Author: अनंत पांगारकर

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील मुळा नदी किनारी असलेल्या शिवप्रभात ट्रस्ट देवस्थानच्या भक्तनिवासात रविवारी (दि. १२ ऑक्टोबर) सकाळी एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने संपूर्ण पठार भागात मोठी खळबळ उडाली आहे. भाऊराव विठ्ठल बाचकर (वय ३५, रा. करकवाडी वावरथ जांभळी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) असे मयताचे नाव आहे. हा खून की घातपात, याचा कसून तपास घारगाव पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मांडवे बुद्रुक येथील मुळा नदीकिनारी असलेल्या शिवमंदिरात रोज सकाळी भाविक दर्शनासाठी जातात. रविवारी सकाळी काही भाविक दर्शनासाठी गेले असता, त्यांना भक्तनिवासातील सभामंडपात भाऊराव बाचकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या डोक्याखाली मोठ्या प्रमाणात रक्त…

Read More

संगमनेर – इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या व डिग्रस येथे बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रगती सखाराम श्रीराम हिची शनिवारी रात्री राज्याचे माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेत तिची आपुलकीने चौकशी केली. यावेळी त्यांनी बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर तीव्र चिंता व्यक्त केली आणि वन विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले. डिग्रस येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालयात शिकणारी प्रगती शनिवारी सकाळी शाळेत जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात प्रगतीच्या मानेला मोठ्या जखमा झाल्या असून ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर सध्या संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीवर बिबट्याने केलेल्या…

Read More

देशातील बिघडत्या सामाजिक वातावरणाने आता अतिरेक गाठला आहे. धार्मिक आणि सामाजिक सलोखा बिघडवणार्‍यांवर सरकारचा कोणताही अंकुश राहिलेला नाही. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश, प्रा. एम. एम. कलबुर्गी यांचा बळी घेणार्‍या शक्तीने टोकाचं पाऊल गाठत आता थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना टार्गेट केलं आहे. खंडपीठापुढे सुनावणी सुरू असताना 75 वर्षाच्या राकेश तिवारीने त्यांच्यावर पायातला बुट फेकला. ही घटना एकट्या गवईंपुरती मर्यादित राहिलेली नाही. ज्यांनी देशातील जनतेला न्याय द्यावा, अशा यंत्रणेच्या प्रमुखावरच बुट फेकला जात असेल तर सामान्यांचं या देशातील स्थान काय? असा साधा प्रश्‍न आहे. गवईंनी या व्यक्तीला माफ केलं…

Read More

मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असून घरात समाधानाचे वातावरण राहील. तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. मुलांबद्दल आणि जोडीदाराबद्दल प्रेमाची भावना वाढेल. बुद्धी आणि विवेक वापरून घेतलेले व्यावसायिक निर्णय यशस्वी होतील. वृषभ (Taurus): दूरदृष्टी आणि चांगले नियोजन तुमच्या संपत्तीत वाढ करेल. तुमच्या यशामुळे कुटुंबाला अभिमान वाटेल. तुम्हाला मौल्यवान वस्तू मिळण्याचे योग आहेत. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. आज तुमचे विचार इतरांना प्रभावीपणे मांडण्याची तीव्र इच्छा असेल. मिथुन (Gemini): आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी बरीच प्रगती कराल, हा सकारात्मक टप्पा आहे. निरोगी खाण्याच्या सवयींमुळे किरकोळ आजारांपासून दूर राहाल. एखादा महत्त्वाचा घरगुती प्रश्न तुमच्या कौशल्याने हाताळावा लागेल. कामामध्ये जास्त घाई…

Read More

संगमनेर – तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. शनिवारी (दि. ११ ऑक्टोंबर) सकाळी दहा वाजेच्या सुमारास आनंदवाडी शिवारात भरधाव चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. याबाबत डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन बबन इघे (वय ३१, रा. खडकवाडी, ता. पारनेर) हे त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून लघुशंकेसाठी थांबले होते. त्याच वेळी दत्तात्रेय देवराम गाडगे (वय ४९, रा. लोणी, ता. राहाता) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आणि हयगयीने चारचाकी वाहन चालवून उभ्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडकेमुळे दुचाकीस्वार सचिन इघे…

