Author: अनंत पांगारकर
शुक्रवार, दिनांक ७ जून २०२४ नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारचा अंतिम दिवस होता. शुक्रवारी अखेरच्या दिवसापर्यंत या मतदारसंघातून तब्बल ५३ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी नाशिक विभागीय आयुक्तालयात मोठी गर्दी केली होती. यांचा उमेदवारात आहे समावेश… विवेक बिपिनदादा कोल्हे, राजेंद्र एकनाथराव विखे पाटील, पै. डॉ. पानसरे छगन भिकाजी, निशांत विश्वासराव रंधे, राजेंद्र दौलत निकम, दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, कचरे भाऊसाहेब नारायण, अमृतराव रामराव शिंदे, किशोर भिकाजी दराडे, गव्हारे गजानन पंडित, रतन राजनदास चावला, महेंद्र मधुकर भावसार, दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, राजेंद्र दौलत निकम, दिलीप काशिनाथ…
शुक्रवार, दिनांक ७ जून २०२४ उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांसमोर आल्याने विभागीय महसूल कार्यालयात दोन्ही गटात जोरदार राडा झाला. दोन्ही गट समोरासमोर आल्याने घोषणाबाजी झाली. तसेच धक्काबुक्की देखील केल्याची चर्चा रंगली असून पोलिसांनी मध्यस्थी करत गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयात इच्छुक आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आकर्षण विषयी महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे आणि शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आपल्या समर्थकांसह एकाच वेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विभागीय आयुक्त…
शुक्रवार, दिनांक ७ जून २०२४ NDA च्या संसदीय दलाच्या बैठकीनंतर दिल्लीत नवे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली वेगात सुरू झाले आहे. एनडीएचे नेते नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची हॅट्रिक साधणार आहे. त्यासाठी ९ जूनची तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधानपदाची शपथ नरेंद्र मोदी रविवारी (९ जून) संध्याकाळी ६ वाजता घेणार असल्याचे निश्चित झाले असून त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या संसदीय दलाच्या बैठकीत संसदीय पक्षाच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव राजनाथ सिंह यांनी मांडला होता. या प्रस्तावाला अमित शहा, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू, एचडी कुमारस्वामी यांनी अनुमोदन दिले होते. नितेश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या भूमिकेकडे देशभरातील…
शुक्रवार, दिनांक ७ जून २०२४ लोकसभा निवडणुकीनंतर देशात नवे सरकार सत्तारूढ होत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशभरात लावण्यात आलेली आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने कळविल्याची माहिती राज्य निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. राज्यातील आचारसंहिता संपुष्टात आली असली तरी नाशिक, मुंबई आणि कोकण विभागातील आदर्श आचारसंहिता सुरूच राहणार असल्याची माहिती देखील निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. येत्या २६ जूनला मुंबई विभाग पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, मुंबई विभाग शिक्षक आणि नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने ही आचारसंहिता सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शुक्रवार, दिनांक ७ जून २०२४ पेट्रोल पंपावरील दोन कर्मचाऱ्यांना मुस्लिम समाजातील तरुणांकडून शिवीगाळ, मारहाण करत जीवे मारण्याची दिल्याची घटना संगमनेर तालुक्यातील आडवा ओढा येथे घडल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी ४ जूनला झालेल्या या मारहाणीसंदर्भात लखन बाबाराजा गायकवाड (वय २१ वर्षे, रा. वैदूवाडी, ता. संगमनेर) याने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी सहा जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी, संगमनेरमधून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावरील आडवा ओढा येथे असलेल्या ढेरंगे पेट्रोल पंपावर मंगळवारी सकाळी सहा वाजण्याची सुमारास लाल रंगाच्या इंडिका व्हिस्टा कारमधून (क्रमांक MH 43 X 2749) आलेल्या एका मुस्लिम तरुणाने फिर्यादीला ‘एवढा हळू का येतो,…
शुक्रवार दिनांक ७ जून २०२४ नाशिक शिक्षक मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज (दि. ७) अखेरचा दिवस आहे. आत्तापर्यंत २२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महाविकास आघाडीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून ॲड. संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीचा उमेदवार अद्यापही निश्चित झालेला नाही. शिक्षक मतदार संघासाठी जाहीर झालेल्या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्यासाठी ७८ इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेले असून त्यापैकी केवळ २२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने प्रमुख उमेदवार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार असल्याने विभागीय आयुक्तालय गजबजणार आहे. या मतदारसंघातून विद्यमान आमदार किशोर दराडे हे…
गुरुवार, दिनांक ६ जून २०२४ येत्या दोन-तीन दिवसात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे (NDA) सरकार स्थापन होण्याचे शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर शेअर मार्केट मधील मोठा घोटाळा बाहेर आला आहे. शेअर मार्केटमध्ये देशातील सर्वात मोठा घोटाळा भाजपाने केल्याचा आरोप करत त्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले होते. या सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपला ३०० च्या आसपास जागा दाखविण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये अचानक मोठ्या प्रमाणावर उसळी पाहायला मिळाली होती. मात्र, ४ जूनला निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शेअर मार्केट अचानक कोसळले होते. त्यामुळे अनेक…
गुरुवार, दिनांक ६ जून २०२४ राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जाचाला कंटाळून भाजपातील अनेक नेत्यांनी निलेश लंके यांना निवडणुकीत मदत केली, असा गौप्यस्फोट करत ज्याप्रमाणे राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुसरी जबाबदारी देण्याची मागणी पक्षाकडे करण्यात आली, त्याप्रमाणे जिल्ह्यातील दोन्ही जागा गमावल्याने पालकमंत्र्यांनीही अशीच पक्षशिस्त व नैतिकता दाखवावी असा सल्ला देत अप्रत्यक्षपणे त्यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केली. माध्यमांशी संवाद … नगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या विजयानिमित्त ‘मविआ’च्या पदाधिकाऱ्यांनी परस्परांना बुंदीचे लाडू भरवले. त्यावेळी फाळके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यांची उपस्थिती … यावेळी…
गुरुवार, दि. ६ जून २०२४ नगर विकास मंत्रालयात उपसचिव असलेले अकोले तालुक्यातील अंभोळचे भूमिपुत्र विजय कारभारी चौधरी यांना सहसचिवपदी पदोन्नती मिळाली आहे. महाराष्ट्र राज्याचे अपर सचिव वि. बा. माने यांनी चौधरी त्यांच्या निवडीचे आदेश काढले. नगर विकास मंत्रालयाचे उपसचिव म्हणून कार्यरत असताना चौधरी यांनी नागरी जमीन कमाल धारणा कायदा निरसिद्ध झाल्यानंतर शासन देयक्षेत्रापोटी सन २०१९ ते २०२३ या कालावधीत योजना धारकांकडून सुमारे ११०० कोटींचा महसूल राज्य शासनाला मिळवून देण्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. संचालक नगर रचना व अधिनस्त कार्यालयांसाठी सुमारे ११९९ पदांचा सुधारित आकृतीबंध त्यांनी निश्चित केला तसेच गुणवंत अधिकारी व कर्मचारी व कार्यालयांसाठी पुरस्काराची योजना ही तयार केली. मुंबई…
गुरुवार, दिनांक ६ जून २०२४ राज्यात लक्षवेधी ठरलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके निवडून आले. तर सुजय विखे पराभूत झाले. यानंतर मात्र आता राजकारण तापले असून समर्थक आमने-सामने येण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी निलेश लंके समर्थक पीए राहुल झावरे यांच्यावर हल्ला करण्यात आला यामुळे पारनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा धक्कादायक पराभव करत नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके निवडून आले. निवडणुकीनंतर आता गावागावात गटागटातील राजकारण पेटले असून कोणी कोणाला लीड दिला कोणी कोणाचा कार्यक्रम…
