Author: अनंत पांगारकर

जाणता राजा थोर स्वातंत्र्यसैनिक,जेष्ठ गांधीवादी नेते, सहकार, शिक्षण, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, बँकिंग, पर्यावरण, जलसिंचन अशा अनेक विविध क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व स्व. तीर्थरूप भाऊसाहेब संतूजी थोरात हे माझे वडील. आम्ही सर्वजण त्यांना ‘दादा’ म्हणायचो. दादांच्याविषयी काही लिहिण्यापूर्वी आमच्या थोरात परिवाराचा इतिहास थोडक्यात नमूद करणे मला आवश्यक वाटते. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील सह्याद्री डोंगर रांगांच्या कुशीत असलेल्या रतनगडावरुन उगम पावणार्‍या ‘अमृतवाहिनी’ प्रवरा नदीच्या तीरावर वसलेले संगमनेर तालुक्यातील जोर्वे हे आमचे गाव. या गावात नदीच्या घाटावर एकमुखी दत्ताचे सुंदर पुरातन मंदिर आहे. जोर्वे गावाला फार मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. चालुक्य आणि यादव यांच्या काळातील ऐतिहासिक दस्तावेजांत जोर्वे गावाचा ‘जयुरेव ग्राम’ असा उल्लेख आढळता.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक : विधान परिषदेच्या नासिक पदवीधर मतदार संघासाठी बुधवार पर्यंत सात उमेदवारांनी दहा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंतची उमेदवारी अर्ज यांची संख्या तेरा झाली. पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे गुरुवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तर त्यांच्या विरोधातील भाजपचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. पदवीधर मतदार संघासाठी नाशिक वगळता उर्वरित मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जाहीर झाले आहेत. मात्र नाशिकमध्ये अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही. शेवटच्या क्षणी भारतीय जनता पक्ष आपला उमेदवार जाहीर करेल असे सध्याचे चित्र आहे. असे असले तरी शुभांगी भास्कर पाटील यांनी भाजपकडून अर्ज दाखल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जळगावच्या जैन उद्योग समूहास तर सहकारातील दिपस्तंभ व दंडकारण्य अभियानाचे प्रणेते थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार संत साहित्याचे गाढे अभ्यासक माजी आमदार उल्हासदादा पवार यांना देण्यात येणार असल्याची माहिती जयंती महोत्सव समितीचे निमंत्रक आ. डॉ. सुधीर तांबे व डॉ. राजीव शिंदे यांनी दिली आहे. स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमीत्त पुरस्काराविषयी माहिती देतांना आ. डॉ. तांबे व राजीव शिंदे म्हणाले, दरवर्षी कृषी , शिक्षण, साहित्य, संशोधन,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त १२ जानेवारीला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सकाळी ९ ते ५ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी दिली आहे. घुगरकर म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आदर्श तत्व राबवून देशातील सहकाराला दिशा दिली. स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती निमित्त संगमनेर तालुक्यात प्रेरणा दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. या पार्श्वभूमीवर १२ जानेवारीला कारखाना कार्यस्थळावर भव्य रक्तदान शिबिर होत आहे. या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : राज्यात बहुचर्चित ठरलेला संगमनेरच्या बस स्थानकाचे व व्यापारी संकुलाचे बांधकाम अवैध गौण खनिजाचा वापर करून करण्यात आल्याचे समोर आले आहे. वाळू मुरूम डबर याचा शासनाचा मोबदला बुडून वापर केल्याप्रकरणी विकसक आर एम कातोरे यांना संगमनेरच्या तहसीलदारांनी ३ कोटी ६६ लाख २२ हजार ८६९ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे हा प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आला. यासंदर्भात अमोल खताळ पाटील यांनी दिलेली माहिती अशी, संगमनेर बस स्थानक आणि व्यापारी संकुलाचे बांधकाम बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर करण्यात आले आहे. हे बांधकाम करताना विकसक आर.एम.