Read More

संगमनेर: पोलीस उपाधीक्षकांच्या विशेष पथकाने संगमनेर शहरातील रहेमतनगर परिसरात छापा टाकून गोवंश जातीचे मांस तस्करी करताना रंगेहाथ एका आरोपीला पकडले, तर गोमांसाचा मालक आणि एका वाहनाचा मालक असलेले दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. या कारवाईत सुमारे १७ लाख रुपयांचे गोमांस आणि दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेतील कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (११ ऑक्टोंबर) सकाळी ०७.०५ वाजता पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संगमनेर शहरातील मौलाना आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, रहेमतनगर येथे मोहंमद अतीक रफीक कुरेशी ऊर्फ सोन्या (रा.…

Read More

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील डिग्रस-अंभोरे रस्त्यावर सकाळी शाळेत जाणाऱ्या एका १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची भयानक घटना शनिवारी (दि. ११ ऑक्टोबर) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिच्या मानेला व गळ्याला खोल जखमा झाल्या आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला आणि मुलीचा जीव वाचला. इयत्ता नववीमध्ये शिकणारी ही विद्यार्थिनी सकाळी शाळेत जात होती. डिग्रस गावाजवळ रस्त्यालगतच्या शेतातील गिन्नी गवत व कपाशीच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याने थेट तिच्या मानेला चावा घेऊन तिला फरफटत गवतात ओढून नेले. यावेळी रस्त्याने जात असलेल्या काही नागरिकांनी…

Read More

संगमनेर – काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, माजीमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशातील सहकारी साखर कारखान्यांसाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने यंदा दिवाळीनिमित्त आपल्या सभासदांना मोठे गिफ्ट दिले आहे. कारखान्याने यंदा दरवर्षीपेक्षा दुप्पट, म्हणजेच प्रत्येक सभासदाला ३० किलो मोफत साखर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या साखरेचे वाटप १५ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कारखाना कार्यस्थळावर होणार आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर कारखान्याची वाटचाल सुरू असून, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने नेहमीच शेतकरी, सभासद, उत्पादक आणि कामगार यांच्या हिताला प्राधान्य दिले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-  अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या एका पोलिसाला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे.  विशाल वाघाटे असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ३० वर्षीय तक्रारदाराविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होण्याची तक्रार प्राप्त झाली होती. या गुन्ह्यात योग्य ती मदत करण्यासाठी तसेच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस कर्मचारी विशाल वाघाटे याने तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ८ ऑक्टोबर रोजी प्राप्त झाली. ९ ऑक्टोबरला या तक्रारीची पडताळणी करण्यात आली, यात आरोपी पोलीस वाघाटे यांनी…

Read More

अहिल्यानगर – शहरात विनापरवाना फ्लेक्स लावून शहर विद्रूप करणाऱ्यांवर अहिल्यानगर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रेमदान चौक आणि नागापूर पुलाजवळ अनधिकृत फ्लेक्स लावल्याप्रकरणी मनपाने संबंधितांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी या संदर्भात कठोर भूमिका घेतली असून, ‘परवानगीशिवाय फ्लेक्स लावून विद्रुपीकरण केल्यास यापुढे फौजदारी आणि दंडात्मक अशा दोन्ही स्वरूपाच्या कठोर कारवाया केल्या जातील,’ असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. सावेडी प्रभाग कार्यालयाचे प्रभाग अधिकारी बाळासाहेब लक्ष्मण पवार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, अहिल्यानगर-मनमाड रोडवरील प्रेमदान चौकात रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या लाईटच्या खांबाला ‘मंगलमुर्ती वास्तु प्रा. लि.’ या…

Read More