Author: अनंत पांगारकर
बीड: अकरावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी बीड पोलिसांनी उमाकिरण शैक्षणिक संकुलातील दोन शिक्षकांना अटक केली आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर अशी या आरोपी शिक्षकांची नावे आहेत. शनिवारी, (२८ जून) मध्यरात्री बीड तालुक्यातील मांजरसुभा परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. बीड शहरातील नामांकित उमाकिरण शैक्षणिक संकुलात ही विद्यार्थिनी अकरावीत शिक्षण घेत होती. ३० जुलै २०२४ ते २५ मे २०२५ या कालावधीत शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांनी तिला वारंवार आपल्या केबिनमध्ये बोलावले. तिथे त्यांनी तिचा लैंगिक छळ केला. इतकेच नाही तर, तिला नग्न करून तिचे फोटोही काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी,…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर शहरात मोकाट जनावरांमुळे नागरिकांना होणारा त्रास काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. नगर परिषदेने मोकाट जनावरे पकडण्यासाठी दिलेल्या ठेकेदाराच्या कामात गंभीर अनियमितता असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केला आहे. ठेकेदार काही विशिष्ट लोकांची जनावरे पकडून ती पुन्हा पिंजऱ्यातून सोडून देत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरातील घासबाजार, देवी गल्ली यासह इतर भागात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नगर परिषदेने एका ठेकेदाराला काम दिले आहे. मात्र, ठेकेदाराकडून या कामात अनियमितता केली जात असल्याचा आरोप बजरंग दलाने केला आहे. काही जनावरे पकडल्यानंतर ती पुन्हा…
काँग्रेस नेत्या आणि भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणलेल्या 21 महिन्यांच्या आणीबाणीला 50 वर्षं पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा करून भाजप आणि त्यांच्या सत्तेने स्वत:ची खाज भागवून घेतलेली दिसते. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या 352(1) या कलमाचा आधार घेत तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहंमद यांनी आणीबाणी लागू करायला संमती दिली आणि त्या दिवसापासून आणीबाणी लागू झाली. 25 जून 1975 हा तो दिवस. मध्यरात्री रेडिओवरून या आदेशाची स्वत: इंदिरा गांधींनी घोषणा केली. या दिवशी लागू झालेल्या आणीबाणीला 50 वर्षं पूर्ण झाल्याचं निमित्त करत सत्ताधार्यांनी निषेधाचा ठराव पारित करून निर्लज्जपणा सिध्द केला. सत्ता चालवण्यात येत असलेल्या अपयशापासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी जे काही…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुका हा एकेकाळी दुष्काळी होता, पण आज तो आपल्या विकासकामांच्या जोरावर राज्यात ओळखला जातो. या विकासात दुग्ध व्यवसायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार दिला असून संगमनेर तालुक्यात दररोज सुमारे ९ लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. या कष्टाच्या व्यवसायात महिलांचे योगदान मोलाचे आहे, असे गौरवोद्गार माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. आंबीखालसा येथील मुळेश्वर महिला सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या २५ व्या रौप्यमहोत्सव सोहळ्याप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख होते. व्यासपीठावर थोरात कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले, खांडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष लहानभाऊ गुंजाळ, मार्केट कमिटीचे सभापती शंकरराव खेमनर, माजी जिल्हा परिषद सदस्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज – प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या एका महिलेची सोनोग्राफी करताना, तिच्या पोटाला जेलीऐवजी चक्क ॲसिड लावण्यात आले. या गंभीर चुकीमुळे महिला भाजली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने, या घटनेनंतर अर्ध्या तासाने महिलेने एका गोंडस आणि सुखरूप बाळाला जन्म दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेला प्रसूतीसाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोनोग्राफीसाठी तिच्या पोटावर जेली लावण्याऐवजी, एका नर्सने चुकून ॲसिड लावले. यामुळे महिलेच्या पोटाला आणि काही अवघड जागांना गंभीर इजा झाली आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सोनोग्राफी रूममधील औषधांच्या ट्रेमध्ये एका ब्रदरने सोल्युशनऐवजी ॲसिड ठेवले होते, ज्यामुळे ही चूक झाली. या घटनेनंतर, महिला वेदनेने ओरडू…
नाशिक एसीबीची संगमनेरमध्ये कारवाई; शिक्षण संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह लेखनिक लाच घेताना जाळ्यात
संगमनेर, प्रतिनिधी – शिक्षकाकडून लाच स्वीकारताना संस्थेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह लेखनिक संगमनेरमध्ये नासिक एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठे खळबळ उडाली आहे. शुक्रवारी झालेल्या या कारवाई संदर्भात शनिवारी मध्यरात्री उशिराने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बाबूराव राजाराम गवांदे (वय ७५, सेवानिवृत्त शिक्षक व संस्थेचे सहसेक्रेटरी) आणि चंद्रभान काशिनाथ मटकुळे (वय ६२, लेखनिक) या दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीने शहरातील सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कार्यालयात शुक्रवारी (२७ जून) सायंकाळी चार वाजता कारवाई केली होती. त्यानंतर मध्यरात्री ३.४८ वाजता संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५९३/२०२५ नुसार नोंदवण्यात आला. संस्थेमध्ये शासनातर्फे…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरमधील गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी बघता विधान परिषदेच्या सदस्यांबाबत योग्य राजशिष्टाचार पाळला नाही, तर थेट नगरपालिकेला टाळे ठोकू, असा निर्वाणीचा इशारा संगमनेरचे माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. संगमनेर शहरातच राहणारे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांना नगरपालिका प्रशासन जाणूनबुजून डावलत असल्याच्या आरोपावरून हा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र विधान परिषद हे राज्याच्या विधिमंडळातील वरिष्ठ सभागृह आहे आणि त्याचे सदस्य महत्त्वाचे संवैधानिक स्थान भूषवतात. त्यामुळे नगरपालिकेच्या विविध विकासकामांबाबत त्यांना निमंत्रित करणे आणि त्यांना सूचित करणे हे नगरपालिका प्रशासनाचे, मुख्याधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. मात्र गेल्या काही दिवसातील चित्र बघता असे घडताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर…
संगमनेर, प्रतिनिधी: एकेकाळी ‘स्वच्छ आणि सुंदर शहर’ म्हणून राज्य व देशपातळीवर नावलौकिक मिळवलेल्या संगमनेर शहरावर सध्या अस्वच्छतेचे मोठे सावट पसरले आहे. शहरातील वाढलेल्या दुर्गंधी, कचऱ्याचे ढीग आणि रोगराईच्या धोक्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी, (२७ जून) माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगर परिषदेवर जोरदार ‘एल्गार’ मोर्चा काढला. प्रशासनाच्या उदासीन आणि मनमानी कारभारावर नागरिकांनी यावेळी तीव्र संताप व्यक्त केला. गेल्या काही वर्षांपासून संगमनेर शहराने स्वच्छतेच्या बाबतीत अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पारितोषिके मिळवून एक आदर्श निर्माण केला होता. तत्कालीन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आणि दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ ही संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात आली होती.…
अहिल्यानगर, दि. २८ – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २८ जून ते ११ जुलै २०२५, रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदर आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, मिरवणुका किंवा प्रेतयात्रांवरील जमावास लागू राहणार नाही. तसेच पोलीस अधिकारी, कामावर असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी, तसेच सभा अथवा मिरवणुका काढण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही हा आदेश लागू होणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरमधील गुंजाळ मळा परिसरात सुरू असलेल्या ट्रक टर्मिनलच्या कामावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आमदार अमोल खताळ यांच्यावर होत असलेली टीका खोटी आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करण्याच्या उद्देशाने नुकतीच या ट्रक टर्मिनलला भेट दिली होती. पंचायत समितीजवळील या कामाची गती कमी असल्याने, त्यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना कामाला गती देण्यासोबतच कामाचा दर्जा चांगला राखण्याच्या सूचना दिल्या. या भेटीदरम्यान त्यांनी कामाचे श्रेय घेण्याबद्दल कुठलेही वक्तव्य केले नाही, असे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आमदार खताळ हे तालुक्याच्या विकासकामांवर वेगाने लक्ष केंद्रित करत…
