Author: अनंत पांगारकर
मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची थोडी काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य असून गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. वृषभ : आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. अडकलेली कामे मार्गी लागतील आणि धनलाभाचे योग आहेत. नोकरीत बढतीची शक्यता असून वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. घरामध्ये पाहुण्यांचे आगमन झाल्यामुळे वातावरण प्रसन्न राहील. सामाजिक कामात तुमचा सहभाग वाढेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे, फक्त घाईत कोणताही निर्णय घेऊ…
संगमनेर, प्रतिनिधी – नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या एका सराईत टोळीला पोलिसांनी गजाआड केले असून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १११ (संघटित गुन्हेगारी) अन्वये वाढीव कलम दाखल करून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी बनवून गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर पोलिसांनी आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसातील ही दुसरी कारवाई आहे. या आधीही संगमनेर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडल्यानंतर या टोळीवर देखील बीएनएसच्या कलम १११ कारवाई केली होती. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार हरिष रामसिंग…
संगमनेर, प्रतिनिधी – राज्य सरकारने घरपट्टी शास्ती आणि दंड माफीचा निर्णय घेऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला असला, तरी संगमनेर नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे सामान्य नागरिकांना अद्याप या सवलतीचा लाभ मिळालेला नाही. याउलट, सॉफ्टवेअर अपडेट नसल्याचे तांत्रिक कारण पुढे करत नागरिकांकडून जादा रक्कमेची वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित दोषी अधिकारी आणि सॉफ्टवेअर कंपनीवर कठोर कारवाई करून नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळावेत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. राज्य सरकारने शास्ती माफीचा जीआर काढल्यानंतर संगमनेरमध्ये याचे मोठे स्वागत झाले होते. अनेकांनी या निर्णयाचे श्रेय घेण्याचेही प्रयत्न केले, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणीच्या…
मेष: आज तुमच्या कार्यक्षेत्रात नवनवीन संकल्पना मांडण्यासाठी काळ अनुकूल आहे. तुमची ऊर्जा आणि उत्साह पाहून सहकाऱ्यांमध्येही सकारात्मकता पसरेल. आर्थिक बाजूने विचार करता, जुन्या उधारीचे पैसे परत मिळू शकतात. घरातील मोठ्यांशी चर्चा करताना नम्र राहा, जेणेकरून कौटुंबिक शांतता टिकून राहील. जोडीदारासोबत संध्याकाळ मजेत जाईल. वृषभ: आज तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळताना दिसेल. विशेषतः जे लोक रिअल इस्टेट किंवा शेतीशी संबंधित आहेत, त्यांना मोठा फायदा होऊ शकतो. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील, पण खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. घरातील एखाद्या मंगल कार्याचे नियोजन आज ठरू शकते. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यामुळे तुमचा जनसंपर्क वाढेल. मिथुन: आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. कामाच्या ठिकाणी काही गुप्त…
संगमनेर, प्रतिनिधी – तमाशा ही महाराष्ट्राची जिवंत लोककला असून, या क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या रघुवीर खेडकर यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर राज्यभरातील तमाम लोककलावंतांचा खऱ्या अर्थाने सन्मान आहे, असे गौरवपूर्ण उद्गार माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल लोक कलावंत रघुवीर खेडकर यांच्या संगमनेर येथील कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या ऐतिहासिक नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, प्रसिद्ध उद्योगपती राजेश मालपाणी, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे,…
शिर्डी: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सर्व गट-तट विसरून शिवसैनिकांची वज्रमूठ सहाही तालुक्यांत पक्षाला मोठा विजय मिळवून देईल, असा निर्धार शिवसेनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित कार्यकारिणीची निर्धार बैठक आणि सत्कार सोहळा शिर्डी येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्रीरामपूरचे ज्येष्ठ शिवसैनिक अशोक थोरे मामा यांनी भूषवले. या बैठकीच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील आणि जगदीश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी लोकसभेतील ठाकरे गटाची शिवसेना आता पूर्णपणे सक्रिय झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत स्थान देऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि खासदार अनिल…
संगमनेर, प्रतिनिधी – पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील रायतेवाडी फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे स्थानिक नागरिकांना अनेक तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करूनच पुढील काम करण्याच्या, कामाचा दर्जा आणि सुरक्षितता याच्याशी कोणतीही तडजोड करू नका अशा कडक सूचना आमदार अमोल खताळ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. उड्डाणपुलाच्या कामदरम्यान नागरिकांना येत असलेल्या समस्यांची दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी नुकतीच या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहणी दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन आमदार खताळ यांना दिले. यामध्ये प्रामुख्याने उड्डाणपुलाच्या ठिकाणी ये-जा…
श्रीरामपूर, विशेष प्रतिनिधी – कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे डांबून ठेवलेल्या पाच गोवंशीय जनावरांची श्रीरामपूर शहर पोलिसांनी धाडसी कारवाई करत सुटका केली आहे. या कारवाईत सुमारे दोन लाख रुपये किमतीची जनावरे हस्तगत करण्यात आली असून, संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (८ फेब्रुवारी) रात्री १२ वाजेच्या सुमारास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कुरेशी मोहल्ला वॉर्ड नंबर २ मधील एका पडक्या घराच्या आडोशाला काही गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयीपणे बांधून ठेवण्यात आली आहेत. या जनावरांची चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता केवळ कत्तल करण्याच्या हेतूने त्यांना तिथे ठेवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीची…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील पिंपरणे शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत हॉटेल आणि बाहेर उभ्या असलेल्या कारमधून देशी-विदेशी दारूचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला असून, एकूण ५,४४,२४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी साहेबराव भिकाजी राहिंज (वय ४६, रा. पिंपरणे) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अमृत शिवाजी आढाव यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वा चार वाजेच्या सुमारास पिंपरणे ते संगमनेर रोडवरील ‘हॉटेल गरीब’ येथे ही कारवाई…
संगमनेर: संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. ही घटना ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास डिग्रस ते ठाकरवाडी रोडवरील मेंगाळवस्ती येथे घडली. या कारवाईत दोन डंपर आणि वाळू असा एकूण २० लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल योगेश जबाजी कर्डीले यांनी याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. केवळ संगमनेर शहरातच नव्हे तर संगमनेर तालुक्यात येथील यामुळे अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून संगमनेरला अवैध धंद्यांनी पोखरले आहे. यातून गुन्हेगारी…
