Author: अनंत पांगारकर
संगमनेर – प्रतिनिधी नाशिक परिक्षेत्रातील सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक विश्वास लक्ष्मण भान्सी यांची संगमनेर (अहिल्यानगर) येथून नंदुरबार येथे बदली झाली आहे. नाशिक परिक्षेत्र पोलीस आस्थापना मंडळाच्या ३० मे २०२५ रोजीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या आदेशाने परिक्षेत्रातील २६ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असल्या तरी यातील काहींना आहे त्याच ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली आहे. आदेशात बदली झालेल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ कार्यमुक्त करावे. तसेच, बदली झालेल्या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करताना पर्यायी अधिकाऱ्यांची वाट पाहू नये असेही म्हटले आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी नवीन नियुक्तीच्या ठिकाणी…
मुंबई, ३१ मे २०२५ – विशेष प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाने शनिवारी संघटनात्मक बदल करत उर्वरित जिल्हाध्यक्षांच्या नावाची आज घोषणा केली. यापूर्वी पहिली यादी जाहीर करण्यात आली होती त्या पाठोपाठ आता उर्वरित जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या आहे. प्रदेश निवडणूक अधिकारी आ. चैनसुख संचेती यांच्या सहीने या संबंधित पत्र संबंधितांना देण्यात आले आहे. आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडींना महत्त्व आले आहे. यापूर्वी घोषित न झालेल्या जिल्ह्यांसाठीच्या पदाधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत: कोकण: * पालघर: भरत राजपूत * वसई विरार: श्रीमती. प्रज्ञा पाटील उत्तर महाराष्ट्र: * अहिल्यानगर शहर: अनिल मोहिते * नाशिक शहर: सुनील केदार * नाशिक…
मुंबई – प्रतिनिधी राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा घोळ समोर आला आहे. तब्बल २ हजार ६५२ सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी योजनेच्या निकषांचे उल्लंघन करत आर्थिक लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. या महिलांचे अर्ज आता बाद करण्यात आले असून, त्यांच्यावर सरकारकडून कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या पडताळणी मोहिमेदरम्यान हा गैरप्रकार समोर आला. माहिती व तंत्रज्ञान विभागाने सामान्य प्रशासन विभागाला १ लाख ६० हजार कर्मचाऱ्यांचा युआयडी डेटा उपलब्ध करून दिल्यावर पोर्टलवरील नोंदी तपासण्यात आल्या. या तपासणीत, सरकारी कर्मचारी असूनही ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या २,६५२ महिलांची नावे समोर आली. योजनेच्या नियमांनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता…
संगमनेर – प्रतिनिधी जोर्वे गावात शुक्रवारी (३० मे) झालेली ग्रामसभा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी चांगलीच गाजली. आदिवासी आणि विविध विकास कामांसाठी आलेला निधी नेमका कुठे गेला, या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी विखे समर्थक सत्ताधाऱ्यांनी ग्रामसभा गुंडाळण्याचा प्रयत्न केल्याने मोठा गोंधळ आणि राडा झाला. जनतेच्या कष्टाच्या पैशाचा गैरवापर झाल्याचा आरोप करत, गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या गैरकारभाराचा जाब विचारण्यासाठी ग्रामस्थ एकवटले होते. ग्रामसभेला उपस्थित असलेल्या सामान्य जनतेने गावाच्या विकासासाठी आलेल्या निधीच्या गैरवापराबाबत सरपंच आणि ग्रामसेवकांना जाब विचारला. मात्र, त्यांच्याकडे समाधानकारक उत्तरे नव्हती. प्रश्नांची सरबत्ती सुरू असताना, सत्ताधाऱ्यांकडून प्रश्न विचारणाऱ्यांनाच धमकावणे, धक्काबुक्की करणे असे प्रकार सुरू झाले. विकासकामांचे डोंगर उभे केल्याचे सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे एक-एक घोटाळे…
संगमनेर – प्रतिनिधी ऊस आणि दूध ही शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी पिके आहेत. शेतीत ठिबक सिंचनासह नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सातत्याने होत असलेल्या शेतीच्या वापरामुळे जमिनीत सेंद्रिय द्रव्यांची कमतरता निर्माण झाली असून, ती भरून काढणे गरजेचे आहे. कमी पाणी आणि कमी श्रमात एकरी १०० टनांपेक्षा जास्त ऊस उत्पादन घेणे आवश्यक असून, यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. वाघापूर (संगमनेर) येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्यावतीने आयोजित ऊस विकास मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ऊस विशेषज्ञ सुरेश माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले, ॲड. नानासाहेब