Author: अनंत पांगारकर
रविवार, २९ सप्टेंबर अहमदनगर – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने नाशिक विभागात माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत ४ नगर परिषदांनी व महानगरपालिकेने पुरस्कार मिळविल्याने पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्राद्वारे अभिनंदन केले आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने भूमी, वायू, अग्नी, जल आणि आकाश या पाचही घटकात चांगली कामगिरी केली. घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, सौर ऊर्जेचा उपयोग, एलईडी दिव्यांचा उपयोग, वृक्षारोपण, वॉटर ऑडिट, जल प्रदूषण कमी करणे, नागरिकांचा स्वच्छतेत सहभाग, वायू प्रदूषण मुक्ती, जनजागृती आदी क्षेत्रात विविध उपक्रम राबविले. नुकताच वसुंधरा अभियान ४.० चा निकाल जाहीर करण्यात आला. यात…
रविवार, २९ सप्टेंबर बदलापूर येथे बालवाडीच्या चार वर्षीय दोन चिमुरड्या मुलींच्या अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे जेलमध्ये होता, त्याच्या पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचाराच्या केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याकरता तळोजा कारागृहातून त्याला वारंट घेऊन बदलापूरकडे नेण्यात येत होते. त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक घेऊन फायर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी स्वत:च्या बचावासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या त्या गोळीबारात अक्षय गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. एनकाउंटरची बातमी मिडियावर प्रसिद्ध होताच संपूर्ण बदलापूरमध्ये लोकांनी फटाके वाजून दिवाळी साजरी केली, दुसरीकडे ज्या विरोधी पक्षांनी बदलापूर अत्याचार प्रकरणांत पोलीस यंत्रणेवर आरोप करून आरोपींला फाशीची तात्काळ शिक्षा दया, नाहीतर आरोपीला आमच्या…
रविवार, दि. २९ सप्टेंबर मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो, परंतु तुम्ही संयमाने आणि समजूतदारपणे काम केल्यास यश मिळेल. करिअरमध्ये प्रगतीची आशा आहे, परंतु त्याचवेळी जबाबदारीचे ओझेही वाढेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक शांती मिळेल. आरोग्याची काळजी घ्या, तणावापासून दूर राहा. आज कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा. प्रवासाची शक्यता आहे, परंतु सावधगिरी बाळगा. आर्थिक बाबतीत हुशारीने गुंतवणूक करा. आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील. ऑफिसमध्ये कामाचा दबाव वाढू शकतो, पण मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. घरगुती प्रकरणांमध्ये शांतता राहील आणि तुम्हाला कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट…
रविवार, २९ सप्टेंबर गुन्हा कुठलाही असो, २६/११ चा मुंबईवरील अतिरेकी हल्ला असो, की त्याआधी मुंबईत झालेले सिरियल बॉम्बस्फोट असोत किंवा गँगरेप असो, आरोपीला एक्सपोज करणं, त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळणं हे तपास यंत्रणेचं काम असतं. कोणत्याही गुन्ह्यात सामील असलेल्यांना लागलीच यमसदनी पाठवणं पोलिसांना अडचणीचं कधीच नसतं. मुंबई पोलिसांमधल्या जाँबाज चार अधिकार्यांना जिवे मारणार्या अजमल कसाब याला तर पोलिसांना जागीच ठार करता आलं असतं. पण या मागचा पाकिस्तानचा हात उघड झाला नसता. असे पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी खरं तर पोलिसांनी काळजी घेतली पाहिजे. पण कधीकधी पोलीस होत्याचं नव्हतं करतात. बदलापूर घटनेतील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याला एका गोळीत संपवणार्या पोलिसांना कोणाला…
शनिवार, २८ सप्टेंबर मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ११ पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. शिवाय राज्यातल्या निवडणूक तयारीचा आढावाही घेतला. राज्यात २८८ विधानसभा मतदार संघ असून निवडणुकीला जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी आयोगाचे प्रयत्न असल्याचे सांगत शहरी भागात होत असलेल्या कमी मतदानाबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी चिंता व्यक्त केली. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली जाईल अशी अपेक्षा होती मात्र, पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करण्यात आली नाही. निवडणुकीसंबंधी घोषणा लवकरच पत्रकार परिषदेतूनच करू असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात पुरुष मतदारांची…
शनिवार, २८ सप्टेंबर भारतीय जनता पक्षाचे नेते शेखर चंदेल यांचा मृतदेह छत्तीसगडच्या नाईला रेल्वे स्थानकाजवळ आढळून आला. यामुळे खळबळ उडाली असून ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चंदेल हे माजी विरोधी पक्षनेते नारायण चंदेल यांचे धाकटे बंधू असून ते राजकारणात सक्रिय होते. चंदेल रात्री साडेआठ वाजता आपल्या राईस मिल मधून पायी निघून मोबाईलवर बोलत बोलत ते जात असल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास छत्तीसगडच्या नाईला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि न्यायला केबिन दरम्यान अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.…
शनिवार, २८ सप्टेंबर पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यभरात राबविण्यात आलेल्या “माझी वसुंधरा अभियान ४.०”मध्ये संगमनेर शहरासह तालुक्याने दमदार कामगिरी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून संगमनेर नगर परिषदेने नगरपरिषद गटात राज्यस्तरावर उत्तेजनार्थ सहाव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. याशिवाय तालुक्यातील घुलेवाडी, गुंजाळवाडी, धांदरफळ बुद्रुक, खांडगाव, पेमगिरी, चिंचोली गुरव, लोहारे, तिगाव या नऊ ग्रामपंचायतींनी अभियानात आपला ठसा उमटविला आहे. राज्यात सर्वाधिक तब्बल साडेपाच कोटी रुपयांची बक्षिसे मिळविणारा संगमनेर एकमेव तालुका ठरला आहे. एप्रिल २०२३ ते मे २०२४ या कालावधीत पृथ्वी, वायु, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित “माझी वसुंधरा अभियान ४.०”…
शनिवार, दि. २८ सप्टेंबर मेष – मेष राशीच्या लोकांना आज बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुम्हाला तुमच्या कामाचे नियोजन करावे लागेल. जर तुम्ही नवीन घर खरेदी करणार असाल तर तुम्हाला त्याच्या कागदपत्रांवर पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायात कोणतेही बदल करू नका, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. तुम्हाला देखावा करण्याच्या फंदात पडण्याची गरज नाही. वृषभ – वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस त्रासदायक असणार आहे. तुमचे काही काम अपूर्ण राहू शकतात, त्यामुळे तुमच्या मनात त्रास होईल. जर तुम्हाला कोणत्याही कामाबद्दल शंका असेल तर ते अजिबात करू नका. तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करावा लागेल कारण तुम्ही जे बोलता…
शुक्रवार, २६ सप्टेंबर आईच्या गैरहजेरीत स्वतःच्याच चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने बारा वर्षे सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात २९ सप्टेंबर २०२१ रोजी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नराधम बापाविरोधात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांनी केला होता. या घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली होती. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांनी आरोपी विरोधात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोप…
शिर्डीत महिला सशक्तीकरण कार्यक्रम अंतर्गत महिला मेळावा संपन्न शुक्रवार, २७ सप्टेंबर शिर्डी – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ९० लाख बहीणींच्या बँक खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित ६० लाख महिलांना लवकरच लाभ दिला जाईल. एकाही भगिनींला दिवाळीत भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिर्डी येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला महामेळाव्याप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला महसूल, पशूसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे, सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनीताई विखे,…
