Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागपूर संगमनेर विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सुविधांचा विकास आणि प्रलंबित प्रकल्पांना तातडीने चालना देण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आमदार अमोल खताळ यांच्या मागणीनुसार, १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय, घुलेवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम आणि कामगार रुग्णालय उभारणीच्या कामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश आरोग्यमंत्र्यांनी नागपूर येथे झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. नागपूर विधान भवनातील जुने कामकाज समिती कक्षामध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संगमनेरच्या आरोग्य सुविधांसंदर्भात बैठक पार पडली. यावेळी बैठकीसाठी राज्याचे आरोग्यसंचालक डॉ.नितीन अंबाडेकर सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड डॉ. सुनीता गोल्हाईत, जिल्हा डॉ. संजय घोगरे…
संगमनेर/नागपूर – संगमनेर बुद्रुक येथील सर्वे नं. १०६(४४२) मधील इंदिरानगर परिसरातील रहिवाशांच्या ४० ते ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालकी हक्काचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. महसूल अभिलेखात मणियार कुटुंबाची मालकी असतानाही प्रत्यक्ष ताब्यात असलेल्या या जमिनीच्या नोंदी रहिवाशांच्या नावे करण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याला यश आले आहे. दरम्यान यासंदर्भात दिरंगाई करणाऱ्या सब रजिस्ट्रारची बदली करून चौकशी केली जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली. या किचकट कायदेशीर प्रक्रियेत निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी आमदार तांबे यांनी थेट मणियार कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांची नावे कमी करून रहिवाशांना ‘कन्फरमेशन डीड’ करून देण्याची विनंती केली होती. मणियार कुटुंबीयांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन जमिनीच्या फेरफार नोंदीचा निकाल बाजूने लावण्यासाठी तब्बल १० लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सिन्नर येथील नायब तहसीलदार संजय धनगर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदाराकडून तडजोडीअंती अडीच लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे. नाशिक जिल्ह्यातील या घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांची सिन्नर तालुक्यातील दोडी शिवारात जमीन आहे. या जमिनीच्या फेरफार नोंदीचा निकाल त्यांच्या बाजूने लावण्यासाठी नायब तहसीलदार संजय धनगर याने त्यांच्याकडे सुरुवातीला १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने लाच देण्याची इच्छा नसल्याने याबाबत एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. वाटाघाटीनंतर लाचेची…
अहिल्यानगर – घारगांव (ता. संगमनेर) येथील मुळा नदीच्या पुलावरून फेकून दिलेल्या तीन महिने वय असलेल्या शिवांश उर्फ देवांश प्रकाश जाधव या बालकाचे खुनी अखेर जेरबंद झाले आहे. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या सखोल तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवांशचे आई-वडील आणि अन्य एका व्यक्तीनेच त्याचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न झाले आहे. ४ डिसेंबर रोजी सकाळी ०९.१६ वाजता आंबीखालसा येथील रहिवासी अशोक धोंडीराम माळी यांना मुळा नदीच्या पुलाखाली काटेरी झुडुपामध्ये अंदाजे ०३ ते ०४ महिन्यांच्या बालकाचा मृतदेह दिसला. या घटनेनंतर घारगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि. नंबर ७४/२०२५, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ प्रमाणे अकस्मात…
संगमनेर- नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे महत्त्व ओळखून, संगमनेर रेल्वे कृती समितीने येथील लोकप्रतिनिधींना केवळ छायाचित्रांसाठी स्टंटबाजी न करता, नाशिक-पुणे रेल्वे शिर्डीमार्गे वळवल्याबद्दल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन जनतेचा आवाज बुलंद करण्याचे आणि पाठपुरावा करण्याचे आवाहन केले आहे. समितीने शहरातील नवीन लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला असून, मागील एका वर्षात शहरात अमली पदार्थ आले पण विकासाची रेल्वे पळाली, असा थेट आरोप केला आहे. शिर्डीमार्गे वळवलेल्या रेल्वेला विरोध करा- लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी नाशिक-पुणे रेल्वेसाठी पाठपुरावा केला होता, मात्र विद्यमान सत्ताधारी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी ही रेल्वे शिर्डी मार्गे वळवली आहे. हा निर्णय संगमनेर, अकोले परिसराच्या औद्योगिक, व्यापार वाढीसाठी आणि तरुणांच्या नोकरी-व्यवसायासाठी अत्यंत नुकसानदायक ठरणारा आहे.…
