Author: अनंत पांगारकर
शनिवार, ०३ ऑगस्ट विशेष प्रतिनिधी | मुंबई विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी करायला सुरुवात केली आहे. यासाठी दोन्ही आघाड्यांमध्ये बैठकांचे नियोजनही सूरू आहे. असे असताना आता ”महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा एकही खासदार नव्हता, उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसचे इतके खासदार निवडून आलेत, असे विधान करत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आघाडीत मिठाचा खडा टाकला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सहकुटुंब शिर्डीत साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या काही जागांवर दावा करणार असल्याचा प्रश्न केला होता. यावर प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव यांनी कॉग्रेसची चांगलीच कान उघडणी केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा एकही खासदार नव्हता. आम्ही तिघे एकत्र आलो. विशेष…
जीएसटीमधून मिळणारा पैसा हा सरकारचा पैसा नसून तो सामान्य गोरगरिबांचा: डॉ. तांबे दक्षिणमध्ये जनतेने चांगली दमछाक केली. लोकांनी आराम करण्यासाठी वेळ दिला. आता कुटुंबाला वेळ द्या: प्रभावती घोगरे हुकूमशाहीचा राजकारणामुळे संपूर्ण तालुका अस्वस्थ: डॉ. पिपाडा शुक्रवार, ०२ ऑगस्ट आश्वी परिसरातील गावांमध्ये मोठी दहशत आहे. विरोधी गावचा सरपंच असेल अथवा ग्रामपंचायत सदस्य असेल तर त्याचे पद घालविण्याचा प्रयत्न आपण कधी केला नाही. आता या उलट परिस्थिती असून विरोधी सरपंच आहे, म्हणून पिण्याच्या पाण्यापर्यंत राजकारणाचे विष नेऊन ठेवले आहे. पाणी योजना बंद पाडली जाते. मात्र माणसाला प्यायला पाणी देण्याच्या योजनेतही जेव्हा माणसं विष कालवतात तेव्हा अशा लोकांना माणसं विसरत नाही, जिरवाजिरवी आणि…
शुक्रवार, ०२ जुलै दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर शुक्रवारी रात्री संगमनेर पोलिसांनी बेकायदा चालविल्या जात असलेल्या कत्तलखान्याच्या परिसरातून कत्तलीसाठी निर्दयतेने अन्नपाण्यावाचून डांबून, बांधून ठेवलेल्या डझनभरापेक्षा अधिक जिवंत जनावरांची सुटका करत त्यांना गोशाळेमध्ये दाखल केले. वेळेत पोलीस पोचले नसते तर या जनावरांची देखील कत्तल अटळ होती. संगमनेरमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांचा उच्छाद सुरू या अवैध धंद्याला संगमनेर पोलिसांसह नगर पोलिसांचे आशीर्वाद असल्याने त्यांच्यावर कारवाया होत नसल्याच्या चर्चा सातत्याने होत या संदर्भात ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ वेब पोर्टलने देखील वृत्तमालिका सुरू ठेवत सातत्याने यावर प्रकाश टाकला आहे. या अवैध धंद्याचाच एक भाग असलेले संगमनेरमधील बेकायदा कत्तलखाने वारंवार टाकलेल्या छाप्यानंतर देखील सुरूच आहे. त्यामुळे…
शुक्रवार, ०२ ऑगस्ट संगमनेर नगर परिषदेच्या नाशिक-पुणे मार्गावरील आझाद सांस्कृतिक भवन व पै. नूरमहमद शेख शॉपिंग सेंटरची दुरवस्था झाल्याबाबतचे वृत्त शुक्रवारी सकाळी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ वेब पोर्टलवर प्रसिद्ध होताच काही वेळातच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. यामुळे स्थानिक नागरिकांनी मुख्याधिकारी राहुल वाघ यांचे आभार मानले आहे. महाराष्ट्र संवाद न्यूजने सकाळी प्रसिद्ध केलेल्या बातमीची लिंक… https://maharashtrasanvadnews.com/?p=16569 देशाचे पहिले शिक्षण मंत्री, स्वातंत्र्य सेनानी मौलाना अब्दुल कलाम आझाद व संगमनेर नगर परिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष पै. नूरमहमद शेख यांच्या नावाने बांधलेल्या या वास्तूचे दुरवस्था झाल्याने या संदर्भात ॲड. सैफुद्दीन शेख यांनी मुख्याधिकारी राहुल वाघ यांना पत्र देत त्यांचे लक्ष वेधले होते. तसेच या संदर्भातील…
शुक्रवार, ०२ ऑगस्ट पोलीस ठाण्यात असलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करून नील अहवाल पाठविण्यासाठी तसेच भविष्यात तक्रार झालेला त्रास न होण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकाने तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. चेतन चंद्रकांत थोरबोले (वय ३६) या सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरुद्ध पुण्याच्या लोणीकंद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत प्रथम पाच लाख व तडजोडीनंतर एक लाख रुपये लाचेची मागणी केल्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक लाख सत्तर हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्याच्या पोलिस हवालदारावर कारवाई होत नाही तोच सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे प्रकरण समोर आले आहे. तब्बल लाखाच्या पटीत लाच मागणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना वरकमाईची चटक लागल्याचे…
शुक्रवार, ०२ ऑगस्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नगर जिल्ह्यातून सात लाख महिलांचे अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले आहे. प्राप्त झालेल्या या अर्जांची छाननी करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली असून प्रभारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या कक्षाला भेट दिल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी मनोज ससे यांनी दिली आहे. नगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची गतीने अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा दैनंदिन आढावा, तालुकास्तरावर अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या नियोजन यामुळे सात लाख महिलांचे अर्ज भरून घेण्यात यश आले आहे. अर्जाच्या छाननी साठी स्वतंत्र कक्ष……
शुक्रवार, ०२ ऑगस्ट संगमनेर नगर परिषदेच्या नाशिक-पुणे मार्गावरील आझाद सांस्कृतिक भवन व पै. नूरमहमद शेख शॉपिंग सेंटरची दुरवस्था झाली असून देशाचे पहिले शिक्षण मंत्री, स्वातंत्र्य सेनानी मौलाना अब्दुल कलाम आझाद व संगमनेर नगर परिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष पै. नूरमहमद शेख यांची अवहेलना होत असल्याची तक्रार करत मुख्याधिकाऱ्यांनी या प्रश्न तातडीने लक्ष घालण्याची मागणी ॲड. सैफुद्दीन शेख यांनी केली आहे. ॲड. शेख यांनी यासंदर्भात मुख्याधिकारी राहुल वाघ यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संगमनेर नगर परिषदेने काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून हे सांस्कृतिक भवन व शॉपिंग सेंटर बांधले आहे. मात्र गेल्या एक-दोन वर्षांपासून या इमारतीची दुरवस्था झाली असून तेथे मोठ्या…
शुक्रवार, ०२ ऑगस्ट तक्रार अर्जावरून बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करून तक्रारदाराला योग्य ती मदत करण्यासाठी तब्बल दोन लाख रुपयांची लाच मागणारा पोलीस हवालदार १ लाख ७० हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. अमोल दशरथ जाधव असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव असून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दिघी पोलीस ठाण्यात त्याची नेमणूक आहे. जाधव याच्या विरोधात लाच मागणी आणि लाच स्वीकारल्याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी, लाच लुचपतकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराने चोविसावाडी, चऱ्होली येथे बिल्डरकडून फ्लॅट खरेदी केला होता. बिल्डरने तक्रारदाराच्या परवानगीशिवाय परस्पर या फ्लॅटची दुसऱ्या व्यक्तीस विक्री केली. त्यामुळे तक्रारदाराने बिल्डर विरोधात फौजदारी गुन्हा…
विशेष प्रतिनिधी / उरण राज्यभर चर्चेत असलेल्या उरणच्या यशश्री हत्याकांड प्रकरणात पोलिसांकडून दररोज नवनवी माहिती समोर येत असून या हत्याकांडात लव्ह ट्रायअँगल आहे की नाही, याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. उरणमधील पोलिसांनी हत्येच्या घटनेनंतर विविध बाजूंनी तपासाला सुरुवात केली.अनेक पथके नेमण्यात आली होती. या तपासातून २९ जुलै रोजी आरोपीला बंगळुरुतून अटक करण्यात आली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून मुलीच्या अंगावर गोंदण्यात आलेल्या दोन टॅटूंवरुन लव्ह ट्रायअँगलचा शोध घेतला जात आहे. आता, टॅटू आर्टीस्ट पोलिसांच्या रडावर आहे. दाऊद आणि यशश्री हे १० वी पर्यंत एकत्र शाळेत शिकले आहेत. दरम्यान, आरोपी दाऊदने तिचा विनयभंग केला होता, त्यामुळे मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन दाऊदवर…
प्रवीण पुरो | मुंबई लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती सरकारने कंबर कसली आहे. खास करून भाजपा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये २८८ विधानसभा जागांपैकी पक्षाला केवळ ५५ ते ६५ जागाच मिळू शकतात, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भाजपाला लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर जागा कमी मिळाल्या होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीतही भाजपाला मोठा फटका बसण्याची घोषणा शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात अद्याप कुठलेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नसले तरी भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेतून ही बाब स्पष्ट होत आहे. या सर्व्हेत आता असलेल्या १०५ जागा टिकणं अजिबात शक्य नसल्याचं अनुमान काढण्यात आलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार,…
