Author: अनंत पांगारकर

शनिवार, दि. १३ एप्रिल  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया सुरू केल्या आहेत. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशावरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राबविलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवर असलेल्या आरोपीकडे पोलिसांना लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन राऊंड आढळले. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (१२ एप्रिल) पोलिसांनी राबविलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान आकाश उर्फ पप्पू बाबासाहेब गडाख (रा. पारेगाव बुद्रुक ता. संगमनेर) याच्या घर झडतीत पोलिसांना हे पिस्तूल आणि दोन राऊंड आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी आकाश गडाख याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३, ५,…

Read More

शुक्रवार, दि. १२ एप्रिल  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस रेकॉर्डवर असलेल्या संगमनेरमधील दोघा गुन्हेगारांना नगर जिल्ह्यासह लगतच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी काढले आहेत. कासिम असद कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) व इस्माईल निसार पठाण (रा. नाईकवाडपुरा, संगमनेर) अशी हद्दपार करण्यात आलेल्या दोघांची नावे असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी महाराष्ट्र संवाद न्यूजला दिली. कासिम कुरेशी याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात घातक शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जबर दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, जीवे मारण्याची धमकी देणे, अल्पवयीन मुलीस पालकांच्या कायदेशीर रखवालीतून पळून नेणे, प्राण्यांना निर्दयतेने वागविणे, त्यांची कत्तल करणे…

Read More

विश्लेषण | अनंत पांगारकर शुक्रवार, दि. १२ एप्रिल  अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात मी आणि माझा पक्ष योग्य हे सांगताना समोरचा उमेदवार आणि त्याचा पक्ष किती वाईट यावर प्रचारातून टीकास्त्र सोडण्याचे काम सुरू आहे. मात्र वास्तवता या दोन्ही मतदारसंघात एकमेकांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपल्या विरोधातील पक्षावर आणि पक्ष नेतृत्वावर टीका करण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. ज्या पक्षावर आणि पक्ष नेतृत्वावर आपण टीका करतो त्याच घरात काही काळ आपण देखील सत्तेचा उपयोग घेतला, हे या मतदारसंघातील प्रमुख उमेदवार विसरले आहेत. नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सद्यस्थितीतील प्रमुख चारही उमेदवारांना पक्ष बदलाचा दांडगा अनुभव आहे. ज्या पक्षातून आपण आता सत्तेसाठी दुसऱ्या…

Read More

गुरुवार, दि. ११ एप्रिल  माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि कडवट शिवसैनिकांमधील वाद सध्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. त्यातच वाकचौरे यांनी पुन्हा मातोश्रीची दारे ठोठावत शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवारी मिळविण्यात यश मिळविले. मात्र या न्यायालयीन लढ्यामुळे शिवसैनिक वाकचौरे यांच्या प्रचारापासून चार हात दूर होते. संगमनेरमध्ये पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात या संदर्भातील खदखद समोर आल्यानंतर या सर्वांमध्ये मनोमिलन घडविण्यात यश आले आहे. शिवसेनेसोबत गद्दारी करत २०१४ मध्ये काँग्रेस कडून लोकसभेसाठी उमेदवारी करणाऱ्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना तत्कालीन शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, भाऊसाहेब हासे यांच्यासह काही शिवसैनिकांनी त्यांना भर रस्त्यात जाब विचारण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे हा प्रकार पोलीस…

Read More

गुरुवार, दि. ११ एप्रिल  सद्यस्थितीत सुरू असलेली लोकसभा निवडणूक प्रक्रिया, त्या अनुषंगाने लागू असलेली आचारसंहिता, या दरम्यान येणारे विविध सण उत्सव शांततेत पार पडावेत, आचार संहिता उल्लंगणाच्या दृष्टीने कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी संगमनेर उपविभागात असलेल्या संगमनेर-अकोले तालुक्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २३ लोकांना संगमनेर अकोले तालुक्याच्या स्थळ सीमा हद्दीमध्ये प्रवेशास बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. संगमनेर शहर पोलीस ठाणे, संगमनेर तालुका पोलीस ठाणे, आश्वी पोलीस ठाणे, घारगाव पोलीस ठाणे, राजुर पोलीस ठाणे व अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्या व्यक्तींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, त्याचप्रमाणे सामाजिक शांतता भंग करण्यासंबंधाने गुन्हे ज्या…

