Author: अनंत पांगारकर
बुधवार, २३ ऑक्टोबर लाखो रुपयांचे विदेशी मद्य घेऊन निघालेला एक मोठा ट्रक संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा शिवारात संगमनेर-अकोले तालुक्याच्या बॉर्डरवर एका ओढ्यात पलटी झाला. या ट्रकमध्ये असलेल्या लाखो रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्यांचे खोके आजूबाजूच्या लोकांनी आणि काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी चोरले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी या ट्रकचा चालक आणि दारू घेऊन पळालेले चोरटे अद्याप सापडलेले नाहीत. नाशिकहून पुण्याकडे जाणारा हा ट्रक मुख्य महामार्गाने न जाता ग्रामीण भागात घुसलाच कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून मॅकडॉल कंपनीच्या दारूच्या बाटल्याचे बॉक्स घेऊन अशोक लेलँड कंपनीचा ट्रक (क्र. एम.एच.१२ एल.टी. ७३२९ हा पुणे…
बुधवार, २३ ऑक्टोबर २०२४ मेष – आजचा दिवस आपल्याला अनेक दृष्टीने अनुकूल ठरेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस. अपेक्षित गाठीभेटी होतील. धनलाभाचे योग. वृषभ – आपल्या कार्यक्षेत्रात तसेच नोकरीच्या ठिकाणी तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. आरोग्य चांगले राहून आर्थिक लाभ संभवतो. स्थावर- जमिनी विषयीची कामे गतीमान होतील. मिथुन – व्यवसाय-धंद्यात अचानक धनलाभ संभवतो जुनी आर्थिक येणी येतील. परिवारातून आनंददायक वाढता मिळतील. कुटुंबात एखादे धार्मिक अनुष्ठान घडू शकेल. नातेवाईक आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. कर्क – काही अप्रिय निर्णय स्वीकारावे लागण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता जाणवेल. शांतचित्ताने देणे द्या. वादविवाद टाळा. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न अथवा समस्या…
मंगळवार, २२ ऑक्टोंबर संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अकरा इच्छुकांनी पहिल्याच दिवशी पंचवीस उमेदवारी अर्ज नेले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी दिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठीची रंगत आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व गेल्या चार दशकांपासून माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात करत आहेत. दरवेळी त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या उमेदवार विरोधी पक्षांकडून देण्यात आला. यावेळी देखील विरोधी पक्षाकडून कोणाला संधी मिळते याची उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून अहिल्यानगरचे माजी खासदार सुजय विखे यांनी तेथील पराभव जिव्हारी लागल्याने या मतदारसंघात थोरात यांच्या विरोधात जोरदार प्रचार मोहीम राबविली असली तरी ते उमेदवार असतीलच याबाबत मात्र साशंकता आहे.…
मंगळवार, २२ ऑक्टोबर पुण्यातील खेड शिवापूर येथील टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी एका वाहनातून नेले जात असलेले पाच कोटी रुपये जप्त केले होते. याबाबत पुण्याचे एस पी पंकज देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधून यासंदर्भात माहिती दिली आहे.आयकर विभाग आणि निवडणूक आयोग यांच्यासोबत मिळून ही कारवाई करण्यात आली होती. पाच कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारी एम.एच. ४५ ए.एस. २५२६ या क्रमांकाची गाडी अमोल नलावडे यांच्या मालकीची असून त्यांनी ही गाडी आपण बाळासाहेब आसबे यांना विकल्याचा दावा केला आहे. नलावडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्याशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. तसेच ज्यांच्याकडे हे पैसे सापडले ते…
मंगळवार, २२ सप्टेंबर विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी होताच उमेदवारी अर्ज घेण्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने अहिल्यानगर जिल्ह्यात उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. तर जिल्ह्यात शेवगाव विधानसभा मतदारसंघ तीन आणि कर्जत जामखेड मतदार संघात एका उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज पहिल्याच दिवशी दाखल केला आहे.विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम खऱ्या अर्थाने मंगळवारपासून सुरू झाला आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील विविध मतदारसंघात मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज नेले असल्याने मोठ्या संख्येने उमेदवार मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. मतदार संघ निहाय विक्री झालेले उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे… संगमनेर – ११ व्यक्ती २५ अर्ज राहुरी – २० व्यक्ती २९ अर्ज नेवासा – २० व्यक्ती ४१…
मंगळवार, २२ ऑक्टोबर मुंबई – सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून पंचवीस-पंचवीस कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूरच्या डोंगार झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत? असा प्रश्न करत आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. पवारांचा हा व्हिडिओ आणि त्या अनुषंगाने उपस्थित केलेले प्रश्न चर्चेत आले आहे. आमदार रोहित पवारांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे की, लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा…
मंगळवार, २२ ऑक्टोबर मुंबई – भारतीय जनता पक्षाने आपली ९९ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना एबी फॉर्म चे वाटप केले आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातून अकोले मतदार संघात विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांना एबी फॉर्म दिल्याने ते महायुतीचे या मतदारसंघातील उमेदवार असतील. अकोले मतदार संघाची जागा डॉ. किरण लहामटे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे राहिली आहे. लहामटे यांना एबी फॉर्म मिळाल्याने महायुतीच्या जागा वाटपात ही जागा अजित पवार गटाकडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. समोर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच गेल्या वेळी…
मंगळवार, २२ ऑक्टोंबर पुणे – पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास ५ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. संबंधित गाडी सत्ताधारी आमदाराची असल्याची प्राथमिक माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे-सातारा मार्गावर खेड-शिवापूर येथे पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत आहे. या नाकाबंदी दरम्यान खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ एका वाहनातून मोठी रक्कम पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. पोलिसांना संबंधित गाडीतून किती रोख रक्कम मिळाली आहे? याबाबतचा अधिकृत आकडा समजू शकलेला नाही. पण माहितीनुसार, या गाडीत पोलिसांना जवळपास ५ कोटींची रोख रक्कम मिळाली आहे. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आहे आणि पुढील तपास सुरु केला आहे. ही गाडी एका बड्या नेत्याची तथा विद्यमान आमदाराची असल्याची…
मंगळवार, २२ ऑक्टोबर वहिवाटिस बंद केलेला रस्ता पुन्हा सुरू करण्यासाठी अडीच वर्षाच्या बालकासह संपूर्ण कुटुंबाचे संगमनेर प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू होऊन चार दिवसाचा कालावधी उलटला तरी देखील मार्ग निघाला नव्हता. अखेरीस ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’आणि ‘संगमनेर टाइम्स’ने या उपोषणकर्त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली. आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत उपोषणार्थींची समस्या लक्षात घेत त्यांना सोमवारी सकाळी दोन पर्यायी रस्ते काढून दिले. असे असले तरी मूळ बंद केलेल्या रस्त्याबाबत अपील सुरूच राहणार आहे. रस्ता केस मध्ये तहसीलदारांनी उपोषणकर्त्यांच्या बाजूने निर्णय देऊन देखील रस्ता वहिवाटीला खुला करून देण्यात आला नाही. उलट तहसीलदारांच्या निर्णयाविरोधात प्रांत अधिकाऱ्यांकडे अपील दाखल करण्यात आले. दादागिरीने रस्ता बंद करून कुटुंबाला…
मंगळवार, २२ ऑक्टोबर २०२४ मेष – आपल्या कार्यक्षेत्रात आपणास आता जास्त काम पडणार असल्याने जास्त दगदग होणार आहे. यामुळे आपल्याला थोडेसे थकल्यासारखे वाटण्याची शक्यता आहे. कुटुंबाला फारसा वेळ देता येणार नाही. वृषभ – शुभ ग्रहांची उत्तम साथ मिळणार आहे. बेकार व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता. महत्त्वाच्या कामात यश लाभेल, बँकेची कामे करून घ्या. घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्या. मिथुन – स्वतःच्या हिंडणे फिरणे यावर नियंत्रण ठेवा. तसेच खाणेपिणे यावरही लक्ष ठेवणे आवश्यक. विनाकारण वादावादी घालू नका. कुठल्याही कारणाने दिवसाचा बेरंग होणार नाही याची काळजी घ्या. कर्क – पती-पत्नीमध्ये वाद विवाद होण्याची शक्यता आहे. दोघांनी समजुतीने घ्यावे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीमध्ये काही…