कातोरे यांनी गौण खनिज (वाळू, मुरूम, डबर) विशेषत: वाळूचा कुठलाही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अमरावती : शिंदे फडणवीस सरकार सोबत असलेले प्रहार संघटनेचे नेते माजी मंत्री अपक्ष आमदार बच्चू कडू रस्ता ओलांडत असताना त्यांना एका दुचाकी स्वाराने जोराची धडक दिली आहे. या अपघातात बच्चू कडू गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अमरावतीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कडू यांच्यावर अमरावतीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी स्वतः ट्विट झाले या अपघाताची माहिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील आमदारांच्या अपघाताची मालिकाच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार जयकुमार गोरे, आमदार धनंजय मुंडे, आमदार योगेश कदम यांच्या कारचा अपघात झाल्याचे प्रकार गेल्या काही दिवसात समोर आले आहे. त्यातच आता प्रहार संघटनेचे नेते,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील शुक्लेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. पाचव्या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या साहिल सातपुते याच्यासह इयत्ता आठवीमध्ये शिकणारे चार विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत, अशी माहिती शाळेच्यावतीने देण्यात आली. गुणवत्ता यादीत चमकलेल्या आकांक्षा सोमनाथ कुटे हिने अहमदनगर जिल्ह्यात १४३ वा, श्रेयस रमेश सातपुते यांने अहमदनगर जिल्ह्यात २३० वा, श्रावणी संजय गुंजाळ हिने भूमिहीन पालकांचे पाल्य या गटात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला तर ज्ञानेश्वरी जालिंदर सातपुते हिने भूमिहीन पालकांचे पाल्य या गटात तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांना एकनाथ भांड यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेर तालुक्यातील चिखली येथील नूतन माध्यमिक विद्यालयात पार पडलेल्या तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनामध्ये देवगड विद्यालयातील नववी मध्ये शिकणाऱ्या अनुराधा शांताराम वर्पे या विद्यार्थ्यांनीच्या गणितीय शैक्षणिक खेळणी उपकरणाने प्रथम क्रमांक मिळविला. ५ व ६ जानेवारीला पार पडलेल्या या प्रदर्शनात अनुराधा वर्पे हिने गणितीय शैक्षणिक खेळणी यामध्ये संच म्हणजे काय, कोनांच्या जोड्या, घनफळ काढणे याची प्रतिकृती तयार केली होती .सदर उपकरणासाठी तिला तीस रुपये खर्च आला होता. तालुकास्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनापूर्वी देवगड विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याला अनुसरून निर्माण होणाऱ्या कलाकृतींना सादरीकरणाची संधी मिळावी आणि यातून संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी, आंतरशालेय विज्ञान-गणित प्रदर्शन भरवण्यात आले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : शहरालगत खांडगाव फाटा येथे भरधाव पीकअप आणि रिक्षाच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले. मृतात एका महिलेचा समावेश आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील खांडगाव फाटा येथे हा अपघात झाला. आशाबाई बबनराव चोथे (वय ४५, रा. आंबाईमाता मंदिर, पुणे), राजेंद्र उत्तम शेळके (वय ४५ रा. आंबेगाव, पुणे) अशी मृतांची नावे असून दत्ता पांडुरंग वराडे, कैलास चोथे, आशा चोथे, राजू शेळके यांचा जखमींमध्ये समावेश आहे. एम.एच. १७ सीव्ही ००२६ या क्रमांकाची पिकअप नासिक-पुणे मार्गावरून पुण्याच्या दिशेने जात होती. यावेळी खांडगाव फाट्यावर समोरून संगमनेरच्या दिशेने येत असलेली रिक्षा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : दिवसेंदिवस गंभीर बनलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकी विरोधात संगमनेरच्या महसूल विभागाने कारवाया सुरू केल्या आहेत. एकाच वेळी अवैध वाळूची वाहतूक करणारी तब्बल पाच वाहने महसूल विभागाच्या पथकाने पकडली आहेत. या सर्वांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूजला’ दिली. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. महसूलच्या पथकाने शहर व परिसरातून ही वाहने पकडली आहेत. गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारने गौण खनिजाबाबत कडक धोरण अवलंबिले आहे. याचा फटका वाळू तस्करांना बसला असून महसूल खात्याने अवैध वाळू तस्करी विरोधात कठोर पावले उचलण्यास…

Read More