Author: अनंत पांगारकर

सोलापूर, येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने शेकडोने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. एकट्या बीडमध्ये साडेतीन हजार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लोक तयार आहेत. निवडणुकीत एवढे उमेदवार उभे राहताय की, आता यांचे चिन्हच दिसणार नाही. आम्हाला न्याय मिळत नसेल तर, आधी दोन कोटी मराठा घेऊन आलो होतो आता चार कोटी मराठा घेऊन येईल असा दणदणीत इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. जरांगे सोलापूरमधील सभेत बोलत होते. ते म्हणाले समाजाने लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मराठा समाजाचा आहे. मी समाजाचा मालक नाही, समाज माझा मालक आहे. फडणवीसांची भाषा…

Read More

अहमदनगर, दि. ३ नव्‍या शैक्षणिक धोरणाच्‍या अंमलबजावणीमध्‍ये कौशल्‍य शिक्षणाला दिलेले प्राधान्‍य विचारात घेवून औद्योगिक क्षेत्राला आवश्‍यक असलेले मनुष्‍यबळ निर्माण करण्‍याचे काम विद्यापीठाच्‍या उपकेंद्रातून व्‍हावे अशी अपेक्षा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या अहमदनगर येथील उपकेंद्राचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत झाले. उच्‍च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दुरदृष्‍य प्रणालीव्‍दारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्‍हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्‍हा बॅकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, विद्यापीठाच्‍या व्‍यवस्‍थापन परिषदेचे सदस्‍य राजेंद्र विखे पाटील, कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी कुलगुरु डॉ. पराग काळकर यांच्‍यासह व्‍यवस्‍थापन परिषदेचे सदस्‍य उपस्थित होते.…

Read More

संगमनेर, दि. ३ ग्रामीण भागातील नागरिकांच्या समृद्धीसाठी स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आदर्श तत्त्वावर उभ्या केलेल्या सहकाराने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शीपणे केलेल्या रचनात्मक वाटचालीमुळे संगमनेरचे हे सहकाराचे मॉडेल हे भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार लंडनमधील शिष्टमंडळाने काढले. युरोपमधील व लंडनमधील शिष्टमंडळाने सहकाराच्या अभ्यास दौऱ्यासाठी संगमनेरच्या विविध सहकारी संस्थांना भेटी दिल्या. लंडन विद्यापीठाचे डीन जिरेमी स्मिथ, वरिष्ठ पत्रकार नाथाली मायरोथ, चैतन्य मार्कपवार यांचा समावेश होता. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, डॉ. सुजित खिलारी, संभाजी वाकचौरे आदींसह विविध अधिकारी…

Read More

प्रवीण पुरो (मुंबई) बुडत्याचा पाय खोलात गेला की तो बाहेर येण्यासाठी जिवाचा आटापिटा करत असतो. संकटच ते. यातून बाहेर पडण्यासाठी मग आसपासच्यांना आणाभाका कराव्या लागतात. हे संकट सर्वच ठिकाणी असतं. ते सामाजिक जीवनात असं संकट आ वासून उभं असतं, तसा राजकीय आणि आर्थिक जीवनातही त्याचा फटका बसत असतो. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित अनंतराव पवार हे ही अशाच संकटात सापडल्याचं दिसतं. गेल्या आठवड्यात एक परिपत्रक जारी करून त्यांनी आपल्यावरच्या संकटाला वाट मोकळी करून दिली. हे संकट दूर करण्यासाठी त्यांनी राज्यातील जनतेला विकास पर्वाची आठवण करून देणारं पत्र लिहिलं आहे. हे पत्र बाहेर आल्यापासून या पत्राचा राज्यातील जनता शोध आणि बोध घेत…

Read More

संगमनेर दि. – २ एसएमबीटी ही संस्था आता देशातील आरोग्य सेवेचा ब्रँड नेम ठरली आहे. दररोज हजारो शस्त्रक्रिया एसएमबीटीमध्ये होत आहे. संगमनेर तालुक्यातील रुग्णांना सोयीस्कर व्हावे यासाठी अमृतवाहिनी रोलर हॉस्पिटलमध्ये एसएमबीटीची बाह्य रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे प्रतिपादन नासिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. संगमनेरमधील गोरगरीब आणि सामान्य नागरिकांना आरोग्याच्या अत्याधुनिक व दर्जेदार सुविधा त्वरित व माफक दरात उपलब्ध व्हाव्या, या हेतूने काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी हॉस्पिटलमध्ये एसएमबीटी क्लिनिकचा पूर्णवेळ सुपर स्पेशालिटी बाह्य रुग्ण विभाग शनिवारी सुरू करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे बोलत होते. माजी आमदार तांबे यांच्यासह…

Read More

संगमनेर, दि. २ संगमनेर शहर व तालुका हद्दीतील सर्वच प्रकारचे अवैध धंदे ५ मार्चपर्यंत बंद न झाल्यास नाशिकला विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी शहरप्रमुख तथा राज्य दारूबंदी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अमर कतारी यांनी दिला असून यासंबंधीचे निवेदन पोलीस उपाधीक्षकांना देण्यात आले आहे. कतारी यांनी म्हटले आहे की, संगमनेर शहर व तालुक्याच्या हद्दीमध्ये दारू, मटका, जुगार अड्डे, गांजा विक्री आदी प्रकारचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही ढाबे व हॉटेलमध्येही मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू आहे. परवानगी असलेल्या बार चालक, दारू विक्रेत्यांकडून रात्री बारा ते एक वाजेपर्यंत बेकायदेशीर रित्या दारू विक्री सुरू असते. यापूर्वी…

Read More

मुंबई, दि. १ मार्च महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे व आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की झाली. महाराष्ट्राच्या विधिमंडळात असा प्रकार होणे चुकीचे आहे. भारतीय जनता पक्षाने सुरु केलेल्या राजकारणामुळे सभागृहाचा आखाडा झाला असून विधिमंडळाच्या लॉबीतच आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की, मारहाण करणे हे भूषणावह नाही तर महाराष्ट्राला लाज आणणारी घटना आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.आमदारांच्या धक्काबुक्की प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सत्ताधारी आमदारांची जनतेच्या मुलभूत प्रश्नापेक्षा स्वतःच्या, वैयक्तिक प्रश्नांसाठी कुरघोडी चाललेली आहे. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये मंत्र्यांवर खोक्यांचे आमदार तुटून पडतात हे खोक्याचे…

Read More

संगमनेर, सुदृढ व निकोप समाज निर्मितीचे काम करणाऱ्या, महिलांसाठी एक हक्काचे व्यासपीठ असलेल्या जयहिंद महिला मंच व जाणीव फाउंडेशनच्या वतीने शनिवारी (दि. २ मार्च) दुपारी १२ वाजता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात नारीशक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे उपस्थित राहणार असून सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई थोरात, एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख, प्रमिला कर्डिले, डॉ. श्रद्धा वाणी, माया पवार, सुनिता गाडे, दीप्ती सांगळे, मंगला काकड, डॉ. दिपाली पानसरे, सीमा सातपुते आदींसह आदिवासी सेवक प्रा.…

Read More

नाशिक, भारताला उत्तम तंत्रज्ञानाची व अत्याधुनिक उपचारांची आवश्यकता आहे. उपचार परवडणारे असलेच पाहिजेत पण त्यात एक्सलन्स अधिक महत्वाचा भाग आहे. अत्याधुनिक उपचारांचे एसएमबीटी मॉडेल देशात आदर्श बनेल, असे प्रतिपादन प्रख्यात शास्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युट टाटा मेमोरियल सेंटर यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाने साकारल्या जाणाऱ्या विशेष सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा भूमिपूजन सोहळा आणि एसएमबीटी केअर प्लस, एसएमबीटी बोन मॅरो ट्रान्सप्लांट, एसएमबीटी टेलीमेडीसीन, एसएमबीटी ई-कॅम्पस या विविध सेवा उपक्रमांच्या शुभारंभ प्रसंगी डॉ. माशेलकर बोलत होते. याप्रसंगी आमदार बाळासाहेब थोरात, माजी विधानपरिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे, टाटा मेमोरियल सेंटरचे डॉ एस. डी. बनवली, डॉ पंकज चतुर्वेदी, डॉ राहुल पुरवार यांच्यासह…

Read More

अहमदनगर, दि. २९ गुन्हा दाखल होऊन तब्बल सहा महिन्यांचा कालावधी उलटून देखील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील सुमारे ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या रडारवर येत नसल्याने ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच काही दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेत वर्णी लागलेल्या पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्याकडून ठेवीदारांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र त्यांनी तपास सुरू करण्यापूर्वीच बुधवारी त्यांची नाशिकला सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली झाल्याने ठेवीदारांच्या अपेक्षा मावळल्या आहे. पोलीस उपाधीक्षक असलेल्या मिटके यांची बदली काही दिवसांपूर्वी नाशिकला सहाय्यक पोलीस आयुक्तपदी झाली होती. मात्र तेथे हजर होण्यापूर्वीच त्यांच्या बदली आदेशात पुन्हा बदल करत त्यांच्याकडे अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षकपदाचा पदभार…

Read More