Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: देशातील सहकार क्षेत्रासाठी एक आदर्श ठरलेल्या संगमनेरच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच गुरुवारी (१४ ऑगस्ट) होणार आहे. या कार्यक्रमाला माजी महसूल व कृषी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आणि आमदार सत्यजित तांबे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने कायमच शेतकरी, कामगार आणि ऊस उत्पादकांचे हित जपले आहे. तसेच, कारखान्याने ५५०० मेट्रिक टन गाळप क्षमता आणि ३० मेगावॅट वीज निर्मितीचा प्रकल्प यशस्वीपणे राबवून राज्यासाठी एक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुम्ही घेतलेल्या मेहनतीला यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ : आज तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. शांत डोक्याने विचार करून निर्णय घ्या. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. प्रवासाचे योग आहेत. मिथुन : आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरेल. तुमचे काही जुने मित्र भेटतील. व्यावसायिक जीवनात प्रगती होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कर्क : आज तुम्ही थोडं भावनिक होऊ शकता. कामावर लक्ष केंद्रित करा आणि अनावश्यक विचार टाळा. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा. संध्याकाळी चांगली बातमी मिळू शकते. सिंह…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर, प्रतिनिधी: आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. निवडणुका ईव्हीएमवर असोत किंवा बॅलेट पेपरवर, जनता पुन्हा एकदा विरोधकांना घरी बसवेल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. संगमनेर येथील कुंभार गल्लीमध्ये शिवसेना शाखेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार खताळ यांनी कार्यकर्त्यांना सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलं. यावेळी शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खताळ म्हणाले, शिवसेना पक्षात कार्यकर्ता हे पद सर्वात महत्त्वाचे आहे. मी या मतदारसंघाचा आमदार असलो तरी, सर्वप्रथम एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी कार्यकर्ता म्हणूनच…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी : राज्यात भाकड जनावरे आणि वासरांचा प्रश्न गंभीर बनल्याने, शिव आर्मी शेतकरी संघटनेने आज (मंगळवारी,१३ ऑगस्ट) संगमनेर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात शेतकरी आपली भाकड जनावरे घेऊन सहभागी झाले होते. आंदोलकांनी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आणि नंतर थेट प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडत घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांनी भाकड जनावरे आणि वासरांच्या सरकारी खरेदीची मागणी केली आहे. सध्या अशा जनावरांची खरेदी-विक्री पूर्णपणे थांबली आहे, त्यामुळे ती शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक बोजा बनली आहेत. या जनावरांचे योग्य संगोपन करण्यासाठी सरकारने गोशाळा किंवा शासकीय केंद्र स्थापन करावीत, अशीही मागणी आंदोलकांनी केली. तसेच, शासनाकडे जमा केलेल्या जनावरांच्या बदल्यात शेतकऱ्यांना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: रोटरी क्लब ऑफ संगमनेरने जालना येथे झालेल्या रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. क्लबने तब्बल सात मानाचे पुरस्कार पटकावत जिल्ह्यामध्ये आपली छाप पाडली. या सोहळ्यात क्लबचे अध्यक्ष साईनाथ साबळे यांना ‘बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार पीडीजी मोहन पालेशा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. सुरेशजी साबू, निर्मला साबू, डीजी सुधीर लातूरे, रो. जयेशभाई पटेल, रो. क्षितिज झावरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील एकूण ९२ क्लबमधून रोटरी क्लब ऑफ संगमनेरची निवड झाली. क्लबला बेस्ट डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट सीपीआर, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सायटेशन अवॉर्ड,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका हा राज्यात अग्रेसर बनवला. संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे. या तालुक्यातील विविध 8 रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 40 कोटी रुपयांचा निधी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर करून घेतला होता. मात्र नवीन लोकप्रतिनिधीने आठ महिन्यात एक रुपयाचा निधी न आणता राजकारणासाठी मंजूर रस्त्यांची कामे रद्द करून दुर्दैवी राजकारण केले असल्याची टीका संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर यांनी केली असून मर्जीतील ठेकेदारांना सांभाळण्यासाठी केलेल्या या उद्योगाने तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे.  तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अकोले: आपल्याच मित्राच्या गळ्यातील सोन्याची चेन पाहून त्याची नियत फिरली आणि त्याने वेशांतर करून चोरी केली. मात्र, राजूर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तपास करून आरोपी मित्राला अटक केली. त्याच्याकडून चोरीला गेलेल्या सुमारे साडेचार लाख रुपयांच्या दोन सोन्याच्या चेन जप्त करण्यात आल्या आहेत. मौजमजा करण्यासाठी ही चोरी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सागर दिगंबर पवार (रा. राजूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने त्याचा मित्र विष्णू रामभाऊ हेकरे यांच्याच घरात रविवारी मध्यरात्री चोरी केली होती. पहाटेच्या सुमारास विष्णू हेकरे रात्री झोपले असताना, त्यांच्या दरवाजावर थाप मारण्यात आली. त्यांनी दरवाजा उघडताच तोंडाला रुमाल बांधलेला एक तरुण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पाच अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले असून, २७ वर्षीय मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील काळाचौकी येथे पोलीस ठाण्यात या संदर्भात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी सुमारे १४ वर्षे नऊ महिन्यांची आहे. गेल्या वर्षी १ ऑक्टोबर रोजी १७ वर्षांच्या एका अल्पवयीन आरोपीने पीडित मुलीसोबत जवळीक साधली. त्यानंतर तो तिला २७ वर्षीय आरोपीच्या घरी घेऊन गेला, जिथे दोघांनी तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचे व्हिडिओ चित्रीकरणही केले. नंतर या आरोपींनी पीडितेला धमकावून अश्लील व्हिडिओ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर, प्रतिनिधी: अवघ्या दोनशे रुपयांच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना संगमनेरच्या आश्वी बुद्रुक येथे समोर आल्याचे वृत्त समोर येऊन काही तास उलटत नाही तोच तालुक्यातील जाखुरी येथे महिलेची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने संगमनेरमध्ये खळबळ उडाली आहे. संगीता भारत मोरे (वय ४०, रा. नादनठाण, ता. वैजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती भारत मोरे याला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. संगीता मोरे, त्यांचे पती भारत मोरे आणि त्यांच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती जाखुरी येथील जावई सोमनाथ सुरशे यांच्या घरी मुक्कामी आले होते. रविवारी रात्री सर्व कुटुंबियांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त (२७ सप्टेंबर) ‘आय लव्ह संगमनेर’ संस्थेने पोलीस भरती, आर्मी भरतीसह इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष अभियानाचे आयोजन केले आहे. या उपक्रमात तरुणांना मार्गदर्शन, सराव परीक्षा आणि शारीरिक चाचण्यांची तयारी करून घेतली जाईल. या माध्यमातून संगमनेर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आमदार सत्यजीत तांबे हे तरुणांना प्रोत्साहन देणारे आणि त्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या याच कार्याचा एक भाग म्हणून ‘आय लव्ह संगमनेर’ या संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे. यासंदर्भात माहिती देताना स्पर्धा…

Read More