Author: अनंत पांगारकर

शिर्डी, रविवार दि. ०९ –  सहकार चळवळीतील संस्था नैतिक मूल्यांच्या आधारावर पारदर्शकपणे चालविल्यास सहकार क्षेत्राची निश्चितच भरभराट होईल, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व राज्य शासनाचा सहकार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते‌. यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार काशीनाथ दाते, सहकार विभागाचे अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, राष्ट्रीय सहकार परिषदेचे अध्यक्ष उदय जोशी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फिडरेशन…

Read More

संगमनेर, दि. ०९ फेब्रुवारी – लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा करून संगमनेर तालुक्यातील विविध पाणीपुरवठा योजनेकरिता सुमारे ८०० कोटी रुपये निधी मंजूर करून काम सुरू केले. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी राजकीय हेतू ठेवून अनेक कामे बंद पडली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत असून चंदनापुरी, झोळे व हिवरगाव पावसा जलजीवन योजनेतील पाणीपुरवठा योजनेचे बंद असलेले काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी सरपंच भाऊराव राहणे यांनी केली असून तातडीने काम न सुरू झाल्यास आत्मदहनाचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबत चंदनापुरीचे सरपंच भाऊराव राहणे, यांनी ज्येष्ठ नेते आर. बी. राहणे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन प्राधिकरण व जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांना हे निवेदन…

Read More

रविवार, दि. ९ फेब्रुवारी – दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या तळीरामाला पुण्याच्या शिवाजीनगर मोटर वाहन न्यायालयाने कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. ३ ऑगस्ट २०२४ रोजी कोथरुड वाहतूक विभागाने रब्बीन रमजान शेख (वय २९, रा. जनवाडी, पुणे) याच्या विरोधात दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी मोटार वाहन कायद्यान्वये खटला दाखल केला होता. बुधवारी (५ फेब्रुवारी) या खटल्याचा शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयातील न्यायाधीश बिराजदार यांनी निवाडा केला. न्यायालयाने शेख याला ५ दिवसांची साधी कैद आणि २० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

Read More

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्याच्या मुहुर्तावर पक्ष प्रमुख राज यांनी राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाचा अन्वयार्थ सांगून टाकला. राज हे हजरजबाबी असल्याने त्यांच्या म्हणण्याला जरूर अर्थ असतो. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात निर्माण झालेल्या सन्नाट्याने निकालाचं सार सांगून टाकलं. निकाल किती योग्य आणि किती अयोग्य, याचे पाढे वाचले गेले. ज्यांना अपेक्षा नव्हती ते केवळ निवडूनच आले असं नाही तर त्यांना मिळालेली मतं ही अनपेक्षितच होती. अशा विजयाचा सोहळा कोणी साजरा करत नसतो. यामुळेच प्रचंड विजय होऊनही भाजप आणि त्यांच्या युती सरकारमधल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मौनात सोहळा साजरा केला. यापूर्वी असं कधी झालं नाही. अगदी एक दोन अतिरिक्त जागा मिळाल्या तरी आनंदाला पारावार…

Read More

विशेष प्रतिनिधी / नवी दिल्ली दिल्ली विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल समोर आला आहे. गेल्या ३ विधानसभा निवडणुकांमध्ये दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाला भरभरुन मतदान केलं. पण त्याच दिल्लीकरांनी आता भाजपच्या झोळीत मतांचं दान टाकलं. भाजप आणि आपमध्ये थेट निवडणूक झाली. पण या सगळ्यात खरा गेम काँग्रेसनं केला. २०१५, २०२० आणि आता २०२५, अशा सलग तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला दिल्लीत भोपळाही फोडता आलेला नाही. पण या निवडणुकीत त्यांनी अरविंद केजरीवालांच्या आपचं मोठं नुकसान केलं. दिल्ली विधानसभेत एकूण ७० जागा आहेत. पैकी ४८ जागांवर भाजपनं विजय मिळवला आहे. तर आपने २२ जागांवर विजय नोंदवत एका मतदारसंघात आघाडी राखली आहे. काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही.…

Read More

शनिवार, दि. ०८ फेब्रुवारी – सोन्याच्या कारखान्यात घडविलेले सुमारे वीस लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन दागिन्याच्या दुकानात जात असताना कर्मचाऱ्यांच्या हातातील पिशवी हिसकावत पसार झालेल्या दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी, चिरंजीत अंबिका बाग हे अभिजीत दास यांच्या ‘अभिजीत गोल्ड’ या सोन्याच्या कारखान्यात कामाला आहे. कारखान्यात घडवलेले १९ लाख ९४ हजार १०० रुपये किमतीचे २५५ ग्रॅम वजनाचे दागिने एका तांबड्या रंगाच्या पिशवीत घेऊन ते गुरुवारी पुण्याच्या मोती चौकातील पीपीएमएस गोल्ड येथे पायी घेऊन जात होते. मोती चौका जवळील पुष्पम गोल्ड या दुकानासमोर फुटपाथवरून जाताना त्यांच्याजवळ आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांना पत्ता विचारण्याचा बहाना केला. त्याच…

Read More

शनिवार, दि. ०८ फेब्रुवारी – संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नियुक्तीस असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने शिर्डी येथे आपल्या राहत्या घराच्या बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली. जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर शिर्डीच्या साईनाथ सुपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. गणेश वाळके असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. वाळके यापूर्वी शिर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. सध्या ते संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असून शिर्डीतील भन्साळी स्क्वेअर इमारतीत राहत होते. या राहत्या घराच्या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत वाळके यांना शिर्डीच्या श्री साईनाथ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये…

Read More

मुंबई, दि. ०८ : मराठी भाषा विभागाअंतर्गत २०२४ करिता विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर करण्यात आला आहे. नामवंत प्रकाशन संस्‍थेसाठी २०२४ चा श्री. पु. भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे या संस्थेला, डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २०२४ हा डॉ. रमेश सिताराम सुर्यवंशी यांना आणि मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार २०२४ हा श्रीमती भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झाला आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रूपये १० लाख असे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. नामवंत प्रकाशन संस्था पुरस्कार- मानपत्र, सन्माचिन्ह व रूपये ५ लाख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तर भाषा अभ्यासक आणि भाषा संवर्धन पुरस्कार-…

Read More

शुक्रवार, दि. ०७ फेब्रुवारी – संगमनेर तालुक्यातील रहिवासी असलेल्या आणि पुणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात टायगर पॉईंट येथे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. अण्णा उर्फ अनिल बादशहा गुंजाळ असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक असलेले अण्णा गुंजाळ हे गेल्या दोन वर्षापासून पुण्यातील खडकी पोलीस ठाण्याच्या तपास पथकामध्ये कार्यरत होते. गेल्या तीन दिवसांपासून ते कर्तव्यावर नव्हते. वारंवार त्यांना संपर्क करून देखील कुटुंबीयांचा त्यांच्याशी संपर्क होत नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत…

Read More

संगमनेर दि. ०७ फेब्रुवारी – संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये गुरुवारी झालेल्या लिलावामध्ये कांद्याला २८५१ रुपयांचा भाव मिळाला. याशिवाय बाजार समितीमध्ये १५०० ग्रेट टोमॅटो आवक झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संगमनेर तालुक्यासह शेजारच्या तालुक्यातून एक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीसाठी आणला होता. बाजार समितीमध्ये ११,६७८ कांदा कोणाची आवक झाली. झालेल्या लिलावामध्ये प्रतिक्विंटलला प्रतिवारीनुसार मिळालेला भाव पुढील प्रमाणे… सुपर गोळा माल – २९११ ते ३०११, एक नंबर कांदा – २४०० ते २८५१, दोन नंबर कांदा – १८०० ते २२०१, तीन नंबर कांदा – ५०० ते १६०० रुपये. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी…

Read More