Author: अनंत पांगारकर

मंगळवार, २४ डिसेंबर अहिल्यानगर – न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवत राज्यात बहुतांश ठिकाणी बेकायदेशीर फ्लेक्सचा सुळसुळाट झाला आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात बॅनर, फलक, मोठे जाहिरात बोर्ड लावल्याचे प्रकार समोर आल्याने अशा अनधिकृत फलकांवर व फ्लेक्स बोर्डवर महानगरपालिकेमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील संगमनेर नगरपरिषद अशी कारवाई कधी करणार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.गेल्या महिनाभरात महानगरपालिका प्रशासनाने १२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर ७११ फलकांवर कारवाई करत ३४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ही माहिती दिली. अनधिकृत फ्लेक्स बोर्ड संदर्भात कारवाईसाठी न्यायालयाने आदेश दिलेले…

Read More

मंगळवार २४ डिसेंबर संगमनेर – येथील शांती फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्ष व माजी नगराध्यक्षा दूर्गाताई तांबे यांनी पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा केली. ५ जानेवारीला संगमनेरमध्ये विविध मान्यवरांचे उपस्थितीत पुरस्कारार्थींचा सन्मान केला जाणार आहेत. नाट्य क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल आणि मराठी, हिंदी विविध दूरचित्र वाहिन्यांवरील मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे उलटा चष्मा फेम डॉ. राजेश आहेर यांना नाट्य क्षेत्रासाठीचा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. तमाशा क्षेत्रात योगदान देऊन ग्रामीण व शहरी जनतेचे मनोरंजन करतानाच प्रबोधनाची परंपरा चालवणारे जेष्ठ कलावंत आणि महाराष्ट्र राज्य लोकनाट्य मंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांना कांताबाई सातारकर…

Read More

मंगळवार, २४ डिसेंबर  एका सॉफ्टवेअर इंजिनियरने आपल्या पत्नीसोबत केलेल्या विचित्र कृत्यामुळे पती-पत्नीच्या नात्याला तडा गेला आहे. पतीच्या विचित्र मागण्या आणि नको त्या गोष्टीसाठी केलेली जबरदस्ती आणि त्याही पुढे जात ओलांडलेल्या सर्वच मर्यादांमुळे कल्याणमध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. सोहेल शेख हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. कल्याण पश्चिमेला तो राहातो. छत्रपती संभाजीनगरमध्ये राहाणाऱ्या एका तरुणीबरोबर त्याचा जानेवारी २०२४ मध्ये विवाह झाला होता. हा त्याचा दुसरा विवाह होता. लग्नानंतर तो दुसऱ्या पत्नी बरोबर कल्याणमध्ये राहत होता. लग्नाला दोन तीन महिने झाल्यानंतर सोहेल हा आपले रंग दाखवू लागला. तो पत्नीला त्रास देवू लागला. पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी त्याने पत्नीकडे माहेरून पंधरा लाख रुपये आणण्याची…

Read More

अहिल्यानगर दि.२३ – जिल्हा विकास आराखड्याबाबत जिल्हा वार्षिक योजनेतील राखीव निधीचा विनियोग करताना विविध योजनांचे अभिसरण करून आर्थिक व सामाजिक उद्दिष्टे पूर्ण करण्यावर आणि विकास आराखड्यात रोजगार निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांवर भर द्यावा, अशा सूचना नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसामुद्रे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. गेडाम म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाला चालना देणाऱ्या कामांचा प्राधान्याने विचार व्हावा. विविध योजनांच्या अभिसरणाद्वारे विकासाचे…

Read More

परभणी, दि. २३ डिसेंबर  परभणीतील तरुण सोमनाथ सुर्यवंशी हा संविधानाचे रक्षण करणारा होता. तो दलित असल्यानेच त्याची हत्या करण्यात आली आहे. हा पोलीस कोठडीतील मृत्यू असून सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणी येथे सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे २० ते २५ मिनिटे संवाद साधला. परभणीतील घटनेची सर्व माहिती जाणून घेतली व कुटुंबाला धीर दिला. सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी यांचा कोठडीतील मारहाणीमुळे मृत्यू झाला आहे.…

