Author: अनंत पांगारकर
मोहसीन रशीद शेख शहरात नगरपालिका निवडणुकीची चाहूल लागताच वातावरण पुन्हा रंगत आलं आहे. यावेळी मात्र रस्त्यांवर आणि सोशल मीडियावर अचानक उगवलेले “समाजसेवक” नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. गेल्या काही वर्षांत जे चेहरे गल्ल्यांमधून गायब झाले होते, तेच आता पुन्हा “जनतेच्या सेवेसाठी” मैदानात उतरले आहेत. प्रश्न एवढाच — ही सेवा समाजासाठी आहे की निवडणुकीसाठी? प्रत्येक निवडणुकीच्या काळात असे हंगामी समाजसेवक सक्रिय होतात. काहीजण मदतीपेक्षा फोटो काढण्यात जास्त रस घेतात, तर काहींसाठी समाजसेवा म्हणजे फक्त पोस्टर, बॅनर आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धी. “सेवा” हा शब्दच आजकाल ब्रँडिंगचा भाग झाला आहे. खऱ्या अर्थाने समाजसेवा ही निस्वार्थ भावनेतून होते. ती निवडणुकीच्या तारखांवर अवलंबून नसते. पण…
पुणे – पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत मोठी धडक कारवाई करत पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी (वय ३५) याला तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. एसीबीच्या माहितीनुसार, आरोपी उपनिरीक्षकाने तक्रारदाराच्या आशिलाला गुन्हेगारी प्रकरणात मदत करण्यासाठी आणि त्याच्या वडिलांचा जामीन मिळवून देण्यासाठी तब्बल २ कोटी रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणात तक्रारदाराचे वडील एका गुन्ह्यात अटकेत होते आणि प्रमोद चिंतामणी या प्रकरणाचा तपास अधिकारी होता. त्याने या लाचेच्या रकमेतील १ कोटी रुपये स्वतःसाठी आणि उर्वरित १ कोटी रुपये वरिष्ठ…
मेष (Aries) – आरोग्याची काळजी घ्या. ताप, सर्दीचा त्रास होऊ शकतो. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिवस. वृषभ (Taurus) – आर्थिक लाभ, पदोन्नती मिळण्याची शक्यता. वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. ज्येष्ठ मंडळींकडून धनलाभाची शक्यता. अविवाहितांसाठी विवाहयोग संभवतो. मिथुन (Gemini) – तुमच्या कामाची प्रशंसा होईल. सर्जनशीलता वाढेल. जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल. नोकरीत सुस्थता लाभेल. शिक्षणासाठी दुसऱ्यांना मदत कराल. कर्क (Cancer) – धनलाभ होऊ शकतो. भावनिक संतुलन आणि आत्मपरीक्षणाचा दिवस. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. लेखकांच्या लिखाणास प्रसिद्धी मिळेल. सिंह (Leo) – सर्वांची मने जिंकून घ्याल. मानसिक शांतता लाभेल. शिक्षक/प्राध्यापकांच्या प्रसिद्धीत भर पडेल. कन्या (Virgo)…
संगमनेर – संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे दहशतीचे वातावरण आहे. याच मालिकेतील आणखी एका ताज्या घटनेत, शनिवारी (१ नोव्हेंबर) हिवरगाव पावसा येथे एका ३० वर्षीय महिलेवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला असून, ती महिला गंभीर जखमी झाली आहे. अर्चना संदीप टेमगिरे (वय ३०) असे जखमी महिलेचे नाव असून ही घटना हिवरगाव पावसा शिवारात घडली. महिला आपल्या शेतातून घरी परतत असताना बिबट्याने दबा धरून तिच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये महिलेला गंभीर जखमा झाल्या आहेत, यामुळे तिची प्रकृती चिंताजनक बनली आहे. महिलेने प्रसंगावधान राखून केलेल्या आरडाओरड्यानंतर परिसरातील नागरिक तात्काळ धावून आले, यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या महिलेला स्थानिक नागरिकांच्या…
संगमनेर – गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे ‘कायदा आणि सुव्यवस्था’ संपुष्टात येऊन गुन्हेगारांचे राज्य आले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, संगमनेरला अमली पदार्थाचा विळखा घट्ट होत असतानाच आता खुद्द पोलीस ठाण्याची सूत्रेच ‘मद्यधुंद’ कर्मचाऱ्यांच्या हाती असल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्तव्यावर असताना दारूच्या नशेत असलेल्या एका हवालदाराने तक्रारदाराशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित कर्मचारी हा यावेळी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला असून यामुळे नागरिक आणि पोलीस दलाच्या प्रतिमेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वरिष्ठांनीही हात टेकल्याने संगमनेरकरांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे. जनतेचे सेवक की मालक? – संगमनेर शहर…
