Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या संगमनेर-अकोले तालुक्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मंगळवारी रात्री आठ वाजल्यापासून बुधवारी पहाटे दोन वाजेपर्यंत ‘कोंबिंग ऑल आऊट ऑपरेशन’ राबविण्यात आले. या ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या. आगामी काळात येऊ घातलेले सण, उत्सव शांततेमध्ये पार पडावेत, त्याचप्रमाणे गुन्हेगारांवर एकत्रित रित्या एकाच वेळी कारवाई करण्याच्या उद्देशाने संगमनेर शहर संगमनेर तालुका घारगाव आश्वी अकोले आणि राजुर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन राबविण्यात आले. यात संगमनेर उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यासंदर्भात पोलीस प्रशासन ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. मंगळवारी रात्री पोलीस प्रशासनाने दोन ठिकाणी केलेल्या छापेमारीमध्ये तब्बल ४३ जिवंत गोवंश जनावरे कत्तली होण्यापूर्वीच वाचविली आहेत. विशेष म्हणजे यातील एका कारवाईत जिवंत गोवंश जनावरांनी आरडाओरडा करू नये, यासाठी कत्तलखाना चालकाने गोवंश जनावरांच्या तोंडाला काळ्या रंगाच्या चिकटपट्ट्या चिकटविण्यात आल्या असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात दोघा कत्तलखाने चालकांविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे सुधारित सन १९९५ कलम ५, ९(अ) तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध कायदा कलम ३, ११ प्रमाणे दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस…
महाराष्ट्र संवाद न्यूज | सकारात्मक माझ्या घराजवळ पहिली ते पाचवी पर्यंतची शाळा आहे. त्या शाळेच्या पटांगणावर मी कधी कधी चालायला जाते. त्या पटांगणात निरागसतेच्या लहरी पसरलेल्या असतात म्हणून की काय कोण जाणे पण तिथे गेल्यावर अगदी प्रसन्न वाटतं. काल त्या शाळेच्या पटांगणात एक बेंच दिसला. त्यावरचा मजकूर बघून माझे पाय थबकले. “Buddy Bench” असे शब्द लिहिले होते. त्याच्या खाली अजून दोन ओळी होत्या. हा काय प्रकार आहे असा विचार करत मी उभी असताना एक नऊ वर्षाची, पोनिटेल उडवत पळणारी चुणचुणीत मुलगी दिसली. मी तिला विचारलं, “ हा नवा आहे का ग बेंच?” ती म्हणाली, “ नाही. “बडी बेंच” नवा नाही.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : अखिल भारतीय क्रांतिसेनेच्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी पेमगिरी येथील बाळासाहेब भोर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. क्रांतिसेनेचे राज्य संपर्कप्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी त्यांना नवनियुक्तीचे पत्र दिले आहे. याअगोदर भोर यांच्याकडे क्रांतिसेनेच्या युवक तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती ती त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली आहे. विशेष करून शेतकरी, कामगार, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आपापल्या परीने शक्य होईल त्याप्रमाणे न्याय देण्याचं काम त्यांनी केलं आहे. खांडगाव पेमगिरी रस्त्याचा प्रश्न असेल किंवा प्रवरेच्या पाटाच्या खोदकामात शेतकऱ्यांच्या तुटलेल्या पाईपलाइनचा प्रश्न असेल तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठ्याचा प्रश्न असेल अशा अनेक प्रश्नांबाबद त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. कोरोनाच्या संकटात त्यांनी कुचकामी…
महाराष्ट्र संवाद न्यूज अनंत पांगारकर | संगमनेर शिंदे-फडणवीस सरकारने राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागणीवरून शिर्डीमध्ये मंजूर केलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा विभाजनासाठी कळीचा मुद्दा ठरले आहे. त्यामुळे जिल्हा विभाजनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर संगमनेर जिल्ह्याच्या मागणीसाठी जिल्हा कृती समितीच्यावतीने मंगळवारी प्रांताधिकार्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन प्रस्तावित आहे. उत्तर नगर दक्षिणचे मुख्यालय कोठे करावे, यावरून या प्रश्नाचे भिजत घोंगडे पडले असून संगमनेर, श्रीरामपूरसह शिर्डी जिल्हा मुख्यालयाच्या स्पर्धेत आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून महसूल मंत्री पद नगर जिल्ह्यात विशेषत: शिर्डी, संगमनेर मतदार संघामध्ये आहे. पालघर जिल्ह्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – एमपीएससी परीक्षेमध्ये राज्यात सहाव्या आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या 26 वर्षीय दर्शना पवार हिचा संशयास्पद मृत्यू प्रकरणाला वेगळ वळण मिळाल आहे. दर्शनाच्या डोक्यात आणि शरीरावर आढळलेल्या गंभीर जखमांमुळे तिच्या मृत्यू झाल्याचा अहवाल पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर येत आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्ती विरोधात वेल्हे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची पाच पथके आरोपीचा शोध घेत आहे. दर्शना पवार हिचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याला कुजलेल्या अवस्थेत रविवारी आढळून आल्याने याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आता मात्र पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. दर्शना दत्ता पवार…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेअंतर्गत संगमनेर येथील ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेच्या ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे प्राध्यापक ऋषिकेश जगदीश मालाणी यांना विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी प्रदान करण्यात आली आहे. प्रा. ऋषिकेश मालाणी यांनी बँकिंग अँड फायनान्स या विषयांतर्गत “महाराष्ट्रातील नागरी सहकारी पतसंस्थांच्या समस्या आणि संभावनांचा अभ्यास” या विषयावर संशोधन कार्य केले. त्यांना मार्गदर्शक म्हणून प्रो. डॉ. आर. एन. वाकचौरे यांचे मार्गदर्शन लाभले. पीएचडी प्रबंधाच्या मौखिक सादरीकरणासाठी रेफरी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा. डॉ. वीणा हुंबे तर बहिस्थ परीक्षक म्हणून वींझर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. संजीव लाटे यांचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापुर्ण व दर्जेदार निविष्ठा वेळेत उपलब्ध होतील यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी. तसेच बोगस निविष्ठा विक्री व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, वितरक व विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. खरीप हंगाम तयारी संदर्भात राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. तदनंतर उपस्थित अधिकाऱ्यांची बैठक घेत जिल्हाधिकारी सालीमठ यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी निलेश कानवडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) व 37(3) अन्वये 3 जुलै 2023 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यात तसेच ग्रामीण भागात सभा, महासभा, आंदोलने व जातीय संवेदनशील वातावरण इत्यादीमुळे सार्वजनिक शांतता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी 3 जुलै 2023 रोजीच्या रात्रीचे 12 वाजेपर्यंत हे प्रतिबंधात्मक आदेश लागु राहतील, असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने (ठाकरे) वर्धापन दिनानिमित्त सोमवारी शहरातील नेहरू गार्डन जवळ असलेल्या शिवसेना कार्यालयात सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. पदाधिकारी कार्यकर्त्यांचा नागरिकांनी यावेळी प्रसादाचा लाभ घेतला. शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरदेखील एकनिष्ठ शिवसैनिकांनी रविवारी मुंबईत झालेल्या पदाधिकारी शिबिरात मोठी गर्दी केली होती. या शिबिरासाठी संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रविवारी मुंबई येथे उपस्थित राहून मान्यवरांचे मार्गदर्शन घेतले तसेच आज १९ जूनला शिवसेना शहर व तालुक्याच्यावतीने (ठाकरे गट) संगमनेर येथील नेहरू गार्डन परिसरातील कार्यालयात सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पदाधिकारी व…
