Author: अनंत पांगारकर
मंगळवार दि. ९ एप्रिल पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या झालेल्या टाकीच्या स्फोटातील अपघात प्रकरणी मृत कामगारांच्या नातेवाईकांना साठ लाखापेक्षा अधिक तर जखमी कामगारांना प्रत्येकी अडीच ते पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने बजावले आहे. राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील कुशाबापू रंगनाथ पवार व दादासाहेब कुशाबापू पवार यांनी विखे पाटील साखर कारखान्याने त्यांच्या शेतात परवानगी न घेता अवैधरित्या टाकलेल्या स्पेंट वॉशमुळे डाळिंब बागेला झालेल्या नुकसानी विरोधात महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कमिटी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व साखर आयुक्त यांच्या अल्प कारवाईमुळे पवार यांना न्यायासाठी राष्ट्रीय हरित…
मंगळवार दि. ९ एप्रिल मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील वरिष्ठ व कनिष्ठ स्तर दिवानी न्यायाधीश, जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहे. या आदेशानुसार राज्यभरातील ६०० हून अधिक न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या. यात संगमनेरमधील चार न्यायाधीशांचा समावेश आहे. एस. यु. महादार (मालेगाव, नाशिक), श्रीमती एस. एम. वाघमारे (को-ऑपरेटिव कोर्ट, सातारा), एम. एम. गांगुर्डे (साक्री, धुळे) व पी. डी. देवरे (कारंजा, वाशिम) यांचा बदली झालेल्या न्यायाधीशात समावेश आहे. तर कोल्हापूर येथून श्रीमती व्ही. पी. गायकवाड, फलटण (सातारा) येथून श्रीमती एस. बी. ढवळे व कराड (सातारा) श्रीमती यु. डी. जाधव हे न्यायाधीश संगमनेर न्यायालयात बदलून येत आहे. उच्च न्यायालयाने काढलेल्या आदेशात…
मंगळवार दि. ९ एप्रिल मंगळवारी शिवालयात झालेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागा वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत ठाकरे गट २१ लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस पक्ष १७ लोकसभा मतदार संघात उमेदवार देणार आहे. शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १० लोकसभा मतदार संघातील जागा लढणार असल्याची घोषणा या पत्रकार परिषदेत एकत्रितपणे करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून सांगलीसह काही लोकसभा मतदारसंघातील सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे. सांगलीची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाच लढणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले. या पत्रकार परिषदेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे…
मंगळवार दि. ९ एप्रिल जवळ हत्यार बाळगल्याच्या कारणावरून पोलिसांनी दोघाजणांना पकडले. हत्यारे कुठून, कशी आली याची पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि या चौकशीतून वेगळाच उलगडा झाला. प्रेम संबंधात अडथळा ठरत असलेल्या प्रेयसीच्या पतीचा तीन वर्षांपूर्वी खून करून फरार असलेले आरोपी पोलिसांच्या हाती सापडले. वसईच्या पेल्हार पोलिसांनी ३ एप्रिलला बेकायदा हत्यारे बाळगल्याप्रकरणी पोखरण परण साव (वय ५० वर्ष, रा. नालासोपारा) व अब्दुल मुबारकअली शहा उर्फ बड्डा (वय २३ वर्ष) या दोघा रिक्षा चालकांना अटक केली होती. त्यांच्याकडे सुरू असलेल्या चौकशीत धक्कादायक बाब समोर आली आणि तपासात या दोघांनी तीन वर्षांपूर्वी केलेल्या हत्येचा उलगडा झाला. पोखन साव याचे नायगाव येथे राहणार्या महिलेशी…
सोमवार दि. ८ एप्रिल, मुंबई महाविकास आघाडीतील मित्र पक्षांबाबत जे बोलाल ते विचार करून बोला, मित्र पक्षातील नेत्यांची मन दुखावतील असं बोलू नये, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना दिला आहे. थोरात म्हणाले, मित्र पक्षातील कार्यकर्त्यांबाबत राऊत ज्या पद्धतीने बोलत आहेत, ते योग्य नाही. त्यांनी विचारपूर्वक बोलायला हवं. आघाडीत एकत्र काम करायच आहे. त्यामुळे राऊतांनी काळजीपूर्वक बोलायला हवं. सांगली, भिवंडी, मुंबईसह काही जागांसाठी आमचा आग्रह आजही काय आहे. त्यावर सकारात्मक चर्चा सुरू आहे, यासंदर्भात आजच निर्णय होईल. जागावाटपाच्या अंतिम निर्णयासाठी उद्या ९ एप्रिलला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीची एकत्रित पत्रकार परिषद होणार…
सोमवार दि. ८ एप्रिल येत्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले तर देशात पुन्हा कधीही निवडणुका होणार नाही. देशाचे संविधान बदलेल. पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून द्वेषपूर्ण भाषण करतील. लडाख मणिपूर सारखी परिस्थिती देशभरात सर्वत्र उद्भवेल असे खळबळ जनक विधान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती अर्थतज्ञ परकला प्रभाकर यांनी केले आहे. परकला प्रभाकर यांचे हे विधान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आले असून प्रभाकर यांनी एका यूट्यूब चैनल वरील मुलाखतीत हे विधान केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये तुफान व्हायरल होत असून १ मिनिट ४० सेकंदाच्या या व्हिडिओत नेमकं काय आहे. यासाठी काँग्रेसने हा व्हिडिओ…
रविवार दि. ७ एप्रिल वडापाव खाण्याच्या बहाण्याने पत्नीने घरी बोलाविलेल्या एकोणवीस वर्षीय तरुणीवर पत्नीच्या मदतीने पतीने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कात्रज येथे ३ मार्च रोजी ही घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात शनिवारी पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओळखीच्या पीडित तरुणीला वडापाव खाण्यासाठी घरी येण्याचा आग्रह करत आरोपी महिलेने आपल्या घरी बोलावलं होतं. आग्रहाने बोलविल्याने पीडित तरुणी या महिलेच्या घरी गेली होती. थोडा वेळ गप्पाटप्पा झाल्यानंतर कामाच्या निमित्ताने आरोपी महिला घराबाहेर गेली. घराबाहेर जाण्याच्या बहाण्याने तिने घराची कडी बाहेरून लावून घेतली होती. पत्नी घराबाहेर…
रविवार दि. ७ एप्रिल ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण, संवर्धन व ग्राहकांच्या समस्याचे निराकरण व्हावे यासाठी जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या ग्राहक संरक्षण परिषदेवर २१ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बढे यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहे. अशासकीय सदस्यांमध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटक विलास जगदाळे, जिल्हा अध्यक्ष अतुल कुऱ्हाडे, दिनेश थोरात, प्राचार्य शाहुराव औटी, प्रा. अमिता रानु, अशोक शेवाळे, रणजीत श्रीगोड, सुनील रूणवाल, उमा मेहत्रे, गजेंद्र क्षीरसागर, बाबासाहेब भालेराव, प्रा. डॉ. राजेंद्र कळमकर, डॉ. मंगला भोसले, डॉ. अशोक गायकवाड, डॉ. विलास सोनवणे, संतोष भुसारी, सुनील दळवी, डॉ. गोरख बारहाते, प्रकाश रासकर, रबाजी सुळ व सुधीर भापकर यांचा…
रविवार दि. ७ एप्रिल पोलीस आणि संबंधितांशी असलेल्या मधुर संबंधामुळे संगमनेरात अवैध धंदे आता चोरून लपून नव्हे तर थेट उघड्यावर मोकळ्या मैदानात चालू असल्याचे समोर आले आहे. गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्टीवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात नेहमीप्रमाणे कारवाईदरम्यान महिला आरोपी पसार झाली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे हनुमान नगर परिसरात असलेल्या एका मोकळ्या मैदानात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ३८ हजार रुपयांच्या मुद्देमालासह गावठी दारू बनविण्याचे साहित्य आणि रसायन जप्त केले. कारवाईदरम्यान पोलीस पथकाने ही गावठी दारू बनविण्याचे हातभट्टी उध्वस्त करून टाकली. ही कारवाई सुरू असताना…
प्रवीण पुरो विश्वगुरू व्हायला निघालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर भारत देशाचे नवे अवतार निघाले. स्वत:मागे असंख्य उपाध्या लावणार्या मोदींना त्यांच्या समर्थकांनी इतकं चढवलं की ज्याचं नाव ते. हजार पापं करूनही एखाद्याला साव मानलं जातं तेव्हा पापं करणारा सुटतो. खोटं बोलतो. होत्याचं नव्हतं करतो. मोदींचं तसंच झालंय. सत्ता मिळाल्यापासून हे विश्वगुरू देशाचे कर्दनकाळ ठरू लागले आहेत. ना खाऊंगा, ना खाने दुंगा! या पंक्तींचा पुरेपूर वापर करत स्वत:ला स्वच्छ छबीची उपमा देणार्या मोदींनी स्वत: खाल्लं नाही, असं कोणीही सांगत असेल तर त्याला तपासावं लागेल. या देण्या-घेण्यापासून मोदींनी स्वत:ला असं दूर ठेवलं की कोणीही त्यांच्यावर पापभिरू म्हणून विश्वास ठेवावा. प्रत्यक्षात मात्र त्यांनी…