नागपूर – पुणे–नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर शहरातूनच गेला पाहिजे, या मागणीकडे राज्य सरकारचे आणि विधिमंडळाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे (महायुती) आमदार अमोल खताळ पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात एक आगळेवेगळे आणि लक्षवेधी आंदोलन केले. त्यांनी ‘पुणे–नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेच गेली पाहिजे’ या मागणीचे घोषवाक्य लिहिलेला टी-शर्ट परिधान केला तसेच हातात फलक घेऊन थेट विधानभवनात प्रवेश केला. या कृतीने विधानभवनातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि संगमनेरकरांच्या भावना शासनापर्यंत पोहोचल्या. शिर्डी मार्गे मार्गाला विरोध; संगमनेरकरांमध्ये संताप – नारायणगाव जवळील ‘जीएमआरडी’ (दुर्बीण) च्या तांत्रिक अडथळ्याचे कारण देत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच लोकसभेत हा रेल्वेमार्ग शिर्डी मार्गे करण्याचे सूतोवाच केले होते. यामुळे संगमनेरकरांमध्ये…
संगमनेर- ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर आधारित कल्चर फौंडेशन आयोजित राज्यस्तरीय नृत्यस्पर्धेत संगमनेरच्या संस्कार-बालभवनच्या नृत्यांगणांनी नेत्रदीपक यश संपादन करत स्पर्धेवर आपले वर्चस्व सिद्ध केले. पारंपरिक भारतीय शास्त्रीय आणि लोकनृत्य प्रकारांवर आधारित या स्पर्धेत महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, ओडिशा, केरळ अशा विविध राज्यातील शालेय आणि महाविद्यालयीन स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. संगमनेर महाविद्यालयाच्या साईबाबा सभागृहात पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत, संस्कार-बालभवनची विद्यार्थिनी वेदीका हासे हिने उत्कृष्ट लोकनृत्य सादर करत ज्युनिअर गटात सुवर्णपदकासह पहिला क्रमांक पटकावून संगमनेरचे नाव उंचावले. याव्यतिरिक्त, इतर दोन्ही गटांमध्ये रौप्यपदकासह दुसरे स्थान मिळवत बालभवनच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेतील आपली गुणवत्ता सिद्ध केली. देशाच्या विविध संस्कृतीचे दर्शन- भारतीय पारंपरिक नृत्य प्रकारांना…
घारगाव (संगमनेर) – पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगावजवळ पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी अभिमन्यू सुरेश मोटे यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी घारगाव येथील अण्णासाहेब वाडगे आणि त्याचा मुलगा साहिल अण्णासाहेब वाडगे या दोघा बाप-लेकाविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी पुणे-नाशिक महामार्गावर नेहमीप्रमाणे वाहतूक ठप्प झाली असताना, पोलीस कर्मचारी अभिमन्यू मोटे हे कुटुंबियांसह नाशिकहून पुण्याकडे प्रवास करत होते. घारगाव येथे वाडगे याने अचानक आपली गाडी आडवी लावली. यानंतर, झालेल्या वादातून अण्णासाहेब वाडगे याने लोखंडी रॉडने पोलीस कर्मचाऱ्यास जबर मारहाण केली. या…
संगमनेर / पुणे – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) गंभीर आरोप करत, धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरी (व्होटचोरी) करणे हा भाजपचा मुख्य अजेंडा बनला असल्याची टीका केली आहे. महाराष्ट्र हा संतांची परंपरा जपणारा प्रदेश असताना आज उघडपणे धर्माचे राजकारण केले जात आहे, या पार्श्वभूमीवर त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन केले. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकशाहीची हत्या व व्होटचोरी यावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. थोरात यांनी ईव्हीएमबाबत निर्माण झालेल्या शंकांवरही भाष्य केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात…
संगमनेर, प्रतिनिधी – नाशिक-पुणे रेल्वे मार्ग संगमनेर तालुक्यातूनच झाला पाहिजे, या मागणीसाठी आपण लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह सातत्याने पाठपुरावा करत असून, रेडिओ दुर्बिणीचे कारण न देता हा मार्ग संगमनेरवरूनच नेण्याचा आपला आग्रह कायम आहे, असे ठाम प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले आहे. नाशिक-पुणे रेल्वे मार्गाबाबत संगमनेर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, अशोक सातपुते, मेजर महेंद्र सोनवणे, संदीप सातपुते आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. खासदार वाकचौरे म्हणाले, २००९ ते २०१४ या काळात तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्याने आम्ही या मार्गासाठी पाठपुरावा केला. तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी…
