Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज असं म्हणतात, “मारने वाले से बचाने वाला हमेशा बड़ा होता हैं ” या उक्तीची प्रचिती पुन्हा एकदा संपूर्ण जगाने घेतली आहे. ही घटना आहे कोलंबिया देशात घडलेली. ज्या घटनेने संपूर्ण जगाला एक नवीन प्रेरणा मिळाली आहे. १ मे २०२३ रोजी एक आई आपल्या ४ मुलांना घेऊन कोलंबिया देशामधल्या अमेझॉनच्या जंगलात असलेल्या अराराकुआरा या गावातून सॅन जोस डेल ग्वाविअरे इकडे एका प्रायव्हेट विमानाने निघाली. १ पायलट, १ लोकल लिडर आणि १ या मुलांची आई मॅग्डालेना मुकुटुय व्हॅलेन्सिया अशी ३ प्रौढ माणसं आणि तिच्या सोबत असलेली ४ मुलं ज्यात १३ वर्षाची लेस्ली जेकोबॉम्बेअर मुकुटुय आणि तिची ९ आणि ४…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या कामातून संगमनेर तालुका व शहर हे देशासाठी विकासाचे मॉडेल ठरले आहे. म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी आमदार थोरात यांनी 30 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेले पत्र व केलेल्या पाठपुराव्यातून या पुलासाठी 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिली आहे. दिवटे म्हणाले, ऑक्टोबर 2022 मध्ये म्हाळुंगी नदीवरील पूर पाण्याने खचला होता. हा पूल घोडेकर मळा, पंपिंग स्टेशन, ओहरा महाविद्यालय, गंगामाई घाट, साईनगर या सर्वांकरता अत्यंत महत्त्वाचा होता. हा पूल खचल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे…
महाराष्ट्र संवाद न्यूज बँकेने साधलेली प्रगती, संचालक मंडळ आणि बँकेच्या कर्मचार्यांनी हातात हात घालून केलेल्या सांघीक कामाचा परिपाक म्हणून नूतन संचालक मंडळाची निवडही बिनविरोध झाल्याने बँकेच्या प्रगतीला सोन्याची झळाळी प्राप्त झाली असल्याचे प्रतिपादन व्यापारी एकता मंडळाचे प्रमुख, उद्योगपती राजेश मालपाणी यांनी केले. संगमनेरच्या उद्योग क्षेत्राची कामधेनू समजल्या जाणार्या संगमनेर मर्चन्ट्स बँकेच्या संचालकांची निवड बिनविरोध झाली, त्या निमित्त सभासदांचे ऋण व्यक्त करण्यासाठी व्यापारी एकता मंडळाने आभार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी मालपाणी बोलत होते. व्यासपीठावर बँकेच्या गेल्या 58 वर्षांच्या इतिहासात चेअरमनपद भूषविलेल्या माजी संचालकांची उपस्थिती होती. मालपाणी म्हणाले, मागील काही दिवसांत जिल्ह्यातील काही मोठ्या बँका अवसायनात गेल्या. काहींवर रिझर्व्ह बँकेने दंडात्मक…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अनेक दिवसांच्या परिश्रमातून कालव्यांची कामे पूर्ण झाली आहेत. निव्वळ उद्घाटनाच्या हौसेपायी पाण्याची उशिरा चाचणी करावी लागली. कालव्यांमधून पाणी सुटले आणि दुष्काळी भागातील जनतेमध्ये मोठा आनंद निर्माण झाला. कालव्यांच्या शेजारी जमिनी असलेल्या अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील तर त्यांची समजूत काढून, उपाययोजना करून हे पाणी सुरू ठेवता आले असते. मात्र असे काहीही न करता घाईघाईने कालव्यांमधील पाणी बंद करण्याचे कारण काय? असा सवाल निळवंडे धरण व कालव्यांचे जनक, जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. निळवंडे कालव्यांमधील पाणी बंद केल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना काँग्रेस नेते आमदार थोरात म्हणाले की, निळवंडे धरण व कालव्यांची कामे…
राहात्यामध्ये प्रचंड विराट सभा गणेश परिसराच्या विकासाचा प्रामाणिक हेतू : थोरात महाराष्ट्र संवाद न्यूज ज्यांना स्वतःचा कारखाना नीट चालवता येत नाही ते गणेश चांगला कसा चालवणार. त्यांची दडपशाही झुगारून सभासद व जनतेचा मोठा पाठिंबा या निवडणुकीत मिळवला असून ही निवडणूक गणेश परिसरातील शेतकऱ्यांची अस्मिता व स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आहे. आमचा हेतू हा स्वच्छ व प्रामाणिक असून शेतकरी व कामगारांच्या विकासासाठी कटिबद्ध असून या परिसरातील हुकूमशाही हटवण्यासाठी परिवर्तन आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. तर स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांचा छावा सदैव तुमच्यासोबत असेल असे युवा नेते विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे राहता येथे श्री गणेश परिवर्तन पॅनलच्या प्रचारार्थ सभेत ते…
खासदार सदाशिव लोखंडे यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून संगमनेरमधील बहुचर्चित ठरलेल्या म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी आणि नगरपालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यासाठी ७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. मागील वर्षी पावसाळ्यात म्हाळुंगी नदीवरील पूल पूर्णपणे वाहून गेला होता. त्यामुळे शहरातील साईनगर पंपिंग स्टेशन, घोडेकर मळा या भागात जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी म्हाळुंगी नदीवरील पूल होण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे पूल बांधण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर खासदार लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमधील प्रतिक सुखदेव इल्हे याची बुधवारी डेन्मार्क येथील Maersk या अत्यंत नामांकित कंपनीत प्लेसमेंट झाली. प्रतिकने NRTI Badoda Gujarat (गतिषक्ती विश्व विद्यालय) या नामांकित भारत सरकारच्या शासकीय कॉलेजमधून सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये एमबीए पदवी घेतली आहे. अतिशय उच्च दर्जाच्या समजल्या जाणाऱ्या या कॉलेजमध्ये शिकणारा प्रतिक हा नगर जिल्ह्यातील पहिलाच विद्यार्थी आहे. भारतातून फक्त शंभर मुलांची दरवर्षी या अभ्यासक्रमासाठी निवड होते. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाअंतर्गत हे एकमेव विश्व विद्यालय आहे. अभ्यासक्रमदेखील तुलनेत खूप अवघड असतो. प्रतिकने उत्तम गुण मिळवत सदर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. प्रतीक उत्तम खेळाडू असून स्केटिंग प्रकारामध्ये त्याने राज्य तसेच देशपातळीवर अनेक पदके मिळविली आहेत. B.Sc.Agri…
महाराष्ट्र संवाद न्यूज वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार पुस्तके प्रकाशित करणार्या ‘चपराक’ प्रकाशनने आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. नाशिक येथील युवा कवी आणि गीतकार प्रशांत केेंदळे यांचे ‘विठु नाम’ हे भक्तीगीत वारीच्या निमित्ताने प्रदर्शित केले आहे. सध्याचा आघाडीचा गायक गौरव चाटी यांनी ते आर्त आणि सुमधुर स्वरात सादर केले आहे. कोल्हापूरच्या प्रवीण ऐवळे यांनी ते संगीतबद्ध केले आहे. पदार्पणातीलच या गीताला रसिक श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे प्रकाशक आणि निर्माते घनश्याम पाटील यांनी सांगितले. चपराक प्रकाशनने राज्यभरातील नव्या-जुन्या लेखकांची पुस्तके प्रकाशित केली. 2002 सालापासून ‘साहित्य चपराक’ हे वाङमयीन मासिक प्रकाशित होते. या मासिकातील निवडक कथा, लेखांच्या अभिवाचनाचे व्हिडिओ चपराकच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज आमच्या पोळ्या करणाऱ्या बाईला कणिक भिजवता भिजवता मध्येच फोन आला म्हणून हात धुवून त्या फोनवर दोन-तीन मिनिटं बोलल्या आणि मग पुढील बराच वेळ भिंतीकडे तोंड करून WhatsApp वर मेसेजेसची देवाणघेवाण करत होत्या. दहा-बारा मिनिटं होऊनही त्यांचं परत कामाकडे वळण्याचं चिन्ह दिसेना, तेव्हा आजींनी त्यांना विचारलं, “इंदू, काय झालं गं, सर्व ठीक आहे ना?” इंदूने चेहरा आजीकडे केला तेव्हा कळलं की डोळ्यातून पाणी वाहत होतं. पुढील काही वेळात कळलं ते असं, त्यांच्या लातूर येथे राहणाऱ्या मावस भावाच्या साडेचार वर्षाच्या मुलाला ऑपरेशनच्यावेळी भूल दिल्यानंतर झालेल्या कॉम्प्लिकेशन्समुळे त्याच्या फुफुसांवर परिणाम होऊन त्याचं श्वसन धोकादायक पातळीवर कमी झालं होतं. त्या जोडप्याचं…
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : कृषी विभागामार्फत निरीक्षकांनी केलेल्या तपासणीमध्ये दोषी आढळून आलेल्या ४ बियाणे विक्री केंद्राचे व २ किटकनाशके विक्री केंद्रांचे परवाने निलंबीत करण्यात आले आहेत. निविष्ठा उत्पादकांनी किंवा जिल्हयामधील निविष्ठा विक्री केंद्र चालकांनी कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन करु नये अन्यथा त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे यांनी म्हटले आहे. खरीप हंगाम सुरु झालेला असुन बाजारामध्ये शेतक-यांची बि-बियाणे, खते व इतर कृषि निविष्ठा खरेदीसाठी लगबग सुरु झालेली आहे. खरीप हंगाम सन २०२३-२४ साठी शेतक-यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत…
