Author: अनंत पांगारकर
बुधवार, दि. २५ जून – अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील सीताराम सारडा शाळेच्या आवारात बुधवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादातून एका १४ वर्षीय विद्यार्थ्याचा त्याच शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने चाकूने हल्ला करून खून केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी आणि आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन आरोपीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यात आरोपीने चाकूहल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, स्थानिक गुन्हे…
संगमनेर, प्रतिनिधी: रस्त्याच्या बाजूपट्ट्यावर अतिक्रमण करून विनापरवाना संरक्षक भिंत आणि पाण्याच्या टाकीचे बांधकाम केल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोल्याच्या उप अभियंत्यांनी चंदनापुरी (संगमनेर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना एका नोटीसद्वारे चांगलाच दणका देत सात दिवसाच्या आत अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश बजावले आहे. शाळेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या अतिक्रमणाविरुद्ध सार्वजनिक बांधकाम विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. या रस्त्यावर ४/४०० ते ५/४०० किलोमीटर दरम्यान झालेल्या बेकायदेशीर बांधकामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणधारकांना ही नोटीस बजावली असून, नोटीसच्या माध्यमातून ही अतिक्रमणे तातडीने काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. २, अकोले यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या पत्रानुसार, चंदनापुरी जिल्हा परिषद प्राथमिक…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन करत आमदार अमोल खताळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून संगमनेर शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणणार असल्याचे व नगर विकास विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत असून त्यांचे संगमनेरवर विशेष प्रेम असल्यामुळे हे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन केले. महाराष्ट्र अग्निशमन सुरक्षा अभियानांतर्गत महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेर नगरपालिकेला मिळालेल्या नवीन मिनी रेस्क्यू अग्निशमन (गुरखा) वाहनाचा लोकार्पण सोहळा आमदार खताळ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक ॲड. श्रीराम गणपुले, माजी नगरसेवक जावेद जाहागीरदार, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ राहाणे, शहर अध्यक्ष विनोद सूर्यवंशी, आरपीआयचे (आठवले) शहराध्यक्ष…
महाराष्ट्र संवाद न्यूज जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात सुमारे १२०० फूट खोल दरीत दोन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासातून दोघांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. मृतांमध्ये श्रीगोंद्याचे तलाठी आणि एका महाविद्यालयीन तरुणीचा समावेश आहे. या घटनेमुळे दोघांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मृत व्यक्तींची नावे रामचंद्र साहेबराव पारधी (वय ४०) आणि महाविद्यालयीन तरुणी रुपाली संतोष खुटाण (आंबोली, ता. जुन्नर) अशी असून पारधी हे अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत आहेत. जुन्नर पोलिस आणि रेस्क्यू टीमने कठीण परिस्थितीत मृतदेह दरीतून बाहेर काढले. दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी…
संगमनेर, प्रतिनिधी: दूधगंगा पतसंस्थेतील ८१ कोटींच्या अपहाराचा फटका बसलेल्या ठेवीदारांनी आपल्या कष्टाचे पैसे परत मिळावेत यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दूधगंगा ठेवीदार संघर्ष समितीने स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी पतसंस्थेच्या कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा पवित्रा घेतला असून, यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह (ACB) प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. भाऊसाहेब कुटे याच्या बेहिशेबी मालमत्तेच्या चौकशीची मागणी… संघर्ष समितीच्यावतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांना पाठवलेल्या निवेदनात, ३२ वर्षांपासून दूधगंगा पतसंस्थेचे तत्कालीन संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कुटे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मालमत्तेची कसून चौकशी करून ती जप्त करावी आणि त्यातून ठेवीदारांचे पैसे परत मिळावे, अशी…
