Author: अनंत पांगारकर

संगमनेर – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांची सखोल पडताळणी (Systematic Inspection of Rolls – SIR) मोहीम राबवावी, या मागणीसाठी ‘राहुल गांधी समर्थक संघ’ आक्रमक झाला आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (मंगळवारी 28 ऑक्टोबर) संगमनेरच्या तहसीलदारांना याबाबत लेखी निवेदन देऊन तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याच्या तक्रारी वारंवार विविध माध्यमांतून समोर आल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी या याद्यांची SIR द्वारे सखोल पडताळणी होणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यव्यापी संघटनेने निवेदनात केरळ राज्याच्या परिस्थितीचा दाखला दिला आहे. पुढच्या महिन्यात केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, तेथे सध्या मतदार याद्यांची सखोल पडताळणी…

Read More

मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देणारा असेल. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. वडिलोपार्जित संपत्तीचा वाद कोर्टात असल्यास विजय मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अनुभवाचा फायदा होईल. कोणत्याही व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका आणि वादग्रस्त परिस्थितीत शांत राहा. वृषभ (Taurus): आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही कामावर लक्ष केंद्रित कराल. व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी मोठा निर्णय घेऊ शकता. मोठे निर्णय घेण्यासाठी हा दिवस चांगला आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. मिथुन (Gemini): व्यवसाय करणाऱ्यांनी आज संधींचा फायदा घ्यावा. घरात धार्मिक यात्रेशी संबंधित योजना आखली जाऊ शकते. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवल्याने आराम आणि आनंद मिळेल. खर्चात वाढ झाल्यामुळे थोडा तणाव…

Read More

संगमनेर – आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेरमधील कष्टकरी आणि बेघर कुटुंबांना आता स्वतःचे हक्काचे घर मिळण्याच्या प्रशासकीय कामांना मोठा वेग आला आहे. आज (सोमवारी, २७ ऑक्टोबर) आमदार तांबे यांनी येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक घेऊन या गृहनिर्माण प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. बेघरांना त्वरित घर देण्यासाठी शासकीय पातळीवर तातडीने कार्यवाही सुरू झाली असल्याची माहिती या बैठकीत मिळाली आहे. बैठकीसाठी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, संगमनेर नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार यांच्यासह महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन साळुंखे आणि मोठ्या संख्येने गरजू महिला उपस्थित होत्या. प्रशासकीय पातळीवर सर्व संबंधित प्रलंबित कामांची माहिती…

Read More

संगमनेर: एकेकाळी ‘सुरक्षित, सुसंस्कृत आणि वैभवशाली’ अशी ओळख असलेल्या संगमनेर शहरात सध्या प्रशासकीय पातळीवर वाढलेली अस्वच्छता, अनियमित पाणी-वीज पुरवठा, अवैध फ्लेक्सबाजी आणि मोकाट जनावरांच्या त्रासाला नागरिक अक्षरशः कंटाळले आहेत. या गंभीर समस्यांकडे नगर परिषदेचे होत असलेले दुर्लक्ष पाहून संगमनेरकरांनी आज सोमवारी नगर परिषदेवर भव्य मोर्चा काढून ‘हल्लाबोल’ केला. येत्या आठ दिवसांत या समस्यांवर प्रभावी उपाययोजना न झाल्यास शहरवासीय भव्य ‘चक्का जाम’ आंदोलन करतील, असा आक्रमक इशारा आंदोलकांनी दिला आहे. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, सोमेश्वर दिवटे, गजेंद्र अभंग, शैलेश कलंत्री, डॉ. दानिश रईस खान, शुभम परदेशी, बादल जेधे, सिद्राम दिड्डी, निखिल पापडेजा, हैदरअली सय्यद, संदीप लोहे, बाजीराव शेरमाळे, नाना वाघ, सतीश…

