Author: अनंत पांगारकर
निवडणूक संपली आता महागाई वाढीच्या दे धक्का… लालपरीचा प्रवास महागणार! तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता!
रविवार, ०१ डिसेंबर – मुंबई राज्यभरात सातत्याने महागाईत वाढ होत असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने आणलेल्या योजनांमध्ये आता बदल सुरू केला आहे. रविवारी झालेल्या गॅस सिलेंडरच्या दरवाढीपाठोपाठ आता लालपरीचा प्रवास देखील महागणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. सोनं-चांदी, भाजीपाला, फळे, साबण, खाद्य तेल अशा कित्येक गरजेपयोगी लागणाऱ्या वस्तूंचे भाव वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आता चांगलीच कात्री बसणार आहे. पंधरा टक्के वाढ होणार – समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांमध्ये सर्वसामान्यांचे लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी बसच्या तिकिटामध्ये कोणतीही दरवाढ केली गेली नसल्याने विधानसभा निवडणूक संपतात एसटी महामंडळाकडून १४.१३ टक्के दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. यामुळे लालपरीच्या तिकीट दरात आता…
महायुतीने विधानसभेच्या २३४ जागा पटकवत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत लागलेल्या निकालामध्ये ५०%अधिक मते घेत बाजी मारली. महाविकास आघाडीला फक्त ४९ जागेवरती समाधान मानावे लागले. युती सरकारच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी असल्याचे दिसून येते. तीन महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये ४८ पैकी ३० जागा मिळवलेल्या विरोधक असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा झटका बसल्याचे मानले जाऊ लागले आहे. खरंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करून निवडणूक प्रक्रिया बदलण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. खरतर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हरियाणा निवडणुका पार पडल्या, त्यात जनता अनेक वर्ष सरकार असल्यामुळे व प्रबळ गुज्जर व जाट समाज भाजप सरकारवर नाराज असल्याच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. परंतु भाजपाच्या…
रविवार ०१ डिसेंबर पूर्वी खेड्यात बाई ठेवणे हा प्रकार चालायचा. म्हणजे तिला सोप्या भाषेत “रखेल” म्हंटले जाई. यात जास्त करून नाचगाणे करणाऱ्या नायकिणी असत. त्याकाळी नाचगाणे करणाऱ्याना साधे पोटही भरता येत न्हवते आणि त्यातच या बायकांचा जन्म अठरा विश्व दारिद्र्यातला असे. आई बाप जन्म देऊन कुठेतरी कायमचे परागंदा झालेले असत. मग त्यांना भुरळ पाडून फसविले जाई. आणि त्याही पोट भरण्याच्या आशेने अशा लोकांकडे जन्मभर रखेल म्हणून रहात. मग रंगेल असणारी लोकं आपल्या चिरेबंद वाड्यातल्या भक्कम भिंतीच्या आत या बायकांना आयुष्यभर भोगायला ठेवायचे. अशा भल्या मोठ्या तीस चाळीस खणी वाड्यात दर्शनी कडेपाट असलेला सोपा असे. खुंटीवर तलवारी, बंदुका टांगलेल्या असत. खाली…
रविवार, ०१ डिसेंबर – मुंबई विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यांनी बेशिस्त वर्तन करून पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर कडक करवाई करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. बेशिस्त वर्तन करणाऱ्या या पदाधिकाऱ्यांवर प्रदेश काँग्रेसकडून कारवाईच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. दोन दिवसात मागविला खुलासा – नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार बंटी शेळके यांना काँग्रेस पक्ष व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर खोटे आरोप करून पक्षशिस्तीला काळीमा फासला असून त्यांना निलंबित का करू नये यासंदर्भात २ दिवसांत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. टिळक भवनात बैठक – विधानसभा निवडणुकीच्या निकालावर विचारमंथन करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे दिनांक…
राज्य विधानसभेची निवडणूक एकदाची पार पडली. ती कशी झाली, यासंबंधी या राज्यातील प्रत्येक व्यक्ती भरभरून बोलते आहे. निवडणूक लागली तेव्हा बोलत होती, मतदान करायला जाताना बोलत होती आणि निवडणुकीचा निकाल लागल्यावरही बोलते आहे. ज्याच्या त्याच्या तोंडी विद्यमान सत्ताधार्यांच्या नावाने दोष आहे. ते पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत, असंच या प्रत्येकाचं मत आहे. ज्याची नोंद ना निवडणूक आयोगाने घेतली ना आयोगाच्या इव्हीएमने घेतली. सारं काही ठरवून होत होतं. सत्ताधार्यांचा आयोगावर प्रचंड दबाव असल्याने आयोग मुर्दाड बनलं होतं. ‘बटेंगे तो कटेंगे’पासून सुरू झालेला प्रचार सार्या मर्यादा पार करणारा ठरला. तरीही आयोगाने दखल घेतली नाही. यामुळे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पुरती रसातळाला गेली. ती…