संगमनेर, प्रतिनिधी: संपूर्ण देशासाठी सहकाराचे आदर्श तत्त्वज्ञान आणि विचार देणारे स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे अमूल्य योगदान आणि त्यांच्या कार्याचा, तसेच राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली देशासाठी मार्गदर्शक ठरलेल्या अमृत उद्योग समूहातील सहकाराचा समावेश आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. येथील सहकार चळवळीचे महती आणि दूरदृष्टीचे महत्त्व अधोरेखित करणारी ही बाब संगमनेरच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान ठरली आहे. येथील सहकाराचा अभ्यासक्रमात समावेश संगमनेरकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची माहिती संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी दिली. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार, वाणिज्य, विज्ञान आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांना आता संगमनेरमधील सहकाराचे हे महत्त्वपूर्ण पैलू अभ्यासता येणार…
संगमनेर, प्रतिनिधी: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात केलेल्या कथित विधानांवरून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या वादात आता संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी उडी घेतली असून, त्यांनी अबू आझमींना थेट इशारा देत वारी ही महाराष्ट्राची अस्मिता असल्याचे ठणकावून सांगितले आहे. आ. खताळ यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून एक सविस्तर ट्विट करत आझमी यांच्या वक्तव्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. https://x.com/amolkhatalpatil/status/1937066759900839949?t=r1JBwjRagfUHXyT3UM6lFg&s=19 आ. खताळ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, “वारी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. पंढरीची वारी ही शिस्तप्रिय असते. हजारो वारकरी ऊन, वारा, पावसाची सर झेलत, पायी चालत असतात.” वारीमधील शिस्तीचे दाखले देत त्यांनी लिहिले की, “ट्रॅफिक जॅम…
संगमनेर, २३ जून – प्रतिनिधी: अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे समूळ नष्ट करण्याचे आदेश दिल्यानंतर, संगमनेर शहर पोलिसांनी प्रवरा नदीकिनारी संगमनेर खुर्द गावच्या शिवारात सुरु असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत १० जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोटारसायकली, मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ५,११,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये अवैध धंद्यांची चर्चा सुरू होती. विशेषतः, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने दोन दिवसांपूर्वीच संगमनेरमधील दोन मोठ्या मटका चालकांवर कारवाई केली होती. असे असतानाही, शहरात अवैध धंदे सर्रासपणे सुरू असल्याने, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर…
अकोले, २३ जून- प्रतिनिधी समाजासाठी दिशादर्शक ठरणारी मदत ही एक उत्कट आणि आध्यात्मिक समाधान देणारी बाब आहे, असे प्रतिपादन नगर विकास मंत्रालय, सहसचिव विजय चौधरी यांनी केले. रविवारी (दि. २२) अकोले येथील अगस्ती मंदिरात आयोजित गुरुकुलच्या ५४ हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रसंगी ते बोलत होते. स्व. शेषराव गोडगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गोडगे परिवाराकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी व्यासपीठावर अगस्ती देवस्थान ट्रस्ट समितीचे खजिनदार किसनशेठ लहामगे, विश्वस्त रामनाथ मुर्तडक, राधाकृष्ण आरोटे, वनवासी कल्याण आश्रमाचे रामदास सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते सुनील कडलग, शिक्षणशास्त्र महाविद्यालय संगमनेरच्या प्रा. मंगल गोडगे, उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग, मंदा सोनवणे आदी मान्यवर उपस्थित…
महाराष्ट्र संवाद न्यूज- १२ वीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांच्या मारहाणीत १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. साधना धोंडिराम भोसले असे मृत मुलीचे नाव असून, या प्रकरणी शिक्षक असलेले तिचे वडील धोंडिराम भगवान भोसले यांना खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेलकरंजी येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक असलेले धोंडिराम भोसले यांची मुलगी साधना १० वी मध्ये ९२.६०% गुण मिळवून शाळेत पहिली आली होती. तिला डॉक्टर बनवण्याचे कुटुंबीयांचे स्वप्न होते आणि त्यासाठी तिची खासगी शिकवणी सुरू होती. नुकत्याच झालेल्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडील धोंडिराम चिडले होते. शुक्रवारी रात्री (२१ जून) धोंडिराम यांनी साधनाला कमी गुणांबद्दल विचारणा…
