Author: अनंत पांगारकर

संगमनेर, दि. १५ फेब्रुवारी – प्रतिनिधी वारंवार झालेल्या कारवाया आणि कधीही बंद न पडलेले संगमनेरमधील बेकायदेशीर कत्तलखाने दररोज या-ना त्याकारणाने चर्चेत असतात. घारगाव पोलिसांनी बजरंग दलाच्या मदतीने अशीच एक मोठी कारवाई केली असून या कारवाईमध्ये १७ गोवंश जनावरांसह संगमनेर मधील १० जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ वाहनांसह सुमारे १६ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची बेकायदेशीर कत्तलखान्याच्या माध्यमातून कत्तल केली जाते. येथील कत्तलखाने देशाच्या बहुतांश भागात प्रसिद्ध आहे. वारंवार कारवाया करून देखील पोलिसांसह नगरपालिका प्रशासनाला हे कत्तलखाने बंद करण्यात यश आले नाही. त्यामुळे कत्तलीसाठी दररोज मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची…

Read More

शनिवार, दि. १५ फेब्रुवारी – पुणे  हॉटेलचे बिल देण्यावरून मित्राच्या कानाखाली मारल्याचा राग मनात धरून मित्राला अंगावर कंटेनर घालून चिरडल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे.  पुण्यातील वाघोली रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. परमेश्वर बालाजी देवराये (वय ३५ वर्ष) असे अंगावर कंटेनर घालून मारण्यात आलेल्या मृत व्यक्तीचे नाव आहे. राम दत्ता पुरी (वय २६ वर्ष) असे आरोपी मित्राचे नाव असून पुरी याला पोलिसांनी अटक केली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या वाघोली येथील कटकेवाडी येथे एका हॉटेलमध्ये परमेश्वर देवराये आणि राम पुरी हे दोघे मित्र जेवण करण्यासाठी गेले होते. हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर हॉटेलचे बिल देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे परमेश्वर…

Read More

संगमनेर, दि. १५ फेब्रुवारी – प्रतिनिधी शाळेत आणलेल्या पुष्पगुच्छाच्या किरकोळ कारणावरून शिक्षिकेला शिक्षकाने टोमणे मारत मारहाण केल्याचे घटना शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील शाळेत घडली असून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात शिक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील श्रमशक्ती माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या शाळेत नियुक्तीस असलेल्या महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून संगमनेर तालुका पोलिसांनी शाळेतील शिक्षक दत्तू किसन कौटे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी शिक्षिकेच्या पतीचा वाढदिवस असल्याने तिने पतीला देण्यासाठी शाळेमध्ये गुरुवारी पुष्पगुच्छ आणला होता. या पुष्पगुच्छाच्या कारणावरून शाळेतील शिक्षक दत्तू किसन कौटे यांनी शिक्षिकेला…

Read More

संगमनेर, दि. १५ फेब्रुवारी – प्रतिनिधी मध्यंतरी कच्चा आणि शिळा मिठ्ठा वडा प्रकरणी एक व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर संगमनेरमधील मिठाई साठी प्रसिद्ध असलेले जोशी स्वीट होम चर्चेत आले होते. आता या जोशी स्वीट होमची अहिल्यानगरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून चौकशी सुरू झाली असल्याची माहिती समोर आली आहे. जोशी स्वीट होम अन्न औषध प्रशासनाच्या रडारवर आले असून संबंधित विभागाकडून काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे. जोशी स्वीट होम मधील अन्नपदार्थांच्या संदर्भाने तक्रारी झाल्यानंतर संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील त्यांच्या मुख्य दुकानात काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरच्या अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली व या तपासणीचा अहवाल…

Read More

अहील्यानगर दि. १५ –   पाटबंधारे विकास महामंडळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वयंपूर्ण झाली पाहिजेत, यासाठी महामंडळाने उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावेत, अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत दिल्या.  गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची ८४ वी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, लाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता विजय घोगरे, गवळी यांच्यासह वित्त व नियोजन विभागाचे व महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री विखे म्हणाले, महामंडळाकडे स्वतःचे उत्पन्न वाढले तर सिंचन प्रकल्पाची अनेक कामे…

Read More

# महाराष्ट्राने नवीन कायद्यांच्या अनुषंगाने एक आदर्श अभियोजन संचालनालय प्रणाली स्थापन करावी # कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यासाठी गुन्हे नोंदवले जाणे आवश्यक, एफआयआर दाखल करण्यात विलंब होता कामा नये # सात वर्षांहून अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त दोषसिद्धी दर मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत मुंबई, दि १५ :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) नवी दिल्लीत महाराष्ट्रातील नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील पोलीस, कारागृहे, न्यायालये, अभियोजन आणि फॉरेन्सिक यासंबंधीच्या विविध नवीन तरतुदींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय गृह सचिव, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक,…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे. शिवसेना शिंदे गटाने ऑपरेशन टायगर सुरु केले आहे. ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारीच नाही तर बडे नेतेही ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आहेत. कोकणातील उद्धव ठाकरेंचे निष्ठावान माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर मराठवाड्यातील नांदेडच्या पदाधिकाऱ्यांनी आज उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. शिवसैनिक उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून का जात आहे, याचे उत्तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे. दानवे यांनी कोणाचे नाव न घेता म्हटले की, समोरचे लोक बाजार मांडून बसले आहेत. पैशांची ऑफर देत आहेत. विकास कामांची ऑफर दिली…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीत स्थान दिल्याने साऱ्यांच्या नजरा अजित पवारांकडे एकवटल्या आहेत. देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या सलगीवरून सत्ताधारी पक्षाच्या आमदारासह विरोधकांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं होतं. त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीसुद्धा वारंवार केली जात आहे. इतकं असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना अभय देण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्याने स्थापन झालेल्या ‘कोअर ग्रुप’मध्ये मुंडेना सदस्य करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

संगमनेर, दि. १४ फेब्रुवारी – संगमनेर तालुक्यातील साकुर येथील सोनाराच्या दुकानावर टाकलेल्या दरोडा प्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यातील सहा आरोपींना तपास अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी गुरुवार आणि शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना २४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली आहे. या गुन्ह्यातील काही आरोपी अद्यापही फरार आहेत. नोव्हेंबर महिन्यात साकुर बस स्थानकाजवळ गजबजलेल्या परिसरात निखिल सुभाष लोळगे यांचे ‘कान्हा ज्वेलर्स’ नावाने सोन्याचे दागिने विक्रीचे दुकान आहे. पावणे दोन वाजण्याच्या सुमारास दुकानातील कामगार जेवण करण्यासाठी गेले असता दुकानात एक कामगार असल्याचे संधी साधून पल्सर दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी…

Read More

छत्रपती संभाजीनगर –  संगमनेरमधील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी तब्बल आठ-नऊ महिन्यापासून अटकेत असलेल्या मुख्य सूत्रधार संस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब कुटे याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन अर्ज नाकारल्याने कुटे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. कुटे याचा नियमित जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने नाकारल्यानंतर त्याने जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. मात्र औरंगाबाद खंडपीठानेही कुटेला दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दूधगंगा पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याचा तुरुंगातील मुक्काम जैसे थे राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयाचे ठेवीदारांनी स्वागत केले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये दूधगंगा नागरी सहकारी…

Read More