Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: सूरत–चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या अत्यंत कमी मोबदल्याबाबत संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार अमोल खताळ यांनी शिर्डी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाप्रमाणे वाढीव व न्याय्य मोबदला देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित होते. तालुक्यातील वडझरी बु., अजमपूर, आरामपूर, चिंचोली गुरव, हसनाबाद, तळेगावसह अनेक गावांमधील सुपीक आणि निळवंडे कालव्याच्या सिंचनाखालील बागायती जमिनी या महामार्गासाठी संपादित करण्यात आल्या आहेत. सन २०२१-२२ मध्ये जाहीर झालेला भूसंपादनाचा निवाडा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक: सात-बारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्याला आणि त्याला मदत करणाऱ्या एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. देवळा तालुक्यातील खामखेडा येथे ही धडक कारवाई करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, अटक केल्यानंतर शासकीय वाहनातून नेत असताना संशयित तलाठ्याने लाचेची रक्कम गाडीबाहेर फेकून पुरावा नष्ट करण्याचा ‘फिल्मी’ प्रयत्न केला, मात्र एसीबीच्या सतर्कतेमुळे त्याचा हा डाव पुरता फसला. पप्पू काशिनाथ सोनकांबळे (वय ४६, रा. देवळा) असे लाचखोर तलाठ्याचे नाव असून प्रशांत दावल सोनवणे (वय २४) असे त्याला मदत करणाऱ्या मजुराचे नाव आहे. या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

          ‘शहाण्याला शब्दाचा मार’ असा एक मराठी वाक्प्रचार आहे. या वाक्प्रचाराप्रमाणे प्रत्येकाने वागावं आणि आपला कारभार करावा, अशी अपेक्षा असते. सत्तेत असलेल्यांनी तर या गोष्टी पारखून कारभार करायला हवा. मात्र, जेव्हा या अपेक्षा दूर होतात, तेव्हा सत्तेवरील लोक आणि सामान्य जनता यांच्यात मोठी दरी निर्माण होते. सत्ता जेव्हा वाह्यातपणे वागू लागते, तेव्हा लोक जाब विचारतात. केंद्रातल्या सध्याच्या सरकारविषयी तरुणांमध्ये प्रचंड राग आहे, जो आतापर्यंत व्यक्त होत नव्हता. किंबहुना तो व्यक्त होऊ नये यासाठी ‘ट्रोलभैरवांच्या’ झुंडी तयार केल्या गेल्या. परिणामी, भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर लोकांचा किती रोष आहे याचे चित्र स्पष्ट होत नव्हतं. तो रोष आता या…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात नवीन कल्पनांवर काम करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. आर्थिक बाजू भक्कम राहील आणि जुनी येणेबाकी वसूल होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवाल आणि जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. मानसिक शांतता लाभल्यामुळे तुम्ही तुमच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकाल. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामे आज गतीने पूर्ण होतील, ज्यामुळे मनातील मोठी चिंता दूर होईल. व्यवसायात भागीदारांशी असलेले संबंध सुधारतील आणि नवीन फायदेशीर व्यवहार समोर येतील. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे तुमचा मान-सन्मान वाढेल.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:  तालुक्यातील चिंचोली गुरव शिवारातील पारेगाव रोड येथील आभाळे वस्तीवर एक धक्कादायक घरफोडीची घटना समोर आली आहे. एका अज्ञात चोराने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सुमारे २ लाख १३ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन गंगाधर सोनवणे (वय ४३, रा. पारेगाव रोड, आभाळे वस्ती, चिंचोली गुरव, ता. संगमनेर) आपल्या कुटुंबासह राहत असून गुरुवारी (दिनांक २१ मे २०२६) रात्री ११:३० वाजेच्या सुमारास ते झोपलेले होते. त्यावेळी घर बंद असताना, शुक्रवारी (दिनांक २२…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: तिगाव येथील दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. आपला मुंबई दौरा आटोपून परतताच त्यांनी थेट तिगाव येथे धाव घेतली. कुटुंबप्रमुख या नात्याने त्यांनी मृत मुलांच्या मातोश्री मनीषा सानप व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. महेश गोरखनाथ सानप (वय १८) आणि ओंकार गोरखनाथ सानप (वय १४) या मृत पावलेल्या दोन तरुण मुलांचा अशा प्रकारे अचानक झालेला अंत पाहून बाळासाहेब थोरात स्वतः भावूक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, श्रीरामपूर: अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या बेकायदेशीर लिंगनिदान चाचणी आणि अवैध गर्भपात प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून, पोलिसांनी या रॅकेटचे धागेदोरे शोधत मोठी कारवाई केली आहे. या गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने तपास करत पोलिसांनी आता नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातून आणखी एका डॉक्टरसह दोघांना अटक केली आहे. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आणि वेगवेगळ्या आरोपींकडून अवैध लिंगनिदान करण्यासाठी वापरण्यात येणारे एकूण चार पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि तीन चारचाकी वाहने जप्त केली आहेत. या धडक कारवाईमुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या तब्बल १८ वर पोहोचली असून, यामध्ये ६ नामांकित डॉक्टरांचा समावेश…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: गत खरीप हंगामामधील पीकविमा नुकसान भरपाई अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांमध्ये वाटप करण्यात आली आहे. मात्र, संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईतून अन्यायकारक रीतीने वगळण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, येत्या २९ मे पर्यंत तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकविमा नुकसान भरपाई जमा न झाल्यास, संगमनेर तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटना आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे. मागील खरीप हंगामात संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत दिली होती. संगमनेर तालुक्यातही या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु,…

Read More

संगमनेर: तालुक्यातील तिगाव येथे शुक्रवारी (२२ मे) सायंकाळच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातीलच एका दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. महेश गोरक्षनाथ सानप (वय १८) आणि ओंकार गोरक्षनाथ सानप (वय १४) अशी मृत्यू झालेल्या दोन तरुण भावांची नावे आहेत. एकाच घरातील दोन सख्या भावांचा असा अचानक अंत झाल्यामुळे सानप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण तिगाव परिसरावर तीव्र शोककळा पसरली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने तिगाव परिसरातील एका मोठ्या दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी परिसरातील मुलांची नेहमी वर्दळ असते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास महेश आणि ओंकार…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना जुने मतभेद मिटण्याची शक्यता आहे. नवीन आर्थिक गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर आजचा काळ अनुकूल आहे. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. संध्याकाळचा वेळ जोडीदारासोबत आनंदात जाईल. वृषभ: आज तुम्हाला आर्थिक बाबतीत अत्यंत सावध राहावे लागेल. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना घाईगडबड करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. कौटुंबिक जीवनात काही अंशी तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे वादाचे…

Read More