Author: अनंत पांगारकर

गुरुवार, २६ डिसेंबर मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या कचाट्यात सापडलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत डिसेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. ७० लाखांहून अधिक पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया मंगळवारपासून पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात आधार सीडिंग राहिलेल्या १२,८७,५०३ पात्र महिलांना आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७,९२,२९२ पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी…

Read More

गुरुवार, २६ डिसेंबर राज्यातील ग्रामीण भागात वाड्यापाड्यावर, खेड्यांमध्ये मूळ गावठाणात वाडवडिलोपार्जित जमिनीवर स्थायिक असलेल्यांना आता त्यांच्या जमिनीची मालकी अर्थात स्वामित्व मिळणार आहे. देशातील नागरिकांच्या मालमत्तांना अधिकृत चेहरा देणाऱ्या केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी ‘स्वामित्व’ योजनेचा शुभारंभ शुक्रवारी (२७ डिसेंबर) राज्यात ३० जिल्ह्यांत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही महत्वपूर्ण ‘स्वामित्व’ योजना जाहीर केली असून, या योजनेच्या माध्यमातून ३० हजार ५१५ गावांतील मालमत्ताधारकांना ‘डिजिटल प्रॉपर्टी कार्ड’ मिळणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ग्रामीण भागातील नागरिकांना ‘प्रॉपर्टी कार्ड’ मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांची आर्थिक पत सुधारण्यासाठी या योजनेचा फायदा होणार आहे. ‘प्रॉपर्टी कार्ड’ मिळाल्याने शेतकऱ्यांना मालमत्ता कर सुलभरीत्या भरता येणार असून,…

Read More

गुरुवार, २६ डिसेंबर मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची समाज माध्यमातून पोस्ट व व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातून बदनामी करणाऱ्या १२ प्रोफाइल विरोधात राज्याच्या सायबर विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडिया संदर्भात गंभीर पावलं – सोशल मीडिया संदर्भात सरकारने उचलली गंभीर पावलं – समाज माध्यमाचा चुकीच्या पद्धतीने होत असलेला वापर लक्षात घेत राज्य सरकारने आता सायबर गुन्ह्यांसंदर्भात गंभीर पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाबरोबरच गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. काय आहे प्रकार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जुन्या भाषणांमध्ये छेडछाड करून ती समाज माध्यमात पोस्ट करण्यात आली आहे. याप्रकरणी भाजपच्यावतीने पोलिसांकडे तक्रार करण्यात आली…

Read More

बुधवार, २५ डिसेंबर संगमनेर नगर परिषदेने अखेर मोठी कारवाई केली आहे. शहरातील दोघा प्लास्टिक विक्रेत्यांवर छापे टाकत पालिकेच्या पथकाने दीड टन प्लास्टिक जप्त केले. यात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांसह प्लास्टिकच्या वस्तूंचा समावेश आहे. संगमनेर नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ यांची विधानसभा निवडणुकीपूर्वी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर मुख्याधिकारी म्हणून रामदास कोकरे यांनी पदभार घेतला होता. कोकरे यांनी पदभार घेतल्यानंतर पालिकेच्या पथकाला बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या जप्त करून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पालिकेच्या पथकाकडून सातत्याने शहरातील किरकोळ विक्रेत्यांकडून प्लास्टिक जप्तीची कारवाई केली जात होती. एकीकडे किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई सुरू…

Read More

बुधवार, २५ डिसेंबर  संगमनेर – डॉ. जयश्री थोरात यांनी सावरगाव तळ येथील रामनाथ गुरकुले यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. मयत गुरुकुले कुटुंबाच्या पाठीशी माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे सदैव उभे असल्याचे सांगत या कुटुंबीयांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी, अशी मागणी थोरात यांनी केली आहे. चंदनापुरी शिवारात ढग्या डोंगराजवळ वनविभागाच्या मालकीच्या जंगलावर रामनाथ गुरुकुले (वय ३४ वर्ष रा. सावरगाव तळ, संगमनेर) यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला होता. बिबट्याच्या हल्ल्यात यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. थोरात म्हणाल्या, बिबट्यांचे मानवी वस्तीतील हल्ले दिवसेंदिवस वाढले आहे. यामुळे या परिसरात भीतीदायक वातावरण आहे. यापूर्वीही तीन मृत्यू या हल्ल्यातून झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी…

