Author: अनंत पांगारकर
बुधवार, १६ ऑक्टोंबर अहिल्यानगर – विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांना आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्या विहित वेळेत मिळाव्यात यासाठी सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे. प्रचार फेरी, जाहीर सभा, चौक सभा यासह सर्व प्रकारच्या सभा, तहसिल अंतर्गत सभा व रॅलीची परवानगी संबंधित पोलीस निरीक्षक यांच्याकडून प्राप्त होणार आहे. परवानगीसाठी अर्ज व डी-१ नमून्यात अतिरिक्त माहिती, नगरपालिका/महानगरपालिकेचे जाहिरात लावण्याचे शुल्क व नाहरकत दाखला तसेच अनूसूची १६ आवश्यक आहे. सभेच्या ठिकाणी पोस्टर्स, झेंडे, कापडी बॅनर्स लावण्यासाठी महानगरपालिका, नगर परिषद, नगरपालिका व ग्रामपंचायत यांच्याकडून परवानगी देण्यात येणार आहे. परवानगीसाठीच्या अर्जासोबत खाजगी जागा असल्यास मालकाचे संमतीपत्र व महानगरपालिका,…
बुधवार, १६ ऑक्टोंबर नाशिक – तक्रारदाराला ओमनी गाडीवर सोडा विक्रीचा व्यवसाय करू देण्यासाठी आणि कोणतीही कारवाई न करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस हवालदाराला एसीबीच्या (अँटी करप्शन) अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. एजाझ काझी असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव असून ते धुळे जिल्ह्यातील देवपूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. कार्यालयातच लाच स्वीकारणाऱ्या काझी याच्या विरोधात देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ओमनी गाडीवर सोडा विक्री करण्याचा व्यवसाय करीत असून सदरचा व्यवसाय करू देण्यासाठी व कोणतेही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी लाचखोर पोलीस हवालदार एजाझ काझी (वय- ५२ वर्ष, नियुक्ती देवपूर पोलीस स्टेशन) याने तक्रारदाराकडे चार…
बोगस लाभार्थ्यांना जमीन देण्यासाठी आढळा नदीचा केला ओढा.. सुमारे ४०० एकर राखीव वनक्षेत्राचे वाटप बुधवार, १६ ऑक्टोबर संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग गावात केंद्र सरकारच्या राखीव वन जमिनीचे परस्पर वाटप करण्याचा प्रताप तत्कालीन तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने केल्याचे समोर आल्यानंतर वनविभागाने देखील सदर जमीन ही राखीव वनक्षेत्र असल्याने ती वनविभागाची असल्याचे पत्र दिले आहे. आता जवळेकडलग येथील बारा शेतकऱ्यांनी या संदर्भात संगमनेरच्या प्रांत अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करून बोगस लाभार्थ्यांनी मिळवलेली जमीन पुन्हा सरकारने ताब्यात घ्यावी आणि सर्व नोंदणी व फेरफार रद्द करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे स्थानिक महसूल, वनविभाग आणि भूमी अभिलेख विभागाला हाताशी धरून बोगस लाभार्थ्यांनी…
बुधवार, १६ ऑक्टोबर २०२४ मेष- आर्थिक बाबी सुधारतील, अडकलेले पैसे परत मिळतील, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. चांगली बातमी मिळेल. मुलाची स्थिती समाधानकारक असेल. मनात थोडी चिंता असू शकते. आरोग्य, प्रेम आणि व्यवसायासाठी हा आनंददायी काळ आहे. वृषभ- व्यवसायात सुधारणा होईल. वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होईल. वडिलोपार्जित संपत्ती वाढेल. आरोग्य आणि प्रेम पूर्वीपेक्षा चांगले राहील. तुमचा व्यवसाय उत्तम चालेल. मिथुन- तुमच्यासाठी काही कामे यशस्वी होतील. तुम्ही प्रतिकूलतेवर मात केली आहे. तब्येतीत सुधारणा होईल. तुमचे मन धार्मिकतेकडे जाईल. आरोग्याची स्थिती समाधानकारक आहे. व्यवसायातही नफा मिळेल. कर्क- तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दुखापत होण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या समस्येत अडकू शकता. सावध…
मंगळवार, १५ ऑक्टोंबर अहिल्यानगर – केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर सर्व शासकीय-निमशासकीय विभागांनी निवडणूक आचारसंहितेची तात्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शासकीय यंत्रणांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल पाटील आणि विविध शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर शासकीय मालकीची कार्यालये, शासकीय इमारती आणि त्यांच्या संरक्षक भिंतीवरील जाहिराती, भित्तीपत्रके, कापडी फलक, कट आऊट, जाहिरात फलकावरील संदेश, झेंडे…