शिंदे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज – खंडणी घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या बोगस महिला वकील स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय ३२) हिच्यावर आता फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे खळबळ उडाली असून, तिच्याकडून झालेल्या इतर फसवणुकीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वाढली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथे राहणाऱ्या मंदा सुरेश लांडगे (वय ५४) यांनी स्नेहल कांबळेविरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे. मंदा लांडगे यांच्या मुलीचे पतीसोबत वाद सुरू असल्यामुळे त्या आपल्या मुलीला माहेरी घेऊन आल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत, स्नेहल कांबळेने स्वतःला वकील असल्याचे भासवले. तिने मंदा लांडगे यांचा अज्ञानपणाचा फायदा घेऊन, त्यांची मुलगी व नातवांना न्याय मिळवून देण्याचे आमिष दाखवले.…
संगमनेर-अकोले (प्रतिनिधी) जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण पत्करलेले अकोले तालुक्याचे सुपुत्र, शहीद जवान संदीप पांडुरंग गायकर यांच्या कुटुंबीयांचे राज्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी (२९ मे २०२५) सांत्वन केले. यावेळी त्यांनी या सुपुत्राचा संपूर्ण महाराष्ट्राला सदैव अभिमान राहील, असे गौरवोद्गार काढले. ब्राह्मणवाडा येथे शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी बाळासाहेब थोरात उपस्थित होते. याप्रसंगी वीरपत्नी रूपाली गायकर, शहीद जवान संदीप यांचे वडील पांडुरंग गायकर, तसेच विक्रम नवले, सुरेश गडाख, ॲड. आर. बी. हांडे, शिवाजी नेहे, सुभाष गायकर, भारत आरोटे, संदीप वाघमारे, रजनीकांत भांगरे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जम्मू-काश्मीरमधील तिसवाड सेक्टरमध्ये…
संगमनेर – प्रतिनिधी संगमनेर शहर पोलिसांनी धाडसी कारवाई करत दोन आरोपींना गावठी पिस्तूल आणि मोबाईलसह अटक केली. ही कारवाई महात्मा फुले शाळेजवळून घुलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली. आरोपींकडून एकूण ६१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, यात ५०,००० रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, १०,००० रुपये किमतीचा वन प्लस नोड सी ई २ मोबाईल, आणि १,००० रुपयांचा एक बंद पडलेला मोबाईल फोन यांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शेख मुजम्मील शेख मजिद (वय २२, रा. वाणी मुस्लमान बौध्द वाडा, जमुना, ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि जमीरखान नजीरखान (वय ४०, रा. मिलन कॉलनी, ता. खामगाव, जि. बुलढाणा) अशी आहेत. संगमनेर शहर पोलिसांनी…
संगमनेर – प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्याच्या नवीन युवा धोरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण, २०१२’ या धोरणाच्या आधारे सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी एक नवीन समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांचा समावेश करण्यात आला आहे. विधान परिषदेचे तीन आणि विधानसभेचे तीन अशा सहा आमदारांपैकी तयारी पक्षाचे पाच आमदार या समितीमध्ये असून सत्यजित तांबे या एकमेव अपक्ष आमदाराचा अपवाद वगळता विरोधी पक्षातील एकाही आमदाराला या समितीमध्ये संधी मिळू शकली नाही. या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तांबे यांच्यावरील विशेष प्रेम समोर आले असल्याचे राजकीय…
संगमनेर – प्रतिनिधी संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवरील साईनगरकडे जाणारा पूल रखडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये आलेल्या पुरामुळे हा पूल खचला होता. काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात आणि युवा आमदार सत्यजित तांबे यांनी पुलाच्या दुरुस्तीसाठी तातडीने पाठपुरावा करून निधीची मागणी केली होती. मात्र, स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी या कामाचे राजकारण करून ते जाणीवपूर्वक रखडवले असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक शैलेश कलंत्री यांनी केला आहे. कलंत्री यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, म्हाळुंगी नदीवरील पूल खचल्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात आणि नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी तात्काळ पाहणी करून नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी पुलाची व्यवस्था केली होती. तसेच, ३० नोव्हेंबर २०२२…
