Author: अनंत पांगारकर

विशेष प्रतिनिधी / मुंबई युती सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना (ठाकरे गट) जमीनदोस्त करण्याचे विधान केल्यापासून राजकारणात एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. महाजनांच्या या विधानाला प्रत्युत्तर देत खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र डागले. ज्यानंतर महाजनांनकडूनही उत्तर देण्यात आले. पण आता मात्र, खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले असून त्यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. गिरीश महाजन हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले सर्वाधिक भ्रष्ट मंत्री आहेत. महाजनांच्या कार्यालयात बसणारा अभिषेक कौल हा एक दलाल असून तो बिल्डर आहे. त्याने सांगितल्याशिवाय महाजन फाइल्सवर सही सुद्धा करत नाही, असा आरोप राऊतांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ…

Read More

मुंबई, ४ जून २०२५: भाजप महायुतीचं सरकार जनतेच्या हिताऐवजी अदानी समूहाच्या फायद्यासाठी अहोरात्र काम करत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. मुंबईतील अनेक महत्त्वाच्या जागा अदानींना दिल्या गेल्या असून, आता फक्त मंत्रालय आणि विधिमंडळच त्यांना देणं बाकी आहे का, असा संतप्त सवाल सपकाळ यांनी विचारला आहे. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, मुंबईतील दोन्ही विमानतळे, धारावी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत डंपिंग ग्राऊंडची जमीन, कुर्ल्यातील ८.५ हेक्टर मदर डेअरीची जमीन आणि वांद्रे येथील एमएसआरडीसीच्या कार्यालयाची जागाही अदानींना देण्यात आली आहे. या सर्व गोष्टी अदानींच्या घशात घालून महाराष्ट्राला काय मिळणार आहे, असा प्रश्न त्यांनी…

Read More

अहिल्यानगर –  अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ४ ते ७ जून या कालावधीत विजांच्या कडकडाटासह वादळे, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा झाडांजवळ उभं राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. गडगडाटी वादळादरम्यान आणि विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांच्यापासून दूर राहावे. तसेच, मोकळं मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत/दिव्यांचे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) संगमनेर तालुका सचिवपदी कॉम्रेड प्रताप सहाणे (सर) यांची पुढील तीन वर्षांसाठी एकमताने फेर निवड करण्यात आली आहे. संगमनेर येथील लालबावटा कार्यालयात आयोजित त्रैवार्षिक परिषदेत ही निवड प्रक्रिया पार पडली, यावेळी पक्षाचे सभासद उपस्थित होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते कॉम्रेड भिका वाघ होते. सुरुवातीला मागील तीन वर्षांच्या कालखंडात दिवंगत झालेले पक्ष सभासद आणि पुरोगामी चळवळीतील नेते व कार्यकर्ते यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर, तंबाखू कामगार युनियनचे सरचिटणीस आणि फॉरेस्ट वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड ॲड. ज्ञानदेव सहाणे यांनी प्रास्ताविक केले. भाकपचे सेक्रेटरी कॉम्रेड प्रताप सहाणे यांनी मागील तीन वर्षांतील घडामोडींचे अहवाल वाचन केले. यावेळी त्यांनी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर तालुक्यातील जोर्वे ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या गैरकारभार आणि भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थ आता अधिकच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मासिक सभा आणि ग्रामसभांमधील अनियमिततेसह एप्रिल २०२२ ते मार्च २०२५ या काळातील १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या कामांमध्ये वस्तू खरेदीतील गैरव्यवहारांबाबत ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे रीतसर तक्रार दाखल केली असून, गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. या प्रकरणाची तातडीने आणि निष्पक्ष चौकशी न झाल्यास तीव्र जनआंदोलन व उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांच्या आरोपानुसार, ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार झाले आहेत. २०२२-२३ या वर्षात तत्कालीन उपसरपंच गोकुळ दिघे आणि ग्रामविकास अधिकारी यांनी सुमारे रु. ८.५३ लाखांचा अपहार केल्याचा आरोप आहे. यात बाकडे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी  सकल धनगर समाजाच्या वतीने सुकेवाडी-खांजापूर गावात यंदा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंती उत्साहात साजरी झाली असली तरी, यावर्षी जयंतीला 300 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने गावातील तरुणांनी एकत्र येत एका वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमामागे समाजातील महिला, वृद्ध आणि तरुणांना उत्सवात सहभागी करून घेण्याचा आणि त्यांना अध्यात्माची आवड निर्माण करण्याचा उद्देश होता. यासाठी कोणत्याही प्रकारच्या डीजे किंवा साऊंड सिस्टीमवर खर्च न करता, राजकारण विरहित जयंती साजरी करण्याचा निर्णय तरुणांनी घेतला. जयंतीच्या दिवशी सकाळी 8.30 वाजता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.…

