Author: अनंत पांगारकर

संगमनेर, दि. ११ मार्च – प्रतिनिधी  मार्च महिना असल्याने संगमनेर नगर परिषदेची वसुली मोहीम जोरात सुरू आहे. पालिकेने लावलेल्या जाचक शास्ती आणि दंडामुळे नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असून पालिकेच्या तिजोरीत मात्र कोट्यावधी रुपयांची भर पडणार आहे. शास्ती आणि दंडाच्या पठाणी वसुलीमुळे संगमनेरकर नागरिक हैराण झाले असून सत्ताधारी आणि विरोधकांनी या प्रश्न मौन बाळगले आहे. सत्ता बदल होऊनही संगमनेरकरांच्या पदरी निराशाच आली आहे. संगमनेर नगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात विनापरवाना बांधकामे करण्यात आली आहे. विनापरवाना करण्यात आलेल्या बांधकामांना संकलित कराच्या दोन पट शास्ती, दंड वसूल केला जात आहे. यामुळे छोटेसे घर बांधून राहणाऱ्या संगमनेरकरांना मात्र मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यातच पालिकेच्या…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठया गाजावाजात सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील नागरिकांना काय मिळणार? याकडं सर्वांचं लक्ष होतं. सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी या अर्थसंकल्पात ३६ हजार कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र, महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. यामुळे लाडक्या बहिणींची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो, केली विकासाची कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो.. पुन्हा आलो.. असे म्हणत लाडक्या बहि‍णींच्या आशीर्वादामुळेच राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्याचं अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना…

Read More

मुंबई, दि. १० मार्च “महाराष्ट्र आता थांबणार नाही..”राज्य सरकारचा वादा पूर्ण करणारा असा हा अर्थसंकल्प असल्याचे स्पष्ट करत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी व जनकल्याणासाठी आज सादर झालेला अर्थसंकल्प महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सोमवारी (१० मार्च) २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाबाबत खताळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सादर झालेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत करत खताळ म्हणाले, राज्याच्या गोरगरीब, शेतकरी, महिला तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी महायुती सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. हा अर्थसंकल्प राज्यातील ग्रामीण भागाचा विकास, शेतकरी कल्याण, महिला सशक्तिकरण, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत…

Read More

देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पसिद्धीला बळ देणारा अर्थसंकल्प अजित पवार यांच्याकडून सादर शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास क क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला, ‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प मुंबई, दि. 10 :-  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या संकल्पपूर्तीला बळ देणारा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’ असे सांगत शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास…

Read More

अहिल्यानगर, दि. १० – प्रतिनिधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम.किसान) योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पीएम किसान लिस्ट एपीके किंवा पीएम किसान एपीके या संदेशाची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील रक्कम गायब होत आहे. शेतकऱ्यांनी वरील संदेशाची लिंक उघडू नये. तसेच अशी काही घटना घडल्यास अथवा आढळून आल्यास तात्काळ सायबर पोलीसांकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.

Read More

छत्रपती संभाजीनगर दि. १० मार्च – प्रतिनिधी राज्यात हायटेक ठरलेल्या संगमनेरच्या बसस्थानकामध्ये बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलामध्ये तीन टक्के कोठ्यातील दर्शनी भागातील बांधीव गाळे दिव्यांग तक्रारदारांना देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. सात ते आठ वर्षांपासून प्रदीर्घ लढा देणाऱ्या दिव्यांग बांधवांना यामुळे मोठे यश मिळाले आहे. संगमनेर बसस्थानकामध्ये बांधकाम ठेकेदार रामहरी कातोरे यांच्या मार्फत बांधा वापरा व हस्तांतरित करा (BOT) या तत्त्वावर व्यापारी संकुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बांधव क्षेत्रातील तीन टक्के गाळे हे दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित असल्याने त्यासाठी शिवाजी संभाजी खुळे यांच्यासह जालिंदर कचरू लहामगे, पुरुषोत्तम बिषणलाल जोशी, शिवाजी गवराम कासार, सुनील बाबुराव खरे…