Read More

बुधवार, दि. १० एप्रिल अहमदनगर जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याच्या वाहनातून ५१ लाख १६ हजाराची रक्कम नाकाबंदी दरम्यान पथकाने ताब्यात घेतली आहे. चौकशीनंतर या रकमे संदर्भात उलगडा होणार आहे. स्टीलचा व्यवसाय असलेल्या नगर जिल्ह्यातील व्यापाऱ्यावर पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये ही कारवाई करण्यात आली. बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान नगर-पुणे मार्गावर शिरूर मध्ये नाकाबंदी सुरू होती. पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे आणि त्यांच्या पथकाने या व्यापाऱ्याचे वाहन नाकाबंदी दरम्यान थांबवत वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पथकाला ५१ लाख १६ हजाराची रोकड आढळून आली. पथकाने वाहनात आढळलेली रोख रक्कम ताब्यात घेत याची माहिती निवडणूक आयोग आणि आयकर विभागाला दिली. त्यानंतर ही सर्व रक्कम आयकर विभागाच्या ताब्यात…

Read More

बुधवार दि. १० एप्रिल  एका सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यावरील हद्दपारीचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना सोमवारी (१ एप्रिल) एलसीबीचे पीआय दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार अशोक पाटील आणि नितीन मोहने यांना लाच लुचपत विभागाने अटक केली होती. आता या पीआयच्या घरात लाच लुचपत विभागाला मोठे घबाड सापडले आहे. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील राजकीय व सामाजिक चळवळीत सक्रिय असलेल्या व्यक्ती विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांसंदर्भात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार नितीन मोहने व पोलीस हवालदार अशोक पाटील यांनी या राजकीय कार्यकर्त्याची भेट घेत त्याच्यावर आतापर्यंत दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती काढून तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा पोलीस स्टेशनकडून प्रस्ताव मागवून…

Read More

बुधवार, दि. १० एप्रिल – अहमदनगर जिल्ह्यासह राज्यभरात बहुचर्चित ठरलेल्या संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या १३ कोटी ३८ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात आरोप सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाने वाफारे पती-पत्नीसह पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तर अन्य बारा जणांना वेगवेगळ्या कलमाखाली पाच ते दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. नाईकवाडी यांनी बुधवारी दोषी ठरलेल्या आरोपींना शिक्षा ठोठावली. तत्कालीन संस्थापक चेअरमन ज्ञानदेव सबाजी वाफारे याच्यासह त्याची पत्नी सुजाता ज्ञानदेव वाफारे, रवींद्र विश्वनाथ शिंदे, संजय चंपालाल बोरा व साहेबराव रामचंद्र उर्फ बाळासाहेब भालेकर यांचा जन्मठेप झालेल्या गुन्हेगारात समावेश आहे. तर उर्वरित बारा संचालक गुन्हेगारांना न्यायालयाने पाच…

Read More

बुधवार, दि. १० एप्रिल नगर अर्बन बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या संचालक, अधिकारी व कर्जदार यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती उपाधीक्षक अमोल भारती यांनी दिली. संगमनेरचा बडा कर्जदार आरोपी व सध्या अटकेत असलेल्या अमित पंडित यांच्यासह दहा जणांचा यामध्ये समावेश आहे. सुमारे आठ हजार पानांच्या या दोषारोप पत्रात अटक केलेल्या आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे आर्थिक व्यवहाराची माहिती आणि फॉरेन्सिक अहवालाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. ९० दिवसांच्या मुदतीच्या आत हे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. नगर अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात या कर्ज फसवणूक प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.…

Read More

बुधवार दि. १० एप्रिल प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या माती मिश्रीत वाळूच्या लिलावाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. या कालावधीत अनेक घडामोडी झाल्या. त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका बसल्याने त्रस्त झालेल्या युवा शेतकऱ्याने महसूल विभाग व पोलीसांकडे केलेल्या तक्रारीनंतर शेवटचा उपाय म्हणून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना निवेदनाद्वारे वाळू तस्करांपासून वाचवण्याचे साकडे घातले आहे. तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील जोर्वे येथील प्रवरा नदीपात्रालगतच्या माती मिश्रीत वाळूचा लिलाव झाला होता. या वाळूच्या ठेकेदारांनी प्रवरा नदीपात्रालगत क्षेत्र असलेल्या दिगंबर काकड या युवा शेतकऱ्याला विनंती करुन रस्ता देण्याची तसेच, शेतातील पाईप लाईन काढून घेण्याची विनंती केली होती. त्या मोबदल्यात नुकसान भरपाई देण्याची…

Read More