Author: अनंत पांगारकर

शुक्रवार, २७ सप्टेंबर मुंबई : काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची अज्ञात महिलेकडून नासधूस करण्यात आली आहे. मंत्रालयातील कार्यालयात असणारी फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर लावलेली त्यांच्या नावाची पाटी महिलेने फेकून दिली आहे. कार्यालयाबाहेर असणाऱ्या कुंड्या देखील या अज्ञात महिलेने फेकल्या. हा सगळा गोंधळ घातल्यानंतर ही अज्ञात महिला त्यानंतर तिथून पसार झाली. मुंबई येथे मंत्रालयात महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सहाव्या मजल्यावर कार्यालय आहे. या कार्यालय बाहेर हा प्रकार घडला. दरम्यान, ही महिला कोण आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांकडून या महिलेचा शोध घेण्यात येत आहे. तसेच मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा…

Read More

शुक्रवार, २७ सप्टेंबर शेतजमीनीवर कर्ज काढण्यासाठी आवश्यक असलेल्या शेतजमीनीच्या नोंदी फेरफार करुन देण्यासाठी पंचासमक्ष लाचेची मागणी करुन दहा हजार रुपये लाच शासकीय कार्यालयात स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी लावलेल्या सापळ्यात वणीचे तलाठी शांताराम पोपट गांगुर्डे हे अडकले असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या मालकीची कसबे वणी, ता. दिंडोरी येथे गट क्रमांक ६१७ ही शेतजमीन असून त्यावर कर्ज काढावयाचे असल्याने कसबे वणी गावचे तलाठी शांताराम पोपट गांगुर्डे (रा. ध्रुवनगर, मोतीवाला मेडीकल कॉलेजसमोर रेणुका हाईट्स प्लॕट नंबर ९, सातपुर, नाशिक) यांची भेट घेऊन शेतगटाच्या नोंदी…

Read More

शुक्रवार, २७ सप्टेंबर पुणे : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून एका महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीवर चार जणांनी बलात्कार केला आहे. या प्रकरणात कोरेगाव पार्क पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोन तरुण हे अल्पवयीन आहेत. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पीडित तरुणी ही कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दितील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. महाविद्यालयात सुरू असलेल्या “गुड टच बॅड टच” या उपक्रमातून ही घटना समोर आली. हा सगळा प्रकार एप्रिलपासून सुरू होता. पीडित तरुणी…

Read More

शुक्रवार, २४ सप्टेंबर मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी कीर्ती आणि वैभव वाढवणारा आहे. आपण बऱ्याच काळापासून कोणत्याही व्यावसायिक कराराबद्दल चिंतित असल्यास, ते आज पूर्ण होऊ शकते. तुम्हाला तुमचे कोणतेही काम उद्यापर्यंत पुढे ढकलणे टाळावे लागेल. तुम्हाला शारीरिक त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वाहने जपून वापरावी लागतील.वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाणार आहे. प्रेम जीवन जगणारे लोक त्यांच्या जोडीदारासोबत रोमँटिक मूडमध्ये असतील आणि त्यांना बाहेर फिरायला घेऊन जातील. आईसोबत काही वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे विचारपूर्वक बोला. कामाच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या विचारांचे स्वागत होईल. मित्रांसोबत मजेत वेळ घालवाल. नवीन पद मिळाल्यास तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. तुम्ही…

Read More

गुरुवार, २६ सप्टेंबर  राहाता – माझ्यावर समन्यायीचा आरोप करणारे तेव्हा कुठे होते? मंत्रिमंडळात तुम्हीही होता मग का नाही बोललात? संगमनेरमधून आम्ही भूमिका घेत समन्यायीबद्दल विरोध दर्शविला. महसूलमंत्री असताना आम्ही खोट्या केसेस करून लोकांना जेलमध्ये टाकले नाही. असं स्पष्ट करत गणेश कारखान्यात इतिहास का घडला हे विसरू नका, कारण जर आपण ते विसरलो तर पुन्हा सगळं जैसे थे होईल अशी टीका माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर केली. गणेश सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यस्थळावर पार पडली. यावेळी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात बोलत होते. व्यासपीठावर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवानेते विवेक कोल्हे, कृषी भूषण…

