Author: अनंत पांगारकर

गुरुवार, ०२ जानेवारी  संगमनेर – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या आणि दुग्ध व्यवसाय दिशादर्शक ठरलेल्या संगमनेर तालुका राजहंस दूध संघाकडून नवीन वर्षात दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर मागे एक रुपयांची दरवाढ देण्यात येत असल्याची माहिती दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी दिली आहे. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे वाटचाल करणारा हा दूध संघ सातत्याने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. नव्या वर्षात शेतकऱ्यांना प्रति लिटर मागे एक रुपयांची दरवाढ मिळणार असल्याने तालुक्यातील दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने आनंद देणारी ही बाब असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. संगमनेर तालुका दूध संघाने घेतलेल्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे तालुक्यातील दूध उत्पादकांमध्ये…

Read More

अहिल्यानगर दि.१- वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे आणि रस्त्यावर धावणाऱ्या वाहनाची ओळख पटविण्याकरिता १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एचएसआरपी) बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या वाहनांना नंबर प्लेट बसविण्याकरिता जिल्ह्यासाठी सेवा पुरवठादार एफटीएएचएसआरपी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बुकींग करिता https://maharashtrahsrp.com हे संकेतस्थळ आहे. तसेच, अधिकृत फिटमेंट सेंटर्सची यादी https://transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रकाशित केली आहे. या संकेतस्थळावर नमूद एचएसआरपी उत्पादकांकडून अर्जदारांना अर्ज भरणे, शुल्क अदा करणे, आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेणे, अपॉईंटमेंट घेणे, अपॉईंटमेंटची तारीख बदलणे, सदर प्रक्रीयेबाबत अर्जदाराच्या…

Read More

बुधवार, ०१ डिसेंबर २०२५ संगमनेर – पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांची भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी भेट देत शहरातील विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. भाजपाच्या या मागण्याप्रश्नी पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. कायदा व सुव्यवस्था, चोऱ्या, पोलीस नावाचा बेकायदेशीर वापर, रिक्षा थांबे, अनावश्यक बॅरिकेटिंग आदी प्रश्नांचा यात समावेश आहे. शहरातील व्यावसायिक कासट बंधूंना झालेली मारहाण यामुळे संगमनेर मध्ये कायदा व सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात पोलीस तपासाबाबत पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपअधीक्षकांशी चर्चा केली. तात्काळ गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शहर आणि तालुक्याच्या अनेक भागात…

Read More

बुधवार, दि. ०१ जानेवारी २०२५ संगमनेर – गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय सहकार महर्षी क्रिकेट चषकासाठी स्पर्धांना सुरुवात झाली आहे. सतरा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत अनेक राज्यस्तरीय खेळाडूंचा सहभाग राहणार असल्याने ही क्रिकेट स्पर्धा क्रीडा रसिकांसाठी मोठी मेजवानी ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये तरुणांना करिअर संधी उपलब्ध करून दिला जात याचाच एक भाग म्हणून जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून संगमनेरमध्ये गेल्या २५ वर्षांपासून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. नासिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार व क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सत्यजित तांबे आणि माजी आमदार, जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.…

Read More

बुधवार दि. १ जानेवारी २०२५ अहिल्यानगर – महसूल खाते आणि भ्रष्टाचार असे समीकरण बनलेले आहे. सामान्य माणसांचे दैनंदिन काम महसूल खात्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडे पडते. त्यांच्याशिवाय खरेदी-विक्री, कर्जाच्या नोंदी, वारस नोंदी, विविध दाखले, प्रतिज्ञापत्र असे कुठलेही काम होत नाही. त्यामुळे सामान्य माणसांना लुबाडण्याचा आपल्याला जणू काही अधिकार मिळाला असल्याच्या अविर्भावात महसूल खात्याचे अधिकारी कर्मचारी वागतात. आतापर्यंत अनेकांना अटक झाल्यानंतर देखील त्यातून इतर कर्मचारी धडा घेताना दिसत नाहीत. अशाच प्रकारचा एक गुन्हा श्रीरामपुरात दाखल झाला. बेलापुरातील मंडलाधिकारी कार्यालयातील मदतनीस असलेल्या मांडवे येथील शहाजी केरू वडितके याने दहा हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाने त्याला अटक…

Read More

बुधवार, दि. ०१ जानेवारी २०२५ नाशिक – वकील असलेल्या तक्रारदार यांच्या पक्षकाराच्या बाजूने निकाल लाऊन दिल्याचे मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाचे महसूल सहायक कैलास वैरागे यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. विभागीय आयुक्त कार्यालय नासिक येथे दाखल केलेल्या पुर्न निरिक्षण दाव्याचा निकाल तक्रारदार यांच्या पक्षकारांच्या बाजूने लाऊन देण्याचे व नंतर लागलेला निकाल जाणीवपूर्वक विलंबाने अपलोड करून तो तक्रारदार यांच्या पक्षकाराच्या बाजूने लाऊन दिल्याचे मोबदल्यात वेळोवेळी फोनवरून तक्रारदार यांच्याकडे ३० हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने लाच लुचपत प्रतिबंधक…

Read More

कष्टकरी, शेतकऱ्यांसह सगळ्यांना घेणार सोबत, नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिल्या नागरिकांना शुभेच्छा मुंबई, दि. ३१ :- नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी गतीशील बनवायचे आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी ..महाराष्ट्र आता थांबणार नाही…अशी प्रतिज्ञा करूया, एकजूट करुया असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा निर्धार पूर्ण करण्यासाठी राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगारासह सर्वांचीच साथ लाभेल, असा विश्वास देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात नमूद केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, ‘येणारे वर्ष सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अखंडीत फडकत ठेवण्याची ऊर्जा आणि उर्मी मिळत राहो, हीच मनोकामना. छत्रपती शिवाजी…

Read More

मुंबई, दि. ३१ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला २०२५ या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारं नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारं, महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारं ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, महाराष्ट्रवासियांची एकजूट आणि निर्धाराच्या बळावर आपण आतापर्यंत राज्यावर येणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा यशस्वी मुकाबला केला. महाराष्ट्राची ही एकजूट यापुढेही कायम ठेवायची आहे. कृषी, उद्योग व्यापार, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, सामाजिक सुधारणा अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच देशात अव्वल राहिला आहे. महाराष्ट्राचं हे अव्वल स्थान…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी कथित आरोपी वाल्मिक कराड याचे पाठीराखे असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील पुरावे मिळाल्याशिवाय त्यांना मंत्रिमंडळातून दूर केलं जाणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच यासंबधीचा खुलासा करत मुंडे यांची एकप्रकारे पाठराखण केली आहे. संतोष देशमुखांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी विरोधक मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत आहेत असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “मला या प्रकरणातील राजकारणात जायचं नाही. मी अगोदरपासून सांगत आलो…

Read More

मंगळवार, ३१ डिसेंबर वाल्मीक कराड मंगळवारी पुणे पोलिसांना शरण आला आहे. या संदर्भात राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वपूर्ण विधान केले असून दहशत कायमची संपली तरच न्याय झाला असे म्हणता येईल, अन्यथा ही शरणागती तपासाची नौटंकी ठरेल असे म्हटले आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी आणि बीडमधील सरपंच हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड आज अखेर सीआयडीकडे शरण आला आहे. पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मागील २२ दिवसांपासून कराड हा फरार होता. वाल्मिक कराडसह सरपंच हत्या प्रकरणातील इतर फरार तीन आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी बीडमध्ये नुकताच सर्वपक्षीय मोर्चाही काढण्यात आला होता. या मोर्चानंतर सरकारवर निर्माण झालेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर सीआयकडून…

Read More