संगमनेर (प्रतिनिधी) : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टेमगिरे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अर्चना संदीप टेमगिरे यांची संगमनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षा व कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी रुग्णालयात जाऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली आणि त्यांना धीर दिला. हिवरगाव पावसा परिसरातील टेमगिरे वस्ती येथे शेतात काम करून घरी परतणाऱ्या तीस वर्षीय अर्चना संदीप टेमगिरे यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण हिवरगाव पावसा परिसरात अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही माहिती मिळताच डॉ. जयश्री थोरात यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली आणि…
संपदा मुंडे या होतकरू महिला डॉक्टरच्या अकाली मृत्यूने सारा महाराष्ट्र सुन्न झाला असताना या डॉक्टरच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्याला मारणार्या मारेकर्यांची रीघ पाहून या राज्यातल्या जनतेला झोप कशी लागते, असा प्रश्न पडला आहे. इतका मुर्दाड झालेला महाराष्ट्र कोणीच कधी पाहिला नाही. ज्याचं नाव या तरुणीने घेतलं, तोच निर्दोष असल्याचं सांगण्यासाठीचा आटापिटा पाहिला की सत्तेतली माणसं किती पिपासू झालीत हे लक्षात येतं. काँग्रेसच्या अनेक सत्ता या राज्याने पाहिल्या. पण असले पिपासू स्मरणात नाहीत. राजकारणाचा बोलबाला करत जो तो मारेकर्याचा पाठीराखा बनतो, तेव्हा महाराष्ट्र फुकट गेल्यात जमा झाला आहे, असंच वाटतं. इतकी अवनती या राज्याची झाली आहे. एकेकाळी महिलेच्या संरक्षणार्थ तिच्या मागे ठामपणे…
मेष (Aries): आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आणि उत्साही असेल. मित्रांशी किंवा प्रियजनांशी भेटीगाठी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आनंदी आणि समाधानी वाटेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. वृषभ (Taurus): कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात काही नवीन जबाबदारी स्वीकारण्याची वेळ येऊ शकते. आर्थिक बाबींमध्ये समाधानकारक स्थिती राहील आणि बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे. मिथुन (Gemini): भावंडांशी संपर्क साधाल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. कुटुंबासोबत आनंदी क्षण घालवाल. कर्क (Cancer): शुभ ग्रहांची साथ मिळाल्याने चांगल्या गोष्टींची सुरुवात होईल. अनेक मार्गातून लाभ होण्याची शक्यता आहे. थोड्या प्रयत्नाने मोठी कामे साध्य होतील. सिंह (Leo): मित्र-मैत्रिणींचे सहकार्य मिळेल. संतती सौख्य लाभेल आणि घरामध्ये शांत…
संगमनेर – देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान, ‘आयर्न लेडी’ स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून, ‘राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्र’ (RGSS) यांच्यावतीने संगमनेर येथे आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर शुक्रवारी (दिनांक ३१ ऑक्टोबर) यशस्वीपणे पार पडले. ‘रक्तदान श्रेष्ठदान’ या उदात्त हेतूने आयोजित या शिबिराला संगमनेरवासीयांनी उस्फूर्तपणे चांगला प्रतिसाद दिला. नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी देखील शिबिर स्थळी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘जीवनदानाचा संकल्प’ करत राहुल गांधी समर्थक संघाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला होता. शिबिरादरम्यान नवीन नगर रस्त्यावरील स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण…
मेष (Aries) – वेळेची गती तुमच्या बाजूने राहील. मोठे गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला आहे. दुपारनंतर खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांकडून आव्हान मिळू शकते, कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा. वृषभ (Taurus) – पाहुण्यांच्या येण्या-जाण्यात वेळ जाईल. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल, ज्यामुळे आनंदी वातावरण राहील, पण बजेट बिघडू शकते. व्यवसायात जास्त मेहनत आणि परिश्रम करावे लागतील. मिथुन (Gemini) – मेहनत आणि परिश्रमाच्या जोरावर तुम्हाला हवे असलेले साध्य करू शकता. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद महत्त्वाचा ठरेल. सध्या कुठेही पैशांची गुंतवणूक करणे टाळा. कामाच्या ठिकाणी आळस टाळा. कर्क (Cancer) – कुटुंबासोबत आनंदात जाईल. कार्यक्षमतेच्या मदतीने तुम्हाला हवे असलेले यश मिळेल. भावनांवर आणि रागावर नियंत्रण ठेवा.…