Read More

बुधवार, २५ डिसेंबर  संगमनेर – संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या आदेशावरून महसूलच्या पथकाने केलेल्या कारवाईत वाळू वाहतूक करणारी विना क्रमांकाची पिकअप वाळूसह पकडली असून विनापरवाना बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या अमोल संजय जोंधळे (रा. गोल्डन सिटी, संगमनेर) याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांना शहरातून मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. मांजरे यांनी तात्काळ आपल्या महसूलच्या अधिकाऱ्यांना गेल्या बुधवारी शहर व आसपासच्या परिसरात शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. ग्राम महसूल अधिकारी संतोष जाधव, मच्छिंद्र तात्याबा राहणे आदींनी तहसीलदारांच्या आदेशावरून शहर व परिसरात विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यांचा शोध सुरू…

Read More

बुधवार २५ डिसेंबर मुंबई – रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाला मुहूर्त लाभल्यानंतर मंत्र्यांनी आपापल्या खात्याचा पदभार स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान मंगळवारी तब्बल डझनभर आयएएस अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने बदल्या केल्या आहेत. दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी अनिल डिग्गीकर यांची बदली करण्यात आली. तर बेस्टमध्ये खांदेपालट करत नवे महाव्यवस्थापक म्हणून हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव राधाकृष्णन यांची महाजनकोच्या अध्यक्षपदी बदली करण्यात आली आहे. महाजनकोचे अध्यक्ष अनबल्गन यांच्याकडे आता उद्योग विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांच्याकडे नागपूर टेक्सटाईल आयुक्तपदाची धुरा असणार आहे तर आयुक्त अविशांत पांडा यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात…

Read More

अहिल्यानगर दि.२४ – सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याने शेतकऱ्यांना नुकसान होईल अशी कोणतीही कृती कारखान्यांनी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखान्यांच्या प्रश्नाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस प्रादेशिक सहा संचालक साखर संतोष बिडवई, निवासी उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, उपसंचालक साखर संजय गोंदे, जिल्हा सहकार उपनिबंधक गणेश पुरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, विशेष लेखा परीक्षक आर. एफ. निकम आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा कमी दर देऊ नये. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शेतकऱ्याचे समाधान होईल असा दर देण्याचा प्रयत्न करावा. शेतकऱ्याला अधिकची रक्कम देता…

Read More

मंगळवार, २४ डिसेंबर अहिल्यानगर – न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवत राज्यात बहुतांश ठिकाणी बेकायदेशीर फ्लेक्सचा सुळसुळाट झाला आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात बॅनर, फलक, मोठे जाहिरात बोर्ड लावल्याचे प्रकार समोर आल्याने अशा अनधिकृत फलकांवर व फ्लेक्स बोर्डवर महानगरपालिकेमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील संगमनेर नगरपरिषद अशी कारवाई कधी करणार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.गेल्या महिनाभरात महानगरपालिका प्रशासनाने १२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर ७११ फलकांवर कारवाई करत ३४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ही माहिती दिली. अनधिकृत फ्लेक्स बोर्ड संदर्भात कारवाईसाठी न्यायालयाने आदेश दिलेले…

Read More

मंगळवार २४ डिसेंबर संगमनेर – येथील शांती फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्ष व माजी नगराध्यक्षा दूर्गाताई तांबे यांनी पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा केली. ५ जानेवारीला संगमनेरमध्ये विविध मान्यवरांचे उपस्थितीत पुरस्कारार्थींचा सन्मान केला जाणार आहेत. नाट्य क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल आणि मराठी, हिंदी विविध दूरचित्र वाहिन्यांवरील मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे उलटा चष्मा फेम डॉ. राजेश आहेर यांना नाट्य क्षेत्रासाठीचा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. तमाशा क्षेत्रात योगदान देऊन ग्रामीण व शहरी जनतेचे मनोरंजन करतानाच प्रबोधनाची परंपरा चालवणारे जेष्ठ कलावंत आणि महाराष्ट्र राज्य लोकनाट्य मंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांना कांताबाई सातारकर…

Read More