Author: अनंत पांगारकर

आजचे राशिभविष्य ​मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर प्रसन्न होतील. घरातील वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल असून भविष्यात त्याचे चांगले फळ मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर आहार घेण्याला प्राधान्य द्या. ​वृषभ आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि एखाद्या महत्त्वाच्या कार्यात तुमचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. व्यापारी वर्गाला नवीन संधी प्राप्त होतील ज्यामुळे नफ्यात वाढ होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत खेळीमेळीचे वातावरण राहील. अचानक धनलाभाचे…

Read More

मुंबई: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका रोजगारासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील तरुणांना बसला असून, अनेक तरुण सध्या तिथे अडकून पडले आहेत. हा गंभीर प्रश्न आमदार सत्यजीत तांबे यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. इराणमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना राज्य शासनाची सध्याची हेल्पलाईन यंत्रणा अपुरी पडत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. अनेक तरुणांनी हेल्पलाईनशी संपर्क होत नसल्याच्या तक्रारी केल्याचे सांगत, राज्य सरकारने या विषयात अधिक सक्रिय होऊन तातडीने स्वतंत्र व प्रभावी हेल्पलाईन सुरू करावी, अशी आग्रही मागणी तांबे यांनी यावेळी केली. आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडलेल्या या मुद्द्यावर सरकारची बाजू स्पष्ट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय हालचालींची…

Read More

मुंबई, विशेष प्रतिनिधी राज्यातील अनधिकृत प्री-प्रायमरी व नर्सरी शाळांच्या प्रश्नावर आज विधानसभेत आमदार सत्यजीत तांबे यांनी आवाज उठवला. सहा वर्षांपूर्वी शासनाने धोरण जाहीर करूनही अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याबद्दल आमदार तांबे यांनी सरकारला जाब विचारला. राज्यात सध्या प्री-प्रायमरी व नर्सरी वर्ग सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाची कोणतीही अनिवार्य परवानगी आवश्यक नसल्याने अनेक ठिकाणी बंगल्यांमध्ये किंवा दोन खोल्यांमध्ये कोणतीही सुरक्षा व्यवस्था आणि शासकीय नियंत्रणाशिवाय वर्ग सुरू असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून देत या संस्थांची शासनाकडे अधिकृत नोंदणी नसल्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होत असल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच बोलतांना तांबे म्हणाले की, लहान मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे शाळेच्या…

Read More

नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील आगामी राज्यसभा द्विवार्षिक निवडणुकीसाठी आपल्या चार अधिकृत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या संदर्भात पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाकडून अधिकृत प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले असून, यामध्ये अनुभवी नेत्यांसह नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आली नसल्याने आघाडीतील पेच अद्यापही कायम आहे. महाविकास आघाडीकडून कोणाच्या नावाची घोषणा केली जाते याची उत्सुकता लागली आहे. भाजप कडून जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार, महायुतीमधील महत्त्वाचे घटक पक्ष असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस…

Read More

पिंपरी-चिंचवड: कौतुक आणि जिद्दीच्या जोरावर अशक्य गोष्टीही साध्य करता येतात, याचाच प्रत्यय साळी समाजातील चिमुकल्या कारवी सारंग साळी हिने आणून दिला आहे. वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर ‘कळसुबाई’ सर करण्याची ऐतिहासिक कामगिरी कारवीने डिसेंबर २०२५ मध्ये फत्ते केली आहे. तिच्या या अफाट ध्येयधोरणाची दखल थेट ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेतली असून, तिला ‘आयबीआर अचिव्हर’ (IBR Achiever) या मानांकनाने सन्मानित करण्यात आले आहे. कळसुबाई शिखरावर आजवर अनेक बाल गिर्यारोहकांनी चढाई केली असली, तरी कारवीची ही मोहीम अत्यंत विशेष ठरली. तिने शिखरावर पोहोचण्यासाठी निवडलेला मार्ग हा अत्यंत कमी वापरातील, अनवट आणि खडतर असा ‘ऑफबीट’ मार्ग होता. ज्या मार्गावर गिर्यारोहकांच्या…

Read More

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळेल. आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे, विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील आणि एकमेकांना समजून घेण्यावर भर द्याल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयी बदला. वृषभ आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, मात्र घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. मिथुन आजचा दिवस संमिश्र फलदायी राहील. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो. बोलण्यावर नियंत्रण…

Read More

कोपरगाव: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना मिळणारा आश्रय पूर्णपणे नष्ट करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांच्या मनातील भीती दूर करून त्यांना थेट प्रशासनाशी जोडण्याच्या उद्देशाने लवकरच एक विशेष ‘हेल्पलाईन’ क्रमांक सुरू करण्यात येईल. या हेल्पलाईनद्वारे तक्रार करणाऱ्या नागरिकाची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या ६४ निवासस्थानांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या चार अत्याधुनिक फॉरेन्सिक लॅब व्हॅनचेही लोकार्पण करण्यात आले. या…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी राज्यात प्रतिबंधित असलेल्या मांगुर माशांच्या बेकायदेशीर वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४०० किलो मांगुर मासे आणि एक ट्रक असा एकूण २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मेवे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, शाहिदा शेख, फुरकान शेख, राहुल डोके, सुनील माळवदकर, प्रशांत राठोड, सतीश भवर आणि चालक उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस अधिकाऱ्यांनी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, हे स्मारक नेमके कोणत्या स्वरूपाचे असावे, याचा निर्णय आता थेट जनतेच्या कौलाने घेतला जाणार आहे. संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने ५ ते ७ मार्च दरम्यान एका विशेष मतदान प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये नागरिक आपल्या पसंतीच्या स्मारकाच्या आराखड्याला मत देऊ शकणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांनी दिली आहे. शहराच्या अस्मितेशी जोडल्या गेलेल्या या निर्णयामध्ये संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले मत नोंदवावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. ​या स्मारकाच्या पार्श्वभूमीवर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागातून समोर आली आहे. एका नामांकित शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर त्याच शाळेतील शिक्षकाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले असून, या अत्याचारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी शिक्षक अमोल बाबासाहेब भोसले (रा. वरवंडी, ता. संगमनेर) याला बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी साकूर परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. तिचे आई-वडील उदरनिर्वाहासाठी घरापासून काही अंतरावर असलेल्या कपड्याच्या दुकानात कामाला जात असल्याने ती अनेकदा घरी एकटीच असायची. कौटुंबिक कारणातून ती काहीशी मानसिक तणावात होती, याच बाबीचा…

Read More