Author: अनंत पांगारकर
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेचा आणि उत्साहाचा असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाबतीत दिवस समाधानकारक असून गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ आज तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. व्यापारात नवीन संधी प्राप्त होतील, परंतु घाईने कोणताही व्यवहार करू नका. आर्थिक नियोजन करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. कुटुंबात एखाद्या शुभ कार्याचे नियोजन होऊ शकते. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा, यामुळे नात्यात गोडवा निर्माण होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित…
संगमनेर: पोलीस म्हंटले की डोळ्यांसमोर येते ती गुन्हेगारांवर वचक ठेवणारी कठोर प्रतिमा आणि खाकी वर्दी. पण याच खाकी वर्दीच्या मागे एक अत्यंत संवेदनशील आणि मायेचा ओलावा जपणारा माणूस दडलेला असतो, याचे हृदयस्पर्शी दर्शन शिर्डीत घडले आहे. सहा वर्षांपूर्वी नियतीने अनाथ केलेल्या चार निराधार भावंडांच्या आयुष्यात प्रकाशदूत बनून आलेले अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी पुन्हा एकदा या मुलांची भेट घेऊन माणुसकीच्या नात्याची वीण अधिक घट्ट केली आहे. या कहाणीची सुरुवात एका अत्यंत वेदनादायी घटनेने झाली होती. सहा वर्षांपूर्वी परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील खुपटी येथील तुकाराम हारके आणि संगीता हारके या शेतमजूर दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली होती. दारिद्र्यामुळे आणि…
झरेकाठी, वार्ताहर: खळी येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब चौधरी यांनी आपल्या मुलाच्या विवाहानिमित्त समाजासमोर एक आदर्श वस्तुपाठ ठेवत ‘एक पाहुणा – एक आंबा रोप’ हा अभिनव उपक्रम राबविला आहे. दिखाऊपणा आणि अवाजवी खर्चाला फाटा देत चौधरी कुटुंबाने लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना कलमी आंब्याची रोपे भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा सामाजिक संदेश दिला. प्रगतशील शेतकरी बाळासाहेब डोळे व पत्रकार सोमनाथ डोळे यांचे भाचे ऋषिकेश आणि राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव दाढकर यांची कन्या साक्षी यांचा विवाह सोहळा नुकताच अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करण्याची आगळीवेगळी पद्धत. पारंपरिक शाल-श्रीफळाऐवजी प्रत्येकाला कलमी आंब्याचे रोप देऊन…
संगमनेर, प्रतिनिधी – केंद्र सरकारने नुकतेच लागू केलेले चार कामगार कायदे (लेबर कोड) रद्द करावेत आणि ‘बी.व्ही.जी. रामजी’ योजना बंद करून पुन्हा ‘मनरेगा’ योजना सुरू करावी, या मागणीसाठी संगमनेर तालुका तंबाखू (जर्दा) कामगार युनियन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या संघटनांनी दिला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने २०२५ मध्ये अस्तित्वात आणलेले चार लेबर कोड हे पूर्णपणे कामगारविरोधी आहेत. हे कायदे लागू करताना कामगारांच्या हिताचे जुने २९ कायदे रद्द करण्यात आले असून, भांडवलदार आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या…
संगमनेर (विशेष प्रतिनिधी): शासन ‘प्रशासन आपल्या दारी’चा डांगोरा पिटत जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करत असले, तरी संगमनेर महसूल विभागाच्या नाकर्तेपणामुळे एका सर्वसामान्य नागरिकाला आपल्या हक्काच्या जमिनीसाठी चक्क मृत्यूला साद घालण्याची वेळ आली आहे. वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असूनही जर जमिनीचा ताबा मिळत नसेल, तर हे प्रशासन नेमके कोणाच्या दावणीला बांधले आहे, असा संतप्त सवाल उपोषणकर्ते गणेश रासने यांनी उपस्थित केला आहे. प्रशासकीय ढिम्म कारभारामुळे हतबल झालेल्या रासने यांनी आता थेट ‘माझा बळी घेतल्यावरच जमीन मोकळी करणार का?’ असा सवाल विचारत तहसीलदारांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. संगमनेर येथील रहिवासी गणेश अनंत रासने यांची वडगाव पान शिवारात गट नंबर…
मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कष्टाचे कौतुक केले जाईल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आजचा मुहूर्त उत्तम आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील, मात्र जोडीदारासोबत बोलताना शब्दांचा वापर जपून करा. संध्याकाळी एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. वृषभ : आज तुम्हाला आर्थिक बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर घाई करू नका. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः पोटाशी संबंधित समस्या जाणवू शकतात. नोकरीत कामाचा ताण वाढेल, पण संयमाने घेतल्यास तुम्ही सर्व कामे वेळेत पूर्ण करू शकाल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. मिथुन…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये संपत आहे, अशा एकूण ९७ ग्रामपंचायतींवर आता प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात नुकताच अधिकृत आदेश पारित केला असून, मंगळवारपासून (दि. ९ फेब्रुवारी) या सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’ सुरू झाले आहे. राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे न्यायालयात प्रलंबित असल्याने, जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. न्यायालयाच्या निर्णयाअभावी निवडणुका घेणे शक्य नसल्याने शासनाने हा प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशानुसार तालुक्यातील अकलापूर, आंबी दुमाला, आबी खालसा, औरंगपूर, भोजदरी, बोटा, चंदनापूरी, चणेगाव, चिखली, चिंचपूर बु., दाढ खुर्द, देवगाव, देवकौठे, डिग्रस, हिवरगाव पठार, हिवरगाव…
संगमनेर, प्रतिनिधी – तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लारपूर येथे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी तोडफोड करून विटंबना केली. या घटनेचे पडसाद संगमनेर शहरात उमटले असून, राहुल गांधी समर्थक संघाच्या वतीने बस स्थानक परिसरात आज दुपारी ३ वाजता तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. देशातील अस्पृश्यता, सतीप्रथा आणि जातीभेदाविरुद्ध लढा देऊन बहुजन समाज, महिला व शेतकऱ्यांना शिक्षणाची दारे उघडणाऱ्या महापुरुषाच्या पुतळ्यावर झालेला हा हल्ला अत्यंत खेदजनक आणि गंभीर स्वरूपाचा आहे. हा केवळ एका पुतळ्यावर झालेला हल्ला नसून तो सामाजिक समता आणि मानवतावादी विचारांवर झालेला आघात आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. या घटनेमुळे संपूर्ण देशातील…
संगमनेर, प्रतिनिधी – शहरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असा ठाम इशारा देत आमदार अमोल खताळ यांनी शहर पोलीस प्रशासन व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना तात्काळ कारवाईचे कडक आदेश दिले आहेत. येत्या चार ते पाच दिवसांत शहरातील सर्व बेकायदेशीर कत्तलखाने उध्वस्त करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे संगमनेर शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर आता निर्णायक कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सध्या शहरातील विविध भागांत सुमारे २८ बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या कत्तलखान्यांमुळे परिसरात अस्वच्छता पसरत असून दुर्गंधी, आरोग्याच्या तक्रारी तसेच पर्यावरणीय प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या…
अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बस स्थानक परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांकडे पाहून अश्लील हावभाव करणाऱ्या आणि गाणी म्हणत सार्वजनिक शांतता व वातावरण दूषित करणाऱ्या ११ महिलांवर कोतवाली पोलिसांनी बुधवारी मोठी कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माळीवाडा बस स्थानक परिसरात काही महिला रस्त्याच्या कडेला उभ्या राहून प्रवाशांकडे पाहून अश्लील हावभाव करत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सूचनेनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, पोलीस उपनिरीक्षक मुगडे, प्रवीण पाटील आणि त्यांच्या पथकाने…