Read More

पुणे –  ‘लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना अखेर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनीच पूर्णविराम दिला आहे. रविवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी या योजनेतील त्रुटींची कबुली दिली. “लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणे समोर येत असून, या योजनेत अनेक चुका झाल्या आहेत. सरसकट सर्वांना लाभ देणे चुकीचे होते,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. पवार यांनी यावेळी योजनेच्या अंमलबजावणीतील आव्हानेही स्पष्ट केली. लाडकी बहीण योजना लागू केली, तेव्हा निवडणुकीमुळे अर्ज पडताळणीसाठी कमी अवधी होता. निवडणूक आणि आचारसंहितेमुळे अर्ज तपासायला वेळ मिळाला नाही, असे त्यांनी नमूद केले. या योजनेसाठी मासिक उत्पन्न जास्तीत जास्त वीस हजार आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज –  बनावट वकील स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय ३२) हिने एका महिलेकडून ५ लाख ३० हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठ दिवसांत स्नेहल कांबळेवर दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. यामुळे तिने केलेल्या आणखी फसवणुकीचे गुन्हे समोर येण्याची शक्यता वाढली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. खंडणी स्वीकारताना रंगेहाथ पकडली… स्नेहल कांबळेला यापूर्वी एका शेतकऱ्याकडून खंडणी स्वीकारताना लोणी काळभोर (ता. हवेली) पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. तिच्या घराच्या झडतीमध्ये अनेक संशयास्पद कागदपत्रे आढळली. यानंतर, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी नागरिकांना आवाहन केले होते की, ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी एम.बी.ए. महाविद्यालयातील प्रतिभावान विद्यार्थी प्रज्वल दीपक साळुंके याची कॅरिबियन बेटांवरील सेंट किट्स अँड नेव्हिस येथे एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये तब्बल $180,000 (सुमारे ₹15 लाख) वार्षिक पॅकेजवर नोकरीसाठी निवड झाली आहे. प्रज्वलने आपले उत्कृष्ट शैक्षणिक प्रदर्शन, प्रभावी नेतृत्वगुण आणि व्यावसायिक कौशल्याच्या बळावर ही महत्त्वपूर्ण संधी प्राप्त केली आहे. या यशाबद्दल बोलताना प्रज्वलने आपले श्रेय अमृतवाहिनी एम.बी.ए. महाविद्यालयाला दिले. तो म्हणाला, अमृतवाहिनी एम.बी.ए. मध्ये विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिकच नव्हे, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास केला जातो. महाविद्यालयात नियमितपणे विविध क्षेत्रांतील तज्ञांचे मार्गदर्शन, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, मॉक इंटरव्ह्यू यांसारखे अनेक उपक्रम राबवले जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक…

Read More

राजकारणात कसंही वागलं तरी काहींना त्याचं काहीच वाटत नाही. निर्ढावलेले तर मी नाही त्यातली.. अशा प्रकारचा देखावा करतात आणि झालं गेलं, असं मानून चक्क खोटारडेपणा करतात. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी उपरती झालेले अनेकजण आहेत. ज्यांनी सोबतीच्या साथीदारांना आपलं काम भागल्यानंतर वार्‍यावर सोडलं आणि पुन्हा तोंड वर करून स्वत:ला निर्दोष असल्याचा स्वत:च निवाडा दिला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तोच मार्ग अवलंबलेला दिसतो आहे. सत्तेत चढ-उतार दिसू लागले की त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचं अवमुल्यन झाल्याची स्वप्न पडतात. हे करायला परिस्थिती भाग पाडते, असं ते बेमालूम कबुलही करतात. सत्ता हवी असली की हातावर हात ठेवून थांबता येत नाही, म्हणून मग अवमुल्यन करावं लागतं असं…

Read More