Author: अनंत पांगारकर

संगमनेर, प्रतिनिधी- ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व प्रश्नांची जाण असणारे महाराष्ट्राचे रोखठोक नेतृत्व म्हणून लोकप्रिय झालेले अजित दादा पवार यांच्या आकस्मात निधनाने महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी मोठी हानी झाली असल्याचे काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असून त्यांनी आज पवार कुटुंबियांचे सांत्वन केले. विद्या प्रतिष्ठान येथे जाऊन अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन केले. याप्रसंगी काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी उपस्थित होते. थोरात यांनी पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबियांची भेट घेतली. याप्रसंगी बोलताना थोरात म्हणाले की, 1990 पासून अजित पवार हे राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे. ग्रामीण आणि शहरी प्रश्नांची जाण असलेला हा मोठा नेता होता. ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या सराईत गुन्हेगारावर ‘पोक्सो’सह ‘मोक्का’ अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी ‘ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन – सर्वांसाठी मानवाधिकार संघटना’ यांच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, कलिम पठाण या सराईत गुन्हेगाराने पाच महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. पोलीस प्रशासनाने ३१ जानेवारी २०२६ रोजी आरोपीला मुलीसह ताब्यात घेतले आहे. हा आरोपी सराईत असून त्याच्यावर यापूर्वीही चोरी, घरफोडी, दरोडा आणि खुनाचा प्रयत्न यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीवर…