Read More

संगमनेर – निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले; मात्र याचे श्रेय दुसरेच घेत आहेत. भोजापूर चारी कामासाठी पाठपुरावा करून या भागातील गावांकरिता सुरू केलेल्या उपसा जलसिंचन योजना विद्यमान सत्ताधाऱ्यांनी रद्द केल्या असून, या योजनांवरील स्थगिती तातडीने उठवून पाणी द्यावे, अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा जगाला मानवतेचा संदेश देणारा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. काकडवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरण व सेवा सोसायटीच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते. व्यासपीठावर बी. आर. चकोर, शिवसेनेचे अमर कतारी, संपतराव गोडगे, सुभाष…

Read More

मका, कांदा, कापूस, डाळिंब आणि झेंडू पिकांचे मोठे नुकसान; उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होणार संगमनेर – सप्टेंबर महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संगमनेर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र, आता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. तालुक्यातील १०८ गावांमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या २५,९७१ हेक्टरवरील पीक नुकसानीपोटी २२ कोटी २० लाख रुपये इतकी भरपाईची रक्कम महसूल विभागाने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी दिली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या या अतिवृष्टीने संगमनेर तालुक्यात मोठे नुकसान झाले. विशेषतः आश्वी खुर्द, आश्वी बुद्रुक, शिबलापूर, पानोडी, उबरी बाळापुर, रहिमपूर, कोकणगाव, वडगावपान, जोर्वे,…

Read More

संगमनेर – संगमनेर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदार याद्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. १५ प्रभागांतील मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याबाबत तब्बल १७३० हरकती (आक्षेप) दाखल झाल्या असून, यावर मंगळवारी (दि. २८) प्रांताधिकारी कार्यालयात निर्णायक सुनावणी होणार आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या याद्यांमध्ये अनेक प्रभागांतील मतदारांची नावे चुकीने दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झाल्याचे उघड झाले. यामुळे, आपले नाव योग्य प्रभागात समाविष्ट करून घेण्यासाठी स्वतः मतदारांनी आणि इच्छुक नगरसेवकांनी/कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हरकती नोंदवल्या.  पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंधरा प्रभागांत एकूण १७३० हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. दाखल झालेल्या हरकती…

Read More

संगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी शिवारात काल रविवारी सकाळी मालवाहतूक कंटेनर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. हा प्रमुख महामार्ग बराच वेळ वाहतुकीसाठी पूर्णपणे ठप्प झाला होता, यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या अंतरापर्यंत लांब रांगा लागल्या होत्या. या अपघातात कंटेनरचालकासह तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून नाशिकच्या दिशेने जात असलेला मालवाहतूक कंटेनर चंदनापुरी शिवारातील जावळे वस्तीजवळ आला असता, त्याचे ब्रेक अचानक फेल झाले. ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर जाऊन आदळले. या जोरदार धडकेमुळे कंटेनर रस्त्यावरच उलटला आणि त्याने महामार्गावरील दोन्ही लेन अडवून टाकल्या. हा अपघात…

Read More

मेष: आज तुम्ही ठरवलेली कामे सहज पूर्ण करू शकाल, पण प्रयत्न चुकीच्या दिशेने होत आहेत असे वाटेल. व्यवसायात धोका पत्करल्यास तो फायदेशीर ठरेल. कुटुंबात मतभेद होऊ शकतात, ते चांगले वागून दूर करा. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरी/व्यवसायात बुद्धिमत्तेचा वापर करून यश मिळवाल. एखादे मंगल कार्य किंवा प्रवासाचे योग संभवतात. वृषभ: आज हाती घेतलेले काम पूर्ण न झाल्याने थोडी निराशा येऊ शकते. कार्यात यश मिळायला विलंब लागेल. नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. प्रवासात अडथळे येऊ शकतात. कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवेल, मानसिक शांततेसाठी प्रयत्न करावे लागतील. मिथुन: आजचा दिवस शुभ आणि आनंददायी असेल. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणुकीतून…

Read More

संगमनेर – थोरात परिवाराने सात दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राची सेवा केली असून सर्वांना सोबत घेऊन जाणारे, अत्यंत स्वच्छ व पारदर्शी काम करणारे बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळेच संगमनेर तालुक्याची सर्व क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे, असे गौरवोद्गार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार व संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी काढले. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी रविवारी संगमनेरला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, सुधीर म्हस्के, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ. सुजित खिलारी…

Read More