शनिवार ३० नोव्हेंबर – पुणे राज्यघटना आणि लोकशाहीच्या सुरू असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी, निवडणुकांचा संदर्भ देऊन बाबा लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात असल्याच्या निषेर्धार्थ ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी गुरुवारी आत्मक्लेष उपोषण सुरू केले होते. ठाकरेंनी सोडले आढावांचे उपोषण – महात्मा फुले वाडा येथे सुरू असलेल्या या आत्मक्लेष आंदोलनावेळी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सकाळी आढाव यांची भेट घेतली. त्या पाठोपाठ सायंकाळी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आढाव यांची भेट घेत केलेल्या विनंतीनंतर ठाकरेंच्या हस्ते पाणी पिऊन आढाव यांनी आपले आत्मक्लेष आंदोलन मागे घेतले आहे. बाबा आढाव हे ९४ वर्षाचे आहेत. यांची उपस्थिती -…
शनिवार ३० नोव्हेंबर – संगमनेर संगमनेरमधून महायुतीचे उमेदवार निवडून आले आहे. उमेदवाराचे अभिनंदन करणारे फलक शहरासह तालुक्यात सर्वत्र लागले असून या फलकावर महायुतीचे प्रमुख नेते असलेले रामदास आठवले यांचे छायाचित्र नसल्याने आठवले गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कैलास कासार, आशिष शेळके यांचा सवाल – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत संगमनेर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल खताळ निवडून आले आहे. महायुतीचा धर्म पाळत आम्ही त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले, त्यांच्या विजयात आमचाही महत्त्वाचा वाटा आहे. मात्र शहर आणि तालुक्यात लागणाऱ्या कोणत्याही बॅनरवर आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांचे छायाचित्र नसल्याने महायुतीला आठवले यांचा विसर पडला का असा सवाल रिपब्लिकन…
शनिवार, ३० नोव्हेंबर – मुंबई राज्यात महायुतीसाठी स्पष्ट बहुमत मिळून आठवडा उलटला आहे तरी देखील नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झालेला नाही. यामुळे महायुतीत मोठ्या प्रमाणात धूसपुस सुरू असल्याचे समोर येत आहे. गृहमंत्रीपदावर आडून असलेल्या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य चार मंत्र्यांच्या नावाला आता भाजपने विरोध केल्याचे समोर येत आहे. शिंदे गटाकडून कोणाला संधी द्यायची याचा निर्णय देखील भाजपच घेत असल्याचे समोर आल्याने शिंदे यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. फडणवीसच मुख्यमंत्री – महायुतीचे मुख्यमंत्रीपद कोणाच्या गळ्यात पडणार? यावरून सत्तेवर येणाऱ्या महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच दिसत आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीतून होणार…
शनिवार, ३० नोव्हेंबर हल्ली निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही मूल्य उद्ध्वस्त होत असल्याची टीका ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी केली. तसेच या प्रकाराचा निषेध म्हणून ९५ वर्षीय योद्धा अर्थात डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन पुकारले आहे. शनिवारी तिसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरूच होते. शरद पवारांनी घेतली भेट – दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सकाळी डॉ. बाबा आढाव यांची भेट घेतली. आढाव यांच्या आंदोलनाला राज्यातून पाठिंबा मिळत असून, डॉ. आढाव यांच्या समर्थनार्थ शनिवारी राज्यातील जिल्ह्यांमध्येही असेच आत्मक्लेश आंदोलन करण्यात येत आहे. आज उपोषण थांबविणार – डॉ. आढाव यांच्याबरोबरच सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार,…
विशेष प्रतिनिधी | मुंबई राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तरीही नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होत नसल्याने एकच चर्चा होत आहे. तत्पूर्वी शिवसेना शिंदे गटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदावर अडून बसले आहेत. गृहमंत्रिपद मिळालं तरच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार आहेत, अन्यथा उपमुख्यमंत्रिपद हे शिवसेना शिंदे गटातील दुसऱ्या एखाद्या वरिष्ठ नेत्याला मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला मात्र गृहमंत्री पदावर दावा – विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं आहे. १३२ जागा जिंकून भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तसेच भाजपला आठ अपक्ष आमदारांनी देखील पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे…