Read More

सोमवार २३ डिसेंबर  संगमनेर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेली संजय गांधी निराधार योजनेसह विविध प्रकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांची प्रकरणे गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित ठेवण्यात आली आहे. गोरगरीब, वृद्ध व निराधार लाभार्थ्यांना दिलासा मिळावा यासाठी ही प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांची भेट घेत केली आहे. या मागणीचे निवेदन संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना सोमवारी देण्यात आले आहे. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.…

Read More

सोमवार, २३ डिसेंबर  श्रीरामपूर – श्रीरामपूरमध्ये मटका व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी लाच मागितल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी दोघांना श्रीरामपूर न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राहुल महादेव नरवडे, गौतम शंकर लगड व पोलीस नाईक रघुवीर ओंकार कारखीले या पोलीस कर्मचाऱ्यांवर लाच लुचपत प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस हवालदार राहुल नरवडे व गौतम लगड यांनी ॲड. एजाज पठाण व ॲड. पंकज म्हस्के यांच्यामार्फत श्रीरामपूर न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. साळवे यांच्यासमोर…

Read More

सोमवार, २३ डिसेंबर नाशिक – राज्याचे नवे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची अहिल्यानगर जिल्हा ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन (सर्वांसाठी मानवाधिकार) या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये भेट घेत त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या. संघटनेच्या माध्यमातून राज्यभर मानवी मूल्यांचे जतन व्हावे व सर्वांना न्याय मिळावा या भावनेने काम केले जात असताना मानवाधिकार संघटनेच्या या कामकाजामध्ये झिरवाळ यांचे पदाधिकाऱ्यांना नेहमी सहकार्य मिळत असते. नासिक येथील समाजसेवक व संस्थापक अध्यक्ष वसीम सय्यद (गुड्डू भाई) यांच्यामार्फत या संस्थेचे काम सुरू आहे. संघटनेच्या कामकाजासाठी सातत्याने मंत्रालय किंवा शासकीय विभागामध्ये सर्वसामान्य माणसांना न्याय हक्कासाठी लढा द्यावा लागतो. समाजातील सर्व शहरातील गोरगरीब व पिळवणूक झालेल्या नागरिकांना न्याय…

Read More

रविवार, २२ डिसेंबर  संगमनेर – संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी परिसरात वन विभागाच्या आखत्यारीत येणाऱ्या जंगलामध्ये शनिवारी रात्री शरीराचे लचके तोडलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या तरुणाचा घातपात झाला की बिबट्याच्या हल्ल्यात याचा मृत्यू झाला याची माहिती अद्याप समोर आली नाही मात्र बिबट्याच्या हल्ल्यामध्ये या तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. रामनाथ सूर्यभान गुरकुले (वय ३४, रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) असे या तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी (संगमनेर) येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेह लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या तरुणाच्या…

Read More

कथित मतांच्या आधारे राज्यात प्रचंड बहुमताची सत्ता प्राप्त होताच यापुढे बदला नव्हे बदल करणारी सत्ता राबवली जाईल, असं आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. हे आश्‍वासन त्यांच्या बुध्दीचातुर्याप्रमाणे सत्ता सुरू होताच विरळ होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. मिळालेल्या बहुमताचा आधार घेत आपल्याला नको असलेल्या व्यक्ती, संस्था यांचा काटा काढण्याचा पध्दतशीर मार्ग अवलंबला जात आहे. केंद्रातल्या मोदी सरकारने आणि २०१४ नंतर राज्यातल्या युती सरकारने शहरी नक्षलवादाच्या नावाखाली केलेल्या कारवाया कशा कट कारस्थानी होत्या हे स्पष्ट दिसलं. खर्‍या नक्षलींना आवर घालण्याचा आव असला तरी प्रत्यक्षात सत्तेला जाब विचारणार्‍यांची तोंडं बंद करण्याचा हेतू स्पष्ट दिसत होता. सत्तेला जाब विचारणार्‍यांची मुस्कटदाबी करण्यासाठी घातक…

Read More