मंगळवार, १५ ऑक्टोंबर संगमनेर नगर परिषदेकडे मोठ्या प्रमाणात कर्मचारी असताना देखील शहराच्या विविध भागात, नवीन नगर रस्त्यावर किरकोळ विक्रेत्यांवर प्लास्टिक बंदीची कारवाई करणारे पथक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कारवाई करणाऱ्या माणसांकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र अथवा कारवाईसाठी प्राधिकृत केल्याचे पत्र नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीच्या नावावर कारवाई करणारे हे कर्मचारी कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मंगळवारी दुपारी नवीन नगर रस्त्यावर काही फळ विक्रेत्यांकडे असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची तपासणी करत ते जप्त करण्याचे काम दोन-तीन तरुण करत होते. या कर्मचाऱ्यांना पथविक्रेता समितीचे सदस्य दीपक साळुंके यांनी याबाबत विचारणा केली असता, तुम्ही नगरपालिकेत जाऊन मुख्याधिकाऱ्यांशी बोला. त्यांनी आम्हाला कारवाईसाठी पाठवले, अशा…
मंगळवार, १५ ऑक्टोंबर येत्या २६ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला निवडणूक घेण्यात येणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या हातात जाणार हे स्पष्ट होईल.दीपावली पूर्वीच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने तसेच ऐन दीपावली दरम्यान निवडणूक कार्यक्रम सुरू राहणार असल्याने मतदारांची देखील दिवाळी गोड होण्याची चिन्ह आहे. २९ ऑक्टोंबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान दीपावली सणाचा जल्लोष राहणार असल्याने याच दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची तसेच मागे घेण्याची अखेरची तारीख असल्याने ऐन दिवाळीत आता निवडणुकीचा देखील माहोल रंगणार आहे. त्यातच राज्यभरात…
मंगळवार, १५ ऑक्टोंबर प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता. नदीपात्रात या मुलांचा शोध व बचाव सुरू असताना सुगाव बुद्रुक (अकोले) येथे शोध कार्य करणाऱ्या पथकाची बोट उलटून तीन पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने नुकसान भरपाई व अन्य लाभ म्हणून गृह विभागाने ४४.६८ लाखाची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. यासंबंधीचे आदेश नुकतेच काढण्यात आले. २३ मे २०२४ रोजी अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे ही दुर्घटना घडली होती. पाण्याचा प्रवाहात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. या बुडून मृत्यू झालेल्या मुलांपैकी एकाच्या शोधासाठी बचाव पथकाची मदत घेण्यात आली. बचाव कार्य सुरू…
मंगळवार, १५ ऑक्टोबर संगमनेर – आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या कामातून संगमनेर तालुका ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरला आहे. समृद्ध म्हणून गौरविल्या जाणाऱ्या तालुक्याला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली आहे. मात्र या तालुक्याचा सर्वांगीण विकास काही शक्तींना पहावत नाही. दडपशाही निर्माण करणाऱ्या अशा प्रवृत्तींना आपल्या सर्वांना एकजुटीने रोखायच असल्याचे प्रतिपादन तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी केले. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागडावरून सुरू झालेल्या युवा संवाद यात्रेदरम्यान त्या बोलत होत्या. यात्रेचे धांदरफळ, निमगाव बुद्रुक, खांडगाव, निमज, सांगवी, चंदनापुरी, झोळे, सावरगाव तळ आदी गावांमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. हजारो तरुणांच्या सहभागाने तालुक्यात यात्रेच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण तयार झाले…
मंगळवार, १६ ऑक्टोबर संगमनेर – सन २०२४-२५ या गळीप हंगामात श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड साखर कारखान्याने साडेपाच लाख मॅट्रिक टन ऊस गाळप आणि चांगला साखर उतारा मिळविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बिरोले यांनी दिली. विजयादशमीच्या दिवशी बिरोले यांच्या हस्ते पठाण भागाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या कवठे मलकापूर येथील श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड या साखर कारखान्याच्या मिल व बॉयलिंग हाऊसमधील मशिनरीचे विधिवत पूजन करत गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब वर्पे, संचालक हरिभाऊ गीते, जनरल मॅनेजर अण्णासाहेब शेंडे, चीफ इंजिनियर रोहिदास रसाळ, प्रशासन व्यवस्थापक भाऊसाहेब मंडलिक, इंजिनीयर केशव वर्पे, संतोष नान्नर, शिवाजी…
