Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर | प्रतिनिधी संगमनेर शहरातील हनुमान जयंती मिरवणुकीतील हिंदुत्ववादी युवकांवरील खोटे गुन्हे त्वरित मागे घ्या, शहरात बोकाळलेले अवैध मटका, जुगार आणि दारूचे अड्डे तातडीने बंद करा, मारहाणीच्या बळी ठरलेल्या ललित परदेशी यांच्या तक्रारीची दखल घेऊन गुन्हेगारांना अटक करा अन्यथा, येत्या मंगळवारी (२२ एप्रिल) सायंकाळी ५ वाजता संगमनेरचे युवक रस्त्यावर उतरून महामोर्चा काढतील! असा थेट आणि कडक इशारा काल गुरुवारी शहरातील संतप्त नागरिक आणि युवकांनी पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, संगमनेरात सध्या कायद्याचे राज्य संपले आहे. खुलेआम गुटखा विक्री, मटका, लोटो गेम, पत्त्याचे क्लब आणि अवैध देशी-विदेशी दारू विक्री तसेच बेकायदेशीर वाळू…
महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप आणि खळबळजनक दावे करणारे बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले अखेर पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. बीड पोलिसांनी आज (शुक्रवार) पहाटे पुण्यातील स्वारगेट परिसरातून त्यांना अटक केली. कासले काल दिल्लीहून पुण्यात आले होते आणि स्वारगेटमधील एका हॉटेलमध्ये मुक्काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. काल सायंकाळी आपण पोलिसांना शरण येणार असल्याचा व्हिडीओ कासले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र, त्यापूर्वीच बीड पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. रणजित कासले यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अनेक गंभीर आरोप केले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज – राहाता राहाता तालुक्यातील गणेशनगर येथून एका १९ वर्षीय युवकाचे अपहरण करून, लोखंडी रॉडने अमानुष मारहाण करत त्याचा खून करण्यात आला. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सिन्नर तालुक्यातील मुसळगाव शिवारात स्कोडा गाडीच्या डिकीत टाकून दिला. या घृणास्पद कृत्याप्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी सहा संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत युवकाचे नाव प्रतीक वसंत सदाफळ (वय १९) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १२) रात्री सुमारे ११ वाजता गणेशनगर येथील निर्मळ रुग्णालयासमोरून त्याचे अपहरण झाले. संशयितांनी त्याला सिल्व्हर रंगाच्या स्कोडा गाडीच्या डिकीत टाकले आणि अज्ञात स्थळी नेऊन लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर | प्रतिनिधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी, शहरातील नामांकित डॉक्टर अमोल कर्पे याच्या पोलीस कोठडीची मुदत संपलेली गुरुवारी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रविवारी (६ एप्रिल) संगमनेरमध्ये रामनवमी उत्सवाची धामधूम सुरू असताना हा संतापजनक प्रकार समोर आला होता. डॉ. कर्पे याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलीला पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाच्या टेरेसवर नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. व कोणाला काही सांगू नको, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी गेल्याचे पीडित मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर तालुक्यातील मांडवे येथील तलाठी अक्षय ढोबळे आणि खासगी व्यक्ती पत्रकार रमजान नजीर शेख हे ५० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. या प्रकाराने संगमनेरमध्ये खळबळ उडाली असून एसीबीच्या जाळ्यात सापडलेला शेख नेमका कशाचा पत्रकार आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. खडी वाहतूक करणाऱ्या तक्रारदाराच्या गाड्यांवर कारवाई न करण्यासाठी आणि ती सुरळीत चालू ठेवण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, ७अ व १२ प्रमाणे घारगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीच्या नाशिक युनिटने आणि घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर | प्रतिनिधी संगमनेर-अकोले तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना जमीन व गृह तारण कर्ज योजनेअंतर्गत कर्ज देण्याचे आमिष दाखवून मंजूर कर्जापैकी अल्प रक्कम कर्जदारांना देत उर्वरित रक्कम संस्थेचे व्यवस्थापक व संचालक मंडळाने कर्जदारांच्या खात्यातून परस्पर इतरांच्या नावे वर्ग केल्याचा आरोप करत संगमनेर शहरातील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला या बेकायदेशीर कर्ज प्रकरणांसंदर्भात कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी संस्थेने काय माहिती दिली हे अद्याप समजू शकले नाही. प्राप्त माहितीनुसार, कर्जदारांनी संस्थेने नियमबाह्य कर्ज व्यवहार करून गैरप्रकार केल्याचा आरोप केला असून, याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा आणि अन्य शासकीय न्यायिक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर परिसरातील उद्योग आणि व्यवसायासाठी आधारस्तंभ ठरलेल्या संगमनेर मर्चंट बँकेने आपल्या हीरक महोत्सवी वर्षामध्ये एक हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले असल्याचे उद्योजक राजेश मालपाणी यांनी म्हटले आहे. बँकेच्या चेअरमनपदी पुन्हा एकदा पाचव्यांदा राजेश मालपाणी यांची एकमताने निवड झाली आहे, तर व्हाईस चेअरमन म्हणून मधुसूदन नावंदर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक संतोष कोरे आणि सहकार अधिकारी राजेंद्र वाकचौरे यांच्या देखरेखेखाली बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात बुधवारी (१६ एप्रिल) चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. दोन्ही पदांसाठी अनुक्रमे राजेश मालपाणी आणि मधुसूदन नावंदर यांचेच अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज – पिंपरी पिंपरी-चिंचवड पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक निलेश सुरेश बोडखे (वय ३८ वर्षे, पुणे) यांच्यावर तक्रारदाराकडून तीस हजार रुपये लाच मागणी केल्याप्रकरणी व मागणी दरम्यान तडजोडीअंती वीस हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराचे वाहन सोडवण्यासाठी पोलीस निरीक्षक निलेश बोडखे यांनी ३०,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार, पडताळणीमध्ये बोडखे यांनी २०,०००/- रुपये लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे-मोहोळ, अपर पोलीस अधीक्षक गिरीश सराफ, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे…
महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरील शास्ती कर सामान्य नागरिकांसाठी अन्यायकारक असल्याचे सांगत आमदार सत्यजीत तांबे यांनी या मुद्द्यावर विधिमंडळात आणि शासनाकडे सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या पाठपुराव्याला शासनाने काहीसा दिलासा दिला असला, तरी अनधिकृत बांधकामांवरील शास्ती कर माफीबाबत अद्याप स्पष्ट निर्णय न घेतल्याने तांबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सत्यजीत तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी २१ डिसेंबर २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात आणि १६ मार्च २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शास्ती कर रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच, ८ एप्रिल २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी विधिज्ञ ॲड. जगन्नाथ वामन, उपाध्यक्षपदी ॲड. प्रसाद भडांगे, महिला उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता सस्कर यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीची पुन्हा फेरनिवड करण्यात आले आहे. १५ एप्रिल, २०२५ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वकील संघाचे कार्यकारिणी निवडण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये निवडणूक कार्यक्रम न लावता सद्यस्थितीत काम करणाऱ्या, गेल्या वर्षभरात वकिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच वकिलांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाची दखल घेत कार्यकारिणीलाच सन २०२५ ते २०२६ या वर्षांच्या कालावधीसाठी संधी देण्याचा निर्णय सर्वानुमते झाला. त्यामुळे जुन्याच कार्यकारिणीकडे नव्या वर्षासाठी ची सूत्रे सोपविण्यात आली. अध्यक्षपदासाठी ॲड. वामन, उपाध्यक्षपदी भडांगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल, तर…
महाराष्ट्र संवाद न्यूज – नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरात असलेल्या एका अनधिकृत दर्ग्याच्या उर्वरित बांधकामावर आज पहाटेपासून अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, यात तीन ते चार पोलीस जखमी झाले असून पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अनधिकृत दर्गा ट्रस्टला आपले म्हणणे मांडण्यासाठी दिलेली मुदत आज, १५ एप्रिल रोजी संपली. यानंतर नाशिक महानगरपालिकेने (NMC) मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून उर्वरित बांधकाम तोडण्यास सुरुवात केली. यापूर्वी याच दर्ग्यावर कारवाई करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे पोलिसांनी कोणतीही अनुचित…
महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई | विशेष प्रतिनिधी राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरीच्या नगराध्यक्षांना त्यांच्या पदावरून दूर करण्याचे महत्त्वपूर्ण अधिकार आता थेट निवडून आलेल्या सदस्यांना मिळणार आहेत. यासंबंधीच्या महत्त्वपूर्ण तरतुदींना आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या निर्णयामुळे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा होणार आहेत. यापूर्वी, कोणत्याही नगराध्यक्षांना पदावरून दूर करायचे असल्यास, निवडून आलेल्या एकूण सदस्यांपैकी किमान पन्नास टक्के सदस्यांच्या सह्या असलेला प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाई. त्यानंतर, शासनाच्या स्तरावर या प्रस्तावावर विचार होऊन अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया पार पडत असे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही वर्षांपासून अस्थिर असलेल्या राजकीय वातावरणात आता आणखी एक नवी आघाडी उदयास येण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षांविरोधात विरोधकांची धार कमी होत असतानाच, राज्यातील तीन प्रमुख नेते – राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर – यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, या तिन्ही नेत्यांनी येत्या रविवारी पुण्यात ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’ चे आयोजन केले आहे. या परिषदेच्या माध्यमातून राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटना, बच्चू कडू यांचा ग्रामीण भागातील प्रभाव आणि महादेव जानकर यांचा ओबीसी मतदारांवरील जनाधार एकत्र येणार आहे. “खोट्या आश्वासनांना…
विशेष प्रतिनिधी / मुंबई विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने दिलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील महिला मतदारांना देताना दिलेल्या आश्वासनाचा युती सरकारला पद्धतशीर विसर पडला आहे. शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या बहिणीच्या दीड हजाराच्या रक्कमेतून चक्क हजार रुपये कमी होणार आहेत. ज्या योजनेमुळे महायुती पुन्हा सत्तेत येण्यास कारणीभूत ठरली त्या योजनेलाच हात घालण्यात आल्याने राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या बहिणी चांगल्याच संतापल्या आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी तर युती सरकारला बहिणींचा शाप लागेल असं म्हटलं आहे. निवडणुकीपूर्वी जर आम्ही सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजनेत १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ, असं आश्वासन महायुतीनं दिलं होतं. मात्र, राज्यात महायुतीचं सरकार येऊन चार महिने झाले. तरीही…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर सहकारातील दोन दिग्गजांच्या समेटानंतर दोन्ही कारखान्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली असून निवडीची औपचारिकता बाकी आहे तर दुसरीकडे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची वाटचाल ही बिनविरोध निवडीकडे असून उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर यासंबंधीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या तरी या निवडीमध्ये अन्य उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा अडसर असल्याचे दिसून येते. मात्र छाननीनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था सभासदांनी निवडून द्यावयाच्या गटातून बिनविरोध निवड झाली आहे. अन्य मतदार संघातून कोणाची कारखान्याच्या संचालकपदी वर्णी…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) (३) अन्वये जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू केली आहे. हा आदेश आजपासून (१५ एप्रिल २०२५) ते २४ एप्रिल २०२५ पर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशानुसार, जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीला शस्त्र बाळगण्यास किंवा जमाव करून फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी शस्त्र प्रदर्शन करणे, लाठ्या-काठ्या, तलवारी किंवा इतर कोणत्याही प्रकारची शस्त्रे घेऊन फिरणे कायद्याचे उल्लंघन ठरेल. तसेच, पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊन कोणताही जमाव करणे…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर शहरात नुकत्याच पार पडलेल्या हनुमान जयंती उत्सवादरम्यान झालेल्या गोंधळ प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ११ आणि १२ एप्रिलला घडलेल्या या घटनांप्रकरणी १४ एप्रिलला रात्री उशिराने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक पुंडलिक गरुडकर, सौरभ रमेश उमरजी, शेखर शिवाजी सोसे, अमोल दशरथ क्षीरसागर, श्याम मधुकर नालकर, सोनू गोविंद नालकर, शुभम मनोज परदेशी, ओंकार ननवरे उर्फ चाव्या, मयूर जाधव उर्फ पप्पू, राहुल शशिकांत नेहूलकर व पियुष संतोष गोडसे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कमलाकर विश्वनाथ भालेकर (वय ६२, धंदा निवृत्त, रा. चंद्रशेखर चौक,…
मुंबई, दि. १५ – विशेष प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांचा तपशील खालीलप्रमाणे…. १. चिखलोली-अंबरनाथ येथे नवीन दिवाणी न्यायालय: ठाणे जिल्ह्यातील चिखलोली-अंबरनाथ येथे कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या न्यायालयासाठी आवश्यक पदांनाही मान्यता देण्यात आली आहे, ज्यामुळे या भागातील नागरिकांना न्याय मिळवणे अधिक सुलभ होणार आहे. २. कैद्यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी भरपाई धोरणाला मंजुरी: राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार, कैद्यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी पीडित…
महाराष्ट्र संवाद न्यूज – लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर संगमनेर आणि पारनेरला दिलेला जोरदार झटका विरोधकांच्या कायम लक्षात राहील. आता श्रीरामपूरकडे लक्ष देणार असून, योग्य वेळी त्यांनाही झटका देऊ, असा स्पष्ट इशारा माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला आहे. दत्तनगर गावठाण येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दीपक पटारे, नानासाहेब शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. विखे म्हणाले की, राजकारण हे गरीब लोकांना घरे मिळवून देणे, शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करणे आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे यांसारख्या मोठ्या गोष्टींवर आधारित असावे. श्रीरामपूरमध्ये बदल घडवायचा असेल, तर ‘तुझं-माझं’ सोडून जनतेच्या हितासाठी…
संगमनेर, दि. १४ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर शहरात लवकरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हे काम मार्गी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ शेतकरी नेते संतोष रोहम, आरपीआयचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे, रमेश काळे, शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, दिनेश फटांगरे, सौरभ देशमुख, रणजीत जाधव, अंबादास अनमल, दिपाली वाव्हळ, सोमनाथ भालेराव, भारत गवळी, दिलीप रावळ, शशांक नामन, सिद्धार्थ खरात,…