Read More

संगमनेर, दि. ९ मार्च – प्रतिनिधी  संगमनेर तालुक्यातील जागृत देवस्थान असलेल्या काकडवाडी येथील महालक्ष्मी माता मंदिरात जबरी चोरीची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी ५१ डोळे सोन्याच्या मुकुटासह २ किलो वजनाच्या चांदीच्या वस्तूंची चोरी केल्याचे समोर आले आहे. अज्ञात चोरट्याने धार्मिक स्थळावर मोठा डल्ला मारल्याने गुन्हेगारांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. चोरीच्या घटनेची माहिती समोर येताच संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह पोलीस घटनास्थळी तातडीने हजर झाले होते. दरम्यान चोरट्यांनी मंदिरातून केवळ सोन्या-चांदीचे दागिनेच चोरले नाही तर सुरक्षेसाठी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर (DVR) देखील चोरून नेला आहे. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.…

Read More

संगमनेर, दि. ९ मार्च – प्रतिनिधी शिवजयंती उत्सव आठवडाभरावर येऊन ठेपला असताना या उत्सवाच्या तयारीवरून संगमनेरात मोठे वादंग निर्माण झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये यावेळी वाद निर्माण झाला. दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस यंत्रणेकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नव्हती. घटनास्थळी संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी यांच्यासह पोलीस दल तसेच संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे पोहोचले होते. पोलिसांसमोरच काँग्रेस आणि शिवसेनेच्या दोन्ही गटात उत्सवावरून वाद सुरू होते. पोलिसांसह दोन्ही गट ठाण मांडून बसले आहेत. रविवारी पोलिसांनी प्रवेशद्वाराजवळ पोलीस व्हॅन…

Read More

राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात वादातील मंत्र्यांना आणि सत्ता समर्थकांना वाचवण्याची कसरत सुरू आहे. गैरवर्तणुकीचा जनठपका बसलेल्यांना सत्तेत सामील करून घेताना सारासार विचार न करणार्‍या मुख्यमंत्र्यांवर अशी वेळ याआधीही आली होती. तेव्हा फारकाळ न थांबता अशा मंत्र्यांना आणि सत्ता समर्थकांना वेळीच पायउतार व्हावं लागलं. सध्या त्यासाठी दिवसांवर दिवस आणि महिन्यांवर महिने घालवले जात आहेत. मंत्र्यांना वाचवण्याचा हा सिलसिला महाराष्ट्रासाठी घातक आहेच, पण देशभर गौरवल्या गेलेल्या राज्य विधिमंडळाच्या एकूणच परंपरेला छेद देणारा आहे. ज्यांना वाचवण्याची शिकस्त मुख्यमंत्र्यांना करावी लागत आहे ते सारे सत्ताधारी पक्षांशी संबंधित असल्याने युतीच्या सत्तेविषयी घृणा निर्माण होणं स्वाभाविक आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाने असंख्य चढ उतार पाहिले.…

Read More

संगमनेर, दि. ८ मार्च – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील कोंची गावच्या शिवारात असलेल्या वनक्षेत्राच्या जमिनीतून मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे मुरूमाची तस्करी होत असल्याचा प्रकार महसूलच्या कारवाईत समोर आला आहे. मुरूम उत्खनन करणारे काही वाहनांसह जण फरार झाले असले तरी एक डंपर आणि पोकलेन ताब्यात घेण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे. याप्रकरणी होणाऱ्या कारवाईकडे लक्ष लागले असून या परिसरातून हजारो ब्रास मुरूम चोरी झाल्याचा संशय आहे. शनिवारी दुपारी कोणत्याही कायद्याला न जुमानता बिनधास्तपणे मुरूम वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. नव्या सरकारच्या काळात राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातच बीड सारख्या जिल्ह्यात आका संस्कृती उदयास आली असून असे आका आता…

Read More