Author: अनंत पांगारकर
शनिवार, २४ ऑगस्ट बदलापूर शाळेतील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणी राज्यात महाविकास आघाडीने सरकार विरोधात जोरदार भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने बंद बेकायदेशीर ठरविल्याने मविआने निषेध आंदोलन केले. संगमनेरमध्ये काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शनिवारी बस स्थानक चौकात तोंडाला काळ्या पट्ट्या लावत मौन आंदोलन केले. त्यांच्यासोबत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. जयश्री थोरात सहभागी झाले होते. बदलापूरसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडलेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांचा व असंवेदनशील सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने आज शनिवारी (२४ ऑगस्ट) महाराष्ट्र बंदची…
शनिवार, २४ ऑगस्ट जमिनीचे कायदेशीर निर्वाणीकरण झालेले नसताना न्यायालयाला अंधारात ठेवून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि तथाकथित लाभार्थ्यांनी संगनमत करून संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग गावातील राखीव वन जमीनीचे वाटप करून टाकण्याचा बेकायदेशीर प्रताप करून ठेवला असल्याचा आरोप करीत, इतर शेतकऱ्यांचे, वनविभागाचे, पर्यावरणाचे त्यामुळे नुकसान होत आहे म्हणून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या या तक्रारीची गंभीर दखल घेत वनविभागाच्या प्रधान सचिवांना त्वरित चौकशी करून दहा दिवसात अहवाल सादर करावा असे आदेश मंत्री मुनगंटीवार यांनी दिले आहेत. संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग येथील राखीव वन जमीन (रिझर्व फॉरेस्ट)…
शनिवार, २४ ऑगस्ट बदलापूरसह राज्यात आणि देशात घडत असलेल्या अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचाराविरोधात ‘लाडक्या लेकीच्या सन्मान आणि संरक्षणासाठी’ संगमनेरमध्ये काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते हातात काळे झेंडे घेत, तोंडाला काळी पट्टी बांधून बस स्थानकासमोर ११ वाजता करणार आंदोलन करणार आहे. महिला अत्याचाराविरोधात समाजातील जनभावना लक्षात घेत महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदचे आयोजन केले होते. मात्र या विरोधात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतर काही जणांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत बंदला विरोध दर्शविला होता. न्यायालयाने देखील बंद बेकायदेशीर ठरवत बंद करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. भारतीय न्यायव्यवस्था संविधानिक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून शनिवारचा बंद…
शनिवार, २४ ऑगस्ट गणेशोत्सव ईद-ए-मिलादसह आगामी काळात साजरे होणारे सण, उत्सव शांततेत व एकमेकांच्या हातात हात घालून साजरे करण्याचे आवाहन अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, महापालिका आयुक्त डॉ. यशवंत डांगे, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अमोल भरती यांच्यासह संबंधित विभागांचे विभाग प्रमुख बैठकीस उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, सण, उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करण्याची आपल्या जिल्ह्याची परंपरा आहे. जिल्ह्याची ही परंपरा कायम ठेवत आगामी काळात जिल्ह्यात साजरे होणारे सण, उत्सव हे शांततेत, एकमेकांच्या हातात हात घालून…
विशेष प्रतिनिधी / मुंबई शनिवार, २४ ऑगस्ट महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्यावरुन जोरदार चर्चा सुरू आहे. राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीकडूनही तयारी केली जात असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाहून पहिलं लक्ष्य हे युतीचं सरकार पदच्युत करणं हे पाहिलं ध्येय असेल असं म्हटलं आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाबाबत एकमत होत नाहीे, अशी चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी लावून धरली आहे. शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा, माझा पूर्ण पाठिंबा असेल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मुख्यमंत्रीपदाबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. आम्हाला…
जाणून घ्या… आपलं शनिवारच (२४ ऑगस्ट) राशिभविष्य मेष— राशीस्वामी आज स्वस्थानी असल्याने अचानक धनलाभ दर्शवतो. स्वतःचा इगो बाजुला सारुन आपले काम करुन घ्या. वृषभ— व्ययातील चंद्र आज प्रवासामधुन आर्थिक लाभ दर्शवतो. आज आपण अतीशय हुशारीने समोरच्याकडून आपले काम करुन घ्याल. मिथुन— व्ययातील गुरु मंगळ हर्षल अतीशय मेहनत करायला लावेल तर अन् तरच आपले आज कल्याण होईल नाहीतर अपमान होण्याचीच शक्यता जास्त आहे. कर्क— कर्मस्थानी असलेला राशीस्वामी आज मेहनतीचा पुरेपूर मोबदला मिळवुन देईल. सिंह— व्ययातील बुध व धनातील केतु कोर्ट कचेरीच्या कामात अडकवून ठेवतील. पुर्वी केलेल्या चांगल्या कर्मामुळे आज कोर्ट केसमधून सुटकारा मिळेल. कन्या— आज अपमानित होण्याचा दिवस. साठविलेले पुण्य आज…
शुक्रवार, २३ ऑगस्ट नाशिक रोड जलकुंभाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी म्हाळुंगी नदीपात्रात लिकेज झाल्याने या जल कुंभावरून उपनगरात होणारा पाणीपुरवठा एक दिवसाआड करण्यात येणार असल्याची माहिती संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली आहे. धरणाच्या लाभक्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यातच भोजापूर धरण भरल्यामुळे म्हाळुंगी नदीपात्रात देखील मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने शहरातून वाहणाऱ्या म्हाळुंगी नदीला मंगळवारी पूर आला होता. या पुराच्या पाण्यामुळे नाशिकरोड जलकुंभाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी म्हाळुंगी नदीपात्रात लिकेज झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला आहे. संगमनेरकर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगरपरिषदेने या जलकुंभाला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. लिकेज झालेली…
शुक्रवार, २३ ऑगस्ट महाराष्ट्र बंद संदर्भात मुंबई हायकोर्टाचा निर्णय समोर आल्यानंतर महाविकास आघाडीतील बडे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पवार यांनी यासंदर्भात आपल्या एक्स अकाउंटवर ही भूमिका स्पष्ट केली आहे. पवार म्हणाले, सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. X वर पवार यांनी म्हटले आहे की, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद…
शुक्रवार, २३ ऑगस्ट कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा, असे आदेश शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने दिले आहे. बदलापुरात दोन चिमुकल्या मुलींवर घडलेल्या अत्याचाराच्या तसेच महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर या बंदच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने धक्का देणारा निर्णय देताना बंद बेकायदेशीर ठरवला आहे. मुंबई हायकोर्टाने निकाल देतांना म्हटले आहे की, कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीला महाराष्ट्र बंद पुकारण्यास परवानगी नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा. महाधिवक्ता देवेंद्रकुमार ऊपाध्याय…
शुक्रवार, २३ ऑगस्ट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शनिवारी (२४ ऑगस्ट) महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंद संदर्भात माहिती दिली. महाराष्ट्र बंद मधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. पत्रकार परिषदेत ठाकरे नेमकं काय म्हणाले…
