Author: अनंत पांगारकर
नेवासे (महाराष्ट्र संवाद न्यूज) त्रिमूर्ति पावन प्रतिष्ठान नेवासा फाटा येथे विश्व हिंदु परिषद दुर्गावाहिनी पश्चिम महाराष्ट्र प्रशिक्षण वर्गास नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी येथील दुर्गांशी संवाद साधला ते म्हणाले, आजच्या दुर्गांनी राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्या देवी होळकर यांचा आदर्श घ्यावा. यावेळी बोलताना त्यांनी लव जिहादबद्दल चिंता व्यक्त केली. मुलींनी या षडयंत्राला बळी पडू नये, असे ते म्हणाले. ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट केरळच्या वास्तविक घटनेवर आधारित असुन सर्वांनी हा चित्रपट बघावा व समाजामध्ये जागरूकता निर्माण करावी. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आपला जन्म झाला आहे. आपन हिंदू आहोत, ही भाग्याची गोष्ट आहे. उद्याच्या दुर्गा तयार करण्याचे काम…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) सामायिक विहिरीवरील पिण्याच्या पाण्याचा कॉक फिरविण्याचा कारणावरून ४३ वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ, दमदाटी करत बेदम मारहाण करण्यात आली. लाथा बुक्क्याने केलेल्या मारहाणीत फिर्यादीचा डावा पाय घोट्यामध्ये फ्रॅक्चर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील दोन महिलांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी आणि फिर्यादी एकाच कुटुंबातील असून त्यांच्यातील वादाची परिणती थेट हाणामारीत झाली. संजय बाळासाहेब नेहे (वय 43 वर्ष, धंदा शेती व ड्रायव्हर रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर) असे मारहाणीतील जखमीचे नाव आहे. तर राजेंद्र बाळासाहेब नेहे, सौरभ बाळासाहेब नेहे, पुष्पा राजेंद्र नेहे, मनीषा रावसाहेब नेहे (सर्व रा.…
नाशिक (महाराष्ट्र संवाद न्यूज) साताऱ्या पाठोपाठ नाशिकमध्येही एसीबीने मोठी कामगिरी केली असून तब्बल तीस लाख रुपयांची लाच घेताना एका वकिलासह सहकार विभागाचा बडा मासा एसीबीच्या जाळ्यात अलगद अडकला आहे. यामुळे राज्याच्या सहकार विभागात खळबळ उडाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाचा निर्णय बाजूने लावून देण्याच्या बदल्यात तीस लाखाच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी तक्रारदार निवडून आले आहे. त्यांच्या निवडी विरोधात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात सुनावणी घेऊन या सुनावणीचा निर्णय तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे (वय ५७ वर्ष, रा. फ्लॅट नंबर २०१, आई हाईटस्, कॉलेज रोड, नाशिक व खाजगी…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) कर्मचारी भविष्य निधि संघटन (ई.पी.एफ.ओ.) कडून सदस्य, निवृत्तीवेतन धारक आणि कंपनी मालकासाठी प्रत्येक महिन्यात ‘निधि आपके निकट हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या महिन्यात हा कार्यक्रम संगमनेरमध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. अहमदनगरच्या सहाय्यक भविष्य निधी आयुक्तांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. २९ मे २०२३ सर्वांच्या सोयीसाठी संगमनेरमध्ये मालपाणी इंडस्ट्रियल पार्क समोर अकोले रोड येथे शिवशक्ती इमारतीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या सदस्यांच्या भविष्य निधीबाबत काही अडचणी असतील त्यांनी संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत. याच कार्यक्रमात तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे, असे सहायक भविष्य निधी आयुक्त जिल्हा कार्यालय, अहमदनगर यांनी कळविले…
सातारा (महाराष्ट्र संवाद न्यूज) जिल्हा न्यायालयात दाखल असलेल्या प्रोबेट अर्जाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी दोन लाखाची मागणी करणारा आणि त्यासाठी एक लाख रुपये लाच स्वीकारणारा खाजगी वकील एसीबीने रंगेहात ताब्यात घेतला आहे. विलास बाळकृष्ण कुलकर्णी असे या वकिलाचे नाव आहे. या घटनेतील तक्रारदार हे एका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असून सातारा दिवाणी न्यायालयात शिक्षण संस्थेच्या वतीने प्रोबेट अर्ज दाखल आहे. लोकसेवकावर प्रभाव पाडून या अर्जाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून घेण्यासाठी वकील कुलकर्णी यांनी तक्रारदाराला दोन लाख रुपये द्यावे लागतील असे सांगत पैशाची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने सातारा विभागाच्या पोलीस उपाधीक्षक उज्वल वैद्य यांच्याशी संपर्क साधत तक्रार दाखल केली होती.…
शिर्डी (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना, खरीप हंगाम सन २०१६ पासून राबविण्यात येत आहे. योजनेची उद्दीष्टये :- ????नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. ????शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. ???? पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. ????कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठयात सातत्य राखणे. योजनेचे वैशिष्टये :- ????कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. ????खातेदारांचे व्यतिरिक्त कुळांसाठी सुध्दा ही योजना खुली ठेवण्यात आलेलो आहे. ????विमा संरक्षित रक्कम ही प्रत्येक पिकाच्या मंजूर कर्ज मर्यादे इतकी राहील. ????शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा खरीप हंगाम २ टक्के…
शिर्डी, (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्यातील बहुतेक जिल्ह्यात वाळू विक्री केंद्र कार्यान्वित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. वाळू विक्री केंद्राच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना घरकुलासाठी वाळूची उपलब्धता होत आहे. यातील सर्व अडचणी दूर झाल्याने काही दिवसात वाळू धोरणाची अंमलबजावणी जनतेच्या सहकार्याने यशस्वी होईल, असा विश्वास राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या वाळू विक्री केंद्राच्या कामकाजाचा महसूलमंत्र्यांनी सोमवारी (ता. १५ मे) श्रीरामपूर येथे आढावा घेतला. यावेळी श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी किