Author: अनंत पांगारकर
सोमवार १५ जुलै शहर आणि उपनगरात घंटागाड्यांच्या माध्यमातून फिरून स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या कामगारांच्या मोकळ्या मैदानावरील वस्तीमुळे, त्यांच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत. शहर स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने या सफाई कामगारांच्या राहण्याची व्यवस्था इतरत्र करावी, यासाठी परिसरातील नागरिक एकवटले असून या नागरिकांचे त्रासातून मुक्तता करण्यासाठी स्थानिक प्रशासन दखल घेत नसल्याने थेट आरोग्य मंत्रालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख प्रसाद पवार यांनी दिला आहे. शहर स्वच्छतेचा ठेका नाशिकच्या एका कंपनीला देण्यात आला या कंपनीशी संलग्न सफाई कामगारांची शहरातील परदेशपुरा भागातील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ अनाधिकृत वस्ती निर्माण करण्यात आली असून या…
सोमवार १५ जुलै दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून कोतुळ येथे शेतकरी गेली दहा दिवस धरणे आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी आज कोतुळ बाजारपेठ बंद ठेवून शेतकरी व ग्रामस्थांनी दूध उत्पादकांच्या मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधले. कोतुळ येथील खटपट नाका चौकामध्ये शेकडोच्या संख्येने शेतकरी यावेळी एकत्र आले होते. आंदोलनाच्या मंडपाच्या समोर दूध हंडी फोडण्याचे आंदोलन यावेळी करण्यात आले. वारकरी संप्रदायाने यावेळी आंदोलनाला पाठिंबा दिला. अभंग व भजनाच्या निनादांमध्ये मध्यवर्ती चौकात बांधण्यात आलेली हंडी शेतकरी कार्यकर्त्यांनी फोडली व सरकारच्या निषेधार्थ प्रचंड घोषणा दिल्या. दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव मिळाला पाहिजे, दूध क्षेत्रातील अस्थिरता संपवण्यासाठी दुधाला…
सोमवार १५ जुलै ६५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या आणि १४ वर्षापेक्षा अधिक शिक्षा भोगलेल्या आरोपीला सोडून देण्यासाठी आवश्यक असणारे फिटफॉर सर्टिफिकेट देण्याकरिता तीस हजार रुपयांची लाच घेणाऱ्या नासिकमधील मध्यवर्ती कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यास एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. डॉ. आबिद आबू अत्तार (वय ४०, वर्ग- १ पद – मुख्य वैदयकिय अधिकारी, मध्यवर्ती कारागृह नाशिकरोड रा. मध्यवर्ती कारागृह वसाहत, नाशिकरोड) व डॉ. प्रशांत एकनाथ खैरनार (वय ४२, वर्ग-२ पद- वैदयकिय अधिकारी, मध्यवर्ती कारागृह नाशिकरोड रा. इंदिरानगर, नाशिक) अशी लाच घेणाऱ्या दोघा डॉक्टरांची नावे असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या एसीबीने रविवारी ही कारवाई केली. अधिक माहिती अशी, एसीबीकडे तक्रार…
सोमवार १५ जुलै संगमनेर शहरातून जाणाऱ्या कोल्हार-घोटी मार्गाचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्णत्वास गेल्याने हा मार्ग अतिशय चांगला झाला, हा समज संगमनेरात सध्या सुरू असलेल्या पावसाने खोटा ठरविला असून यामुळे ठेकेदाराच्या कामाची पोलखोल झाली आहे. यामुळे सरकारचा या कामावरील पैसा पाण्यात गेला आहे. संगमनेरमधून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गाला बाह्यवळण मार्ग मिळाल्यानंतर त्या पाठोपाठ संगमनेरमधून जाणाऱ्या कोल्हार-घोटी मार्गाचेही काम झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी रुंद झाला होता. मात्र या रस्त्याच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट राहिल्याने वारंवार धुळीचा सामना करावा लागत होता. त्यातच आता पावसाळा सुरू झाल्याने वर्षभराच्या आतच या रस्त्याच्या कामाचे प्रगती पुस्तकच समोर आले आहे. या कामावर सरकारचा कोट्यावधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला…
सोमवार, १५ जुलै लग्नाच्या काही महिन्यानंतर किरकोळ कारणांवरून वाद उकरून काढत पतीपासून घटस्फोट मिळविण्यासाठी न्यायालयाची पायरी चढणाऱ्या महिलांना पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाने गेल्या आठवड्यात एका निकालाच्या माध्यमातून चपराक लगावली आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्यास तिची नैतिक अथवा आर्थिक जबाबदारी पतीवर राहत नाही, असे नमूद करीत न्यायालयाने पत्नी कमावती असल्याने तिचा पोटगीचा अर्ज नाकारत केवळ मुलीला पोटगी देण्याचा आदेश दिला. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश रघुवेंद्र आराध्ये यांनी हा निकाल दिला. दावा दाखल केल्यापासून याचिकेचा निकाल लागेपर्यंत मुलीला दरमहा पाच हजार रुपये पोटगी द्यावी, असे आदेशात नमूद आहे. राकेश आणि सीमा (नावे बदललेली) यांचा विवाह २९ डिसेंबर १९९६ रोजी झाला होता. या दांपत्याला एक…
रविवार, १४ जुलै उधारीवर घेतलेल्या सोन्याच्या दागिन्यापोटी दिलेला चेक बँकेत न वठल्याने दाखल करण्यात आलेल्या खटल्यामध्ये संगमनेर न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी संदीप रंगनाथ आव्हाड या आरोपीला सहा महिने साधा कारावास आणि तक्रारदाराला ३ लाख ३८ हजार २६० रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली आहे. समीर महाले यांचे शिवसाई ज्वेलर्स नावाने दागिन्यांचे दुकान असून संदीप आव्हाड आणि तक्रारदार समीर महाले यांच्यात असलेल्या ओळखीतून आव्हाड याने जुलै २०१७ मध्ये ५० ग्रॅमची एक सोन्याची साखळी आणि ९.३२० मिलीची एक सोन्याची अंगठी असे १,६९,१३० रुपये किमतीचे दागिने तीन महिन्यांच्या उधारीवर घेतले होते. महाले यांनी वारंवार पैशाची मागणी केल्यानंतर आरोपीने संगमनेर शाखेचा बंधन बँकेचा १,६९,१३०…
रविवार विशेष | १४ जुलै एका एकरातील पिकावर कीटकनाशक फवारणीला दीड ते दोन तासांपेक्षा अधिक कालावधी लागतो. पिकांची वाढ होईल, तसा कीटकनाशक फवारणीचा वेळही वाढतो. आधुनिक तंत्रज्ञानाने ड्रोनद्वारे मात्र अवघ्या दहा मिनिटांत एका एकरातील पिकांवर औषध फवारणी शक्य झाली आहे. पाठीवर भलं मोठं ओझं घेऊन फवारणी करण्यापेक्षा ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्राधान्य दिलं आहे. ड्रोनच्या माध्यमातून आठ ते दहा मिनिटात एक एकरावर फवारणी होते. त्यासोबतच कीटकनाशकाची बचतही होते. अशा ड्रोन कॅमेरा ऊस पिकावर औषध फवारणी करण्यासाठी भाडेतत्त्वावर मिळत आहे. संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील कृषी पदवीधर सुप्रिया नवले यांनी परिसरातील शेतकऱ्यांची मेहनतीला पूर्णविराम देऊन सरकारच्या योजनेतून ड्रोन घेतले असून तीन…
आपल्याला नको असलेल्या व्यक्ती, संस्था यांचा काटा सरकार कसा काढते, याची असंख्य उदाहरणं गेल्या दहा वर्षांच्या केंद्रातल्या मोदी सरकारने आणि २०१४ नंतर राज्यातल्या युती सरकारने दाखवून दिली आहेत. खर्या गुन्हेगारांना आवर घालण्याचा यामागे आव असला तरी प्रत्यक्षात सत्तेला जाब विचारणार्यांची तोंडं बंद करण्याचा प्रयत्न यामागे असतो. सत्तेला जाब विचारणार्यांची मुस्कटदाबी करायची हा अत्यंत कुटील हेतू केंद्र आणि राज्य सरकारने गेली दहा वर्षं जपला आहे. याच कुटील हेतूचा नवा अंक महाराष्ट्रातल्या विद्यमान सरकारने सुरू केला आहे. या सरकारने राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर मंजुर करून घेतलेल्या क्रमांक २० च्या विधेयकाने सरकारचा हेतू स्पष्ट…
शनिवार १३ जुलै इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटटस ऑफ इंडियाच्यावतीने (आयसीएआय) मे 2024 मध्ये घेण्यात आलेल्या सीए फायनल परीक्षेत संगमनेर येथील ओंकार राजेंद्र मुळे (वय 22) उत्तीर्ण झाला. ओंकार हा संगमनेर ब्राह्मण परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र उर्फ बंडू मुळे यांचा मुलगा तसेच भाऊसाहेब थोरात पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रवीण मुळे यांचा पुतण्या आहे. ओंकार मुळे याचे प्राथमिक शिक्षण संगमनेरच्या सह्याद्री विद्यालयात व महाविद्यालयीन शिक्षण संगमनेर कॉलेजमध्ये झाले. तो पुण्यातील डीकेव्ही अँड असोसिएटस या संस्थेत आर्टिकलशीप करीत आहे. त्याला भाऊ आदित्य मुळे, मित्र सीए तेजस पवार व सीए हिमांशू रावलानी यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल ओंकारचे अभिनंदन होत आहे.
शनिवार १३ जुलै पावसाळी अधिवेशन संपताच संगमनेरमध्ये परतलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी सकाळीच तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील गडाख कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. बुधवारी सायंकाळच्या वेळी जनावरांना चारा कापण्यासाठी शेतात केलेल्या मातेच्या डोळ्यादेखत बिबट्याने तिच्या दीड वर्षीय चिमुकलीला आपल्या जबड्यात पकडून जवळच्या गवतात नेले होते. हा प्रकार लक्षात आल्याने नागरिकांनी बिबट्यामागे गवतात धाव घेत त्याला हूसकावून लावले. गंभीर जखमी झालेल्या दीड वर्षीय चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे ही दुर्घटना घडली. या घटनेत मृत्यू झालेल्या ओवी सचिन गडाख या दीड वर्षीय चिमुकलीच्या कुटुंबीयांचे…