Read More

आजचे राशिभविष्य:  मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाबतीत नशिबाची साथ मिळाल्याने प्रलंबित येणी वसूल होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, मात्र जोडीदारासोबत बोलताना शब्दांचा वापर जपून करणे हिताचे ठरेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या, विशेषतः पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात. वृषभ आज तुम्हाला नशिबापेक्षा कष्टावर जास्त विश्वास ठेवावा लागेल. व्यापार किंवा व्यवसायात काही नवीन करार होण्याची शक्यता आहे, परंतु घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे, मात्र अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची चिंता सतावू शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  राष्ट्र सेवा दल संगमनेरच्या कार्याध्यक्षपदी अनुराधा आहेर, सचिवपदी रवी दिवे तर खजिनदारपदी विश्वनाथ भुजबळ यांची निवड करण्यात आली.  स्वातंत्र्यसैनिक भास्करराव दुर्वे नाना स्मारक येथे रविवारी तालुका अध्यक्ष राम चन्ना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्र सेवा दल संगमनेर केंद्राच्या विशेष बैठकीत नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. चन्ना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत संघटनेच्या भविष्यातील वाटचालीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला राष्ट्र सेवा दलाची विचारधारा, समाजप्रबोधन, युवक संघटन आणि संविधान मूल्यांच्या संरक्षणासह लोकशाही बळकटीकरणावर भर देण्यात आला. आगामी काळात संगमनेर तालुक्यात संघटनेचा विस्तार करून सामाजिक, शैक्षणिक आणि लोकजागृतीचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.  यावेळी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – श्री क्षेत्र खंडोबा देवगड देवस्थानचा ‘ब’ वर्गात समावेश झाला असून, या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासनस्तरावरून आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली. हिवरगाव पावसा येथील प्रतिजेजुरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगड खंडोबा यात्रोत्सवानिमित्त आमदार खताळ यांनी पत्नी नीलम खताळ यांच्यासह खंडोबा मल्हार मार्तंडाची महाआरती केली. यावेळी त्यांनी रथाचे सारथ्य करत भाविकांचा उत्साह वाढवला. यात्रोत्सवानिमित्त आयोजित अश्व व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. देवस्थान परिसरातील रस्त्यांची कामे आणि पुलाचा प्रश्न आधीच मार्गी लावला असून, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे स्मारक व पाणीपुरवठ्यासाठीची उपसा सिंचन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आपण…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – मोदी सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प देशासमोरील आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर उपाय शोधण्याण्याऐवजी ते प्रश्न अधिक गंभीर करणारा आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे थकलेल्या आणि दिशाहीन सरकारचा दाखला असून, सर्वसामान्यांच्या हितापेक्षा केवळ घोषणाबाजीला यात प्राधान्य देण्यात आले आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. आजच्या अर्थसंकल्पावर भाष्य करताना थोरात म्हणाले की, या अर्थसंकल्पात गरिबांसाठी कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. महागाई आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडे कोणतीही ठोस योजना नाही आणि बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी कोणतेही प्रभावी उपाय योजले गेलेले नाहीत. ठप्प झालेली वेतनवाढ, बाजारपेठेतील कमकुवत मागणी आणि खासगी गुंतवणुकीतील मंदी ही…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ हा महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण, आरोग्य आणि उद्योग क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारा असून, विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे एक खंबीर पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली. आमदार खताळ म्हणाले की, या अर्थसंकल्पात बळीराजाच्या कष्टाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. ‘व्हर्च्युअल इंटीग्रेटेड सिस्टम टू एक्सेस अ‍ॅग्रीकल्चर रिसोर्स’ या बहुभाषिक एआय (AI) टूलमुळे शेतकऱ्यांना आधुनिक माहिती सहज मिळणार असून, कोकणातील नारळ बागायतदारांसाठीची विशेष योजना आणि मत्स्योद्योगातील तरतुदी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या आहेत. तरुणांच्या भविष्याचा विचार करून १५ हजार शाळांमध्ये ‘कंटेंट क्रिएटर लॅब्स’ आणि गेमिंग-VFX क्षेत्रात २० लाख युवकांना प्रशिक्षण देण्याचा…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलीस प्रशासनाने ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जानेवारी २०२६ मध्ये श्रीरामपूर विभागातील १७ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तब्बल ३४ अट्टल गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीचे (तडीपारीचे) प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी गेल्या १० वर्षांतील गुन्हेगारांचा सविस्तर ‘क्राइम डेटाबेस’ तयार केला असून, त्याद्वारे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. हद्दपारीच्या प्रस्तावातील गुन्हेगार___ श्रीरामपूर शहर व तालुका- योगेश सचिन गुंजाळ (२३ वर्षे, बेलापूर बुद्रुक), भारत विष्णू धोत्रे (३० वर्षे, तीन बाजारतळ), तंजील गफार खान (२५ वर्षे, हुसेन नगर), प्रशांत संजय थोरात (२७ वर्षे, शिरसगाव), मनोज…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – भाविकांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या पायी दिंडीवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील साईबाबा मंदिर परिसरात मुक्कामी असलेल्या दिंडीच्या पालखीतील ३६० ग्रॅम चांदीच्या पादुका आणि एक मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. घारगाव येथील ‘साई सह्याद्री तरुण मित्र मंडळाची’ पायी दिंडी दरवर्षीप्रमाणे शिर्डीकडे प्रस्थान करत असताना २९ जानेवारी रोजी चंदनापुरी येथे मुक्कामी थांबली होती. शुक्रवारी (३० जानेवारी) पहाटेच्या सुमारास चोरट्याने संधी साधून पालखीतील चांदीच्या पादुका चोरल्या. त्याचवेळी मंदिरात झोपलेल्या एका भाविकाचा मोबाईलही लंपास करण्यात आला. सखाराम कुरकुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, या…

Read More

13 वर्षांहून अधिक काळ राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी उत्तम जबाबदारी सांभाळली त्या अजित पवारांचं अकाली जाणं ही महाराष्ट्रातील काम करणार्‍या तमाम कार्यकर्त्यांसाठी अपरिमित हानी होय. दादा आज आपल्यात नाहीत, याचं शल्य आज सारेच व्यक्त करत आहेत. दादांना त्यांच्या सडेतोडपणाला दोष देत होते ते आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारेही हळहळत आहेत, यावरून या नेत्याची महाराष्ट्राची असलेली नाळ स्पष्ट दिसते. त्यांच्याकडे काम घेऊन गेलेला अगदी सामान्यातला सामान्य माणूस खाली हाताने परत येईल, असं कधी झालं नाही. यामुळे प्रत्येकजण दादांच्या अकाली जाण्यावर हळहळला आहे. काम होणार नसेल तर होणार नाही, असं सांगणारा मंत्रालयातील एक मंत्री म्हणजे दादा होत. बेकायदा कामं आणू नका असं…

Read More