आहे. विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने सभापती आणि अध्यक्षांच्या मनमानी आणि एकांगी कामकाजाची तक्रार राज्यपालांकडे केली. विरोधी पक्ष हा संसदीय प्रणालीतील महत्त्वाचा घटक असून, त्यांची भूमिका सरकारविरोधी नसून सरकारचे निर्णय आणि धोरणांवर अंकुश ठेवणारी आहे. आवश्यक तेथे टीका करणे आणि पर्यायी…
पुणे, दि. २० मार्च – हिंजवडी येथे एका धावत्या मिनी बसने अचानक पेट घेतल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. या जळीत कांडात व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सुरुवातीला हा अपघात असल्याचे सांगण्यात आले, मात्र आता पोलिसांनी केलेल्या तपासात चालकानेच कट रचून या चौघांना जाळल्याचे उघड झाले आहे. हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी बसचा चालक जनार्धन हंबर्डे याने पूर्वनियोजित कट रचून हे कृत्य केले. त्याने गाडीमध्ये एक लिटर बेंझीन सोल्युशन केमिकल आणून ठेवले होते. त्यासोबत कापड्याच्या चिंध्या आणि काडीपेटीही त्याने आधीच गाडीत ठेवली होती. तपासात गाडीमध्ये शॉर्ट…
मुंबई, दि. २० मार्च – विशेष प्रतिनिधी संगमनेर शहरात सुरू असलेली गोवंश हत्या आणि शहरातील मोक्याच्या जागा तसेच तालुक्यातील सुकेवाडी, घुलेवाडी, पारेगाव येथील देवस्थान जमिनी वक्फ बोर्डाकडे बेकायदेशीरपणे नोंदणी झाल्याचा मुद्दा आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत मांडून राज्य सरकारचे या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले. संगमनेर शहरातील नगरपरिषदेच्या हद्दीतील नवीन नगररोडवरील सर्व्हे नंबर १४९ (जुना सर्व्हे नंबर ८०३), क्षेत्र ४ एकर १७ गुंठे या मिळकतीवर तसेच तालुक्यातील घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर १६२ व १७९ येथील कानिफनाथ देवस्थान, सुकेवाडी येथील सर्व्हे नंबर १९४ मधील कान्होबा देवस्थान आणि पारेगाव येथील श्री अश्विनाथ महाराज मंदिर या देवस्थानांच्या हक्काच्या संपूर्ण जमिनीवर वक्फ बोर्ड चुकीच्या पद्धतीने…
नाशिक, दि. २० मार्च – नाशिक-पुणे महामार्गावरील बोधले नगरजवळील आंबेडकर वाडी येथे बुधवारी (१९ मार्च २०२५) रात्री ९ ते १० च्या सुमारास दोन सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली. उमेश उर्फ मन्ना जाधव आणि प्रशांत जाधव अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या सहा तासांत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात वर्चस्व राखण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली. क्राईम ब्रांच युनिट १ च्या पथकाने तपास सुरू केला असता, पोलीस नाईक मिलिंदसिंग परदेशी आणि हवालदार विशाल काठे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संशयित आरोपी सागर गरड आणि त्याचे साथीदार नाशिकच्या छत्रपती संभाजीनगर रोडवरील डाळिंब मार्केट येथे…
संगमनेर, दि. २० मार्च – प्रतिनिधी “सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकरी ऊस उत्पादन वाढवणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी आता आगामी काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अपरिहार्य आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना उसासंबंधीची सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध होईल,” असे स्पष्ट मत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी चेअरमन बाबासाहेब ओहोळ होते, तर व्यासपीठावर मा. आ. डॉ. सुधीर तांबे, सौ. कांचनताई थोरात, सौ. दुर्गाताई तांबे, बाजीराव पा. खेमनर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते…
