Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर / शिर्डी:  भोजापूर चारीच्या विस्तारीकरणासाठी ३० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात या चारीचा समावेश झाल्याने या भागातील पाणीप्रश्न लवकरच कायमस्वरूपी सुटणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या चाळीस वर्षांपासून रखडलेल्या भोजापूर चारीला अखेर पाणी मिळाले असून, यानिमित्ताने संगमनेर तालुक्यातील तिगाव येथे जलपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री विखे पाटील बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, जलसंधारण विभागाचे अभियंता हरीभाऊ गीते, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तसेच परिसरातील…

Read More

मुख्यमंत्र्यांसह सर्वांशी चांगले संबंध, त्यामुळे कोणतीही विकासकामे थांबणार नाहीत: आमदार सत्यजित तांबे महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर, प्रतिनिधी: भारताची खरी ओळख एकता आणि विविधतेमध्ये आहे. विविध जाती-धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात, आणि तिरंगा ध्वज, देश, आणि संविधान हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. काही लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी भगवा, हिरवा किंवा निळा ध्वज घेऊन समाजात जातीभेद निर्माण करत आहेत. अशा शक्तींना रोखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. राजकारण हे नेहमीच तत्त्व आणि विकासावर आधारित असावे, असेही ते म्हणाले. आज (रविवारी) संगमनेर खुर्द येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर देवस्थान, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, लोकशाहीर…

Read More

सत्ताधारी केवळ मोदी आणि शहा यांचीच लाळ घोटत होते. तथापि हल्ल्याची जबाबदारी ही सर्वार्थाने मोदी-शहा यांच्यावरच असल्याने या दोघांना मर्यादा पडल्या होत्या. त्यात दिल्लीत संसदेचं अधिवेशन असताना पंतप्रधान देश सोडून जातो, आणि संसदभवनात असताना सभागृहात अनुपस्थित राहतो हे मोदींनीच देशाला दाखवून दिलंय.   पहेलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत पार पडत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाने सरकारची कधी नव्हे इतकी बेईज्जत झाली. इभ्रत जावी अशा प्रकारे हल्ल्यावर हल्ले सोसण्याची आफत सरकारवर आली. गेल्या 11 वर्षात मोदी सरकारची संसदेत इतकी फजिती प्रथमच झाली. मोदी.. मोदी…च्या घोषणा देणारे मौनी बनले होते. विरोधकांच्या भाषणात अडथळे आणणार्‍यांना आता कळून चुकलं होतं. या चर्चेत सत्तेपुढे विरोधकच सरस ठरले. नको…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, पुणे:  हडपसर परिसरात मित्राच्या खुनाची खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीदरम्यान, त्यानेच रागाच्या भरात आपल्या मित्राचा खून केल्याची कबुली दिली. आज पहाटे किसन राजमंगल सहा (वय २०, मूळचा बिहार) याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून सांगितले की, त्याच्या मित्राला, रविकुमार शिवशंकर यादव (वय ३३), तीन ते चार अनोळखी व्यक्तींनी लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. हडपसर येथील उंड्री-हांडेवाडी भागात ही घटना घडली असून, रविकुमार रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. या माहितीनंतर तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी रविकुमारला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनेची माहिती देणाऱ्या किसनकडे अधिक चौकशी केली. सुरुवातीला त्याने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी:  जे लोक स्वतः काहीही काम करत नाहीत, तेच चांगल्या कामांना विरोध करून जनतेची दिशाभूल करत आहेत, त्यांनी किती झाडे लावली अशी टीका करत सोशल मीडियाचा वापर करून इतरांबद्दल खोट्या गोष्टी पसरवून स्वतःची स्तुती केली जात आहे. देशभर काही पक्षांकडून असाच कार्यक्रम राबवला जात असल्याचे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. मालदाड (संगमनेर) मायंबा डोंगर येथील श्री क्षेत्र कानिफनाथ मंदिर परिसरात जयहिंद लोकचळवळ आणि अमृत उद्योग समूहातर्फे आयोजित २० व्या ‘दंडकारण्य अभियाना’च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सरपंच गोरख नवले, अजय फटांगरे, रामहरी कातोरे,…

Read More

मुंबई, विशेष प्रतिनिधी: मालमत्ता करावरील शास्ती माफीसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या अभय योजनेच्या अंमलबजावणीत निर्माण होत असलेल्या तांत्रिक अडचणींबाबत आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शुक्रवारी घेतलेल्या या भेटीत त्यांनी योजनेचा लाभ राज्यातील नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना वेळेत मिळत नसल्याचे त्यांनी शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले आणि प्रणालीतील तांत्रिक त्रुटी तात्काळ दूर करण्याची मागणी केली. योजनेच्या अंमलबजावणीत नेमके काय अडथळे? राज्य सरकारने 50% शास्ती माफीसाठी अनेक नगरपरिषदांना परवानगी दिली आहे. संगमनेर नगरपरिषदेला 28 जुलै 2025 रोजी परवानगी मिळाल्यानंतरही IWBP सॉफ्टवेअर प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे ही योजना प्रभावीपणे लागू करता येत नाहीये. या अडचणींमुळे नागरिकांमध्ये…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर तालुक्यातील निमोण येथील भूमिपुत्र आणि सध्या येवला येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले संदीप पुंजा मंडलिक यांना त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी तिसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांच्या हस्ते त्यांना हे प्रतिष्ठित पदक प्रदान करण्यात आले. पोलीस निरीक्षक मंडलिक यांनी गडचिरोली येथे नक्षलवाद्यांविरुद्ध केलेल्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे. २०१३ ते २०२४ या काळात ते गडचिरोली येथे कार्यरत असताना, त्यांनी खोब्रामेंढा गावाजवळच्या घनदाट जंगलात झालेल्या एका मोठ्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी:  उत्तर अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या भंडारदरा धरणाला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक शताब्दी महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे मुख्य सचिव, तसेच जलसंपदा आणि वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे. या समितीचा मुख्य उद्देश शताब्दी महोत्सवाचे नियोजन करणे, धरणाच्या संवर्धनासाठी उपाययोजना सुचवणे, आणि परिसरातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधणे हा आहे. भंडारदरा धरण, ज्याला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय असेही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त नाशिक: नाशिकमधील एसएमबीटी हॉस्पिटलने आयोजित केलेल्या ‘आरोग्यसाधना’ शिबिराचा नुकताच यशस्वी समारोप झाला आहे. गेल्या १० वर्षांपासून ग्रामीण भागातील लोकांसाठी हे शिबिर आयोजित केले जाते. यावर्षीच्या शिबिराने अनेक विक्रम मोडत यशाची नवीन उंची गाठली आहे. शिबिराची लक्षवेधी आकडेवारी गेल्या ३० दिवसांच्या कालावधीत, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह राज्यातील १४ जिल्ह्यांतील ३० हजारांहून अधिक रुग्णांना या शिबिराचा लाभ झाला आहे. दररोज सरासरी १००० रुग्णांची तपासणी करण्यात आली. हे फक्त आकडे नाहीत, तर हजारो रुग्णांना मिळालेल्या उपचारांचे आणि आशेचे हे प्रतीक आहे, असे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. अत्याधुनिक उपचार आणि सेवा या शिबिरात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना (MJPJAY), प्रधानमंत्री…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त पुणे: पुणे शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी ‘कोकेन’ म्हणून जप्त केलेला पदार्थ प्रत्यक्षात कोकेन नव्हता. या दाव्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नेमकं प्रकरण काय? 27 जुलै रोजी पहाटे खराडी येथील ‘स्टे बर्ड अझुर सूट’ हॉटेलमध्ये पुणे पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 5 पुरुष आणि 2 महिलांना अटक केली. अटकेत असलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ.…

Read More