Read More

शेतकऱ्याकडे मागितले दीड हजार रुपये  कृषी अधिकाऱ्यांच्या पत्राची कंपनीने दखल घेत पैसे मागणाऱ्या प्रतिनिधीवर केली कारवाई  गुरुवार, २६ सप्टेंबर  पिक विमा असल्याने शेतातील पिकाचा पंचनामा करण्यासाठी संबंधित इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधीने शेतकऱ्याकडे दीड हजार रुपयांची मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार संगमनेरमधून समोर आला आहे. या संदर्भात शेतकऱ्याने कृषी विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर कृषी विभागाच्या पत्राची दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील शेतकरी विश्वास दातीर यांनी इन्शुरन्स कंपनीकडे खरीप हंगाम २०२४-२५ अंतर्गत पिक विमा काढला होता. पिक विम्यास पात्र असल्याने त्यांनी संबंधित कंपनीकडे ऑनलाइन तक्रार केली होती. त्यानंतर संबंधित कंपनीने आपला प्रतिनिधी पिकाच्या पंचनाम्यासाठी…

Read More

गुरुवार, २६ सप्टेंबर “पंतप्रधान गणपतीचे मोदक खायला सरन्यायाधीशांकडे जातात. मग भ्रष्टाचाऱ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या आमच्या सारख्या लोकांना न्याय कसा मिळेल? हे अपेक्षितच होतं. अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं होतं की न्यायव्यवस्था कोणाची तरी रखेल झाली आहे, हे स्पष्ट दिसतंय. आम्ही त्या कोर्टाचा आदर करतो, आम्ही नक्की वरच्या कोर्टात जाऊ”, असे सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि न्यायव्यवस्थेवर टीका केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर मेधा सोमय्या यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. या प्रकरणात माझगाव कोर्टाने त्यांना दोषी ठरवले असून त्यांना १५ दिवसांची शिक्षा सुनावली आहे. तर, त्यांना न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला असून ही रक्कम मेधा यांना…

Read More

गुरुवार, २६ सप्टेंबर  मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अब्रुनुकसानीच्या खटल्या प्रकरणी संजय राऊत यांना न्यायालयाने १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. वकील विवेकानंद गुप्ता यांनी या संदर्भात माहिती दिली. संजय राऊत यांनी डॉ. मेधा सोमय्या आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला होता. हा आरोप खोटा असल्याचा दावा करत मेधा सोमय्या यांनी माजगावच्या न्यायालयात संजय राऊत यांच्यावर १०० करोड रुपये अब्रुनुकसानीचा दावा केला होता. काय होता आरोप? मीरा भाईंदरमध्ये शौचालय बांधकामात १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या विरोधात मेधा सोमय्या यांनीच…

Read More

प्रांताधिकारी, तहसीलदारांनीही केली ठेकेदाराची कान उघाडणी, तरीही पडेना फरक संगमनेर – अनंत पांगारकर नासिक-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत संगमनेर तालुक्यातील साकुर फाटा येथे सध्या महत्त्वाच्या ठिकाणी साईड रस्ते आणि साईड गटारी काढण्यात येत असून ही कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत असल्याचा गंभीर आरोप हिवरगाव पठार भागातील नागरिकांनी केला आहे. सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे रस्त्यावरील पाणी नागरिकांच्या घरामध्ये, दुकानांमध्ये शिरले आहे. यामुळे घरातील संसार उपयोगी वस्तूंचे व दुकानातील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या कामाकडे संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याने या विरोधात महामार्गावरच आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. साईड गटाराचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. या संदर्भात…

Read More

असा आहे तुमचा आजचा दिवस मेष – एखाद्या मित्राकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो. मनात चढ-उतार असतील. आत्मविश्वासाची कमतरता देखील असेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. वृषभ – अनावश्यक राग आणि वादविवाद टाळा. व्यवसायात वाढ होईल. लाभाच्या संधी मिळतील. मनात शांती आणि आनंद राहील. मिथुन – शैक्षणिक कार्यात रस राहील. नोकरीच्या ठिकाणी बदल होऊ शकतो. नवीन व्यवसाय सुरू होऊ शकतो. उत्पन्न वाढेल. तीर्थयात्रेला जाता येईल. कर्क – लोकांशी बोलताना संयम बाळगा. मन अस्वस्थ होऊ शकते. अनावश्यक राग आणि वादविवादापासून दूर राहा. सरकारकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. सिंह – वाणीच्या प्रभावामुळे सर्व कामे पूर्ण होतील. कपडे वगैरे भेटवस्तू म्हणून…

Read More