Author: अनंत पांगारकर

मंगळवार, २७ ऑगस्ट नाशिक – मालेगाव महापालिका हद्दीत केलेल्या विविध विकास कामांची पडताळणी आणि मूल्यमापन न करता २० लाख ६७ हजार ६०७ रुपयांची शासनाची आर्थिक फसवणूक करत स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतल्याचा चौकशीअंती ठपका ठेवत नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने महानगरपालिकेच्या १५ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या तक्रारीवरून २० लाख ६८ हजार ६०७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये छावणी पोलीस ठाण्यात शहर अभियंता कैलास राजाराम बच्छाव, सेवानिवृत्त तत्कालीन कनिष्ठ अभियंता मुरलीधर हरी देवरे, तत्कालीन कनिष्ठ अभियंता संजय जनार्दन जाधव, सेवानिवृत्त तत्कालीन उपअभियंता राजेंद्र काशिनाथ बाविस्कर, खाजगी व्यक्ती सोहेल अब्दुल रहमान…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई मंगळवार, २७ ऑगस्ट ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला. सत्ताधाऱ्यांच्या घिसाड घाईमुळेच पुतळा उध्वस्थ झाल्याचं स्पष्ट झालं. या घटनेने केंद्र सरकारबरोबरच नौदल आणि राज्यातल्या सरकारची छी थू होऊ लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ महिन्यांपूर्वी ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त येऊन शिवरायांच्या कार्याला मानवंदना करण्याकरिता शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं. पंतप्रधानांनी अनावरण केलेला हा महाराजांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींतून तीव्र नाराजी व्यक्त होतेय. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. सिंधुदुर्गचे आमदार…

Read More

आजचे राशीभविष्य मंगळवार २७ ऑगस्ट २०२४ मेष – तृतीयेमधील मंगळ आप्तस्वकीयांच्या रोषाला कारणीभूत होऊ नका. भाग्येश गुरु धनस्थानी असल्याने अजूनही भाग्य तुमच्या बाजूने आहे. वृषभ – मंगळाचे धनस्थानातील आगमन आर्थिक समस्या उद्भवू शकतात. आज नवीन वास्तूचे सुख अनुभवाल. मिथुन – आजचा दिवस संतापी. शांत राहून गोड बोलून काम करून घ्या. भाग्येश शनी मंद गतीने प्रगती दर्शवतो. कर्क – आज वाहन सांभाळून चालवा, अपघाताची शक्यता. आजच्या दिवशी आप्तस्वकीय विचित्र वागतील. सिंह – आज नोकरीच्या ठिकाणी मान सन्मान वाढेल. खिसा, पाकीट सांभाळा आर्थिक नुकसानीचा दिवस. कन्या – आज खोट्याचा सामना होईल. तुमचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा. भाग्य तुमच्या बाजूने आहे. तुळ -…

Read More

मंगळवार, २७ ऑगस्ट इलेक्ट्रॉनिक व्यवसायासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचे ऑनलाइन प्रकरण प्रादेशिक कार्यालयाला पाठविण्यासाठी साडेपाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अहमदनगर कार्यालयाचा अतिरिक्त पदभार असलेल्या छत्रपती संभाजी नगरच्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचा प्रादेशिक व्यवस्थापक दत्तू आश्रुबा सांगळे याला सोमवारी लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. तक्रारदाराचा इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय असून त्यांना सदर व्यवसायासाठी कर्जाची आवश्यकता असल्याने त्यांनी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरला होता. सदर कर्ज व्याज परतावा योजनेचे ऑनलाइन प्रकरण…

Read More

सोमवार, २५ ऑगस्ट अहमदनगर – मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या दोन्ही योजनांचा जिल्ह्यातील ज्येष्ठांना लाभ देण्यासाठी ६ लक्ष लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दिलेले उद्दिष्ट पूर्तीसाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकजुटीने व गतीने काम करावे. तसेच योजनेचे फॉर्म भरुन घेण्यासाठी येत्या शनिवारी व रविवारी जिल्ह्यात विशेष कँपचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या आढाव्यासाठी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्यासह सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे…

Read More

सोमवार, २६ ऑगस्ट पुणे – भांडण सोडविण्यास गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला होता. हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. पसार झालेल्या हल्लेखोरांना सोलापूर परिसरातून पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. निहालसिंग मन्नूसिंग टाक (वय १९ वर्ष, रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर), राहुलसिंग उर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड (वय २० वर्ष, रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या हल्लेखोर आरोपींची नावे आहेत. हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात रविवारी दुपारी चारच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांमध्ये वाद सुरू होते. त्या वेळी एका दुचाकीस्वाराच्या बाजूने आरोपी निहालसिंग आणि राहुलसिंग भांडण करत होते. आरोपींच्या हातात कोयता होता. त्या वेळी तेथून निघालेले सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड…

Read More

सोमवार, २६ एप्रिल | अनंत पांगारकर संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार घेतलेल्या पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांच्या काळात अवैध धंदे बंद होतील अशी अपेक्षा होती, मात्र संगमनेरकरांची ही अपेक्षा फोल ठरली आहे. दोन मटका टपऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलीस निरीक्षकांना पंधरा दिवसाचा कार्यकाळ उलटून देखील अवैध धंद्यांचे माहेरघर असलेल्या ‘शक्तिमान टॉवर’चा पत्ता सापडलेला नाही. अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी वादग्रस्त ठरलेल्या एलसीबी विरोधात केलेल्या उपोषणानंतर जिल्हा पोलीस दलात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे फेरबदल करण्यात आले. या फेरबदलात शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या जागेवर नगरहून पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नियुक्ती केली. पोलीस निरीक्षक बापूसाहेब…

Read More

सोमवार, २६ ऑगस्ट मुंबई – राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकांकडून कर्जासाठी शासन हमी देण्यात येते. या कर्जाची व्याजासह परतफेड करण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ वैयक्तिक आणि सामूहिकरित्या जबाबदार राहील, अशी अट टाकण्याचा निर्णय रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित संचालकांनी कर्ज वितरणापूर्वी बंधपत्र सादर करावयाचे आहे. सध्याच्या संचालक मंडळातील संचालक मयत किंवा अपात्र झाल्याने नव्याने पदभार घेतलेल्या संचालकांनी पदभार घेतल्यापासून १० दिवसाच्या आत या संदर्भात बंधपत्र द्यायचे आहे. या कर्जाची संपूर्ण परतफेड होईपर्यंत निवडून आलेल्या संचालकांकडून पदभार घेतल्यापासून ३० दिवसांच्या आत बंधपत्र द्यावयाचे आहे. यापूर्वी वैयक्तिक…

Read More

सोमवार, २६ ऑगस्ट  नांदेडचे काँग्रेसचे विद्यमान खासदार वसंत चव्हाण यांचे आज हैदराबादच्या किन्स रुग्णालयात आजारपणातून निधन झालं. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून निवडून आलेले काँग्रेसचे वसंत चव्हाण यांचा विजय महत्वपूर्ण मानला जात होता. त्यांनी तत्कालीन भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता. गेल्या दीड वर्षांपासून ते डायलेसिसवर होते. गेल्या आठवड्यात १५ ऑगस्ट रोजी त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. शिवाय अचानक बीपीदेखील कमी झाला होता. त्यामुळे त्यांना तात्काळ नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी एअर ॲम्बुलन्सने…

Read More

सोमवार, २६ ऑगस्ट  संगमनेर रोटरी क्लबने माजी सैनिकांसाठी आयोजित केलेल्या रक्षाबंधन सोहळ्यात युद्धभूमीवर लढलेल्या माजी सैनिकांनी युद्धाचे थरारक प्रसंग आणि यादरम्यान स्वतः त्यातून कसे बाहेर पडले याची माहिती सांगताना अनेकांच्या डोळ्यासमोर युद्धाचे ते थरारक प्रसंग उभे राहिले होते. बुधवारी (२३ ऑगस्ट) रोटरी हॉलमध्ये सैन्य दलातून निवृत्त झालेल्या सैनिकांसाठी रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता. १९६५ आणि १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष सहभागी असलेले माजी सैनिक कॅप्टन रावजी भागुजी घुले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. घुले यांच्यासह माजी सैनिक कार्तिक तांगडकर, सखाहरी माळी, सुभाष कातोरे, सुभाष खताळ, काशिनाथ घुले, काशिनाथ खिलारी, रामनाथ हासे, रमेश सातपुते, विजय जोशी, दत्तात्रय नवले, बाजीराव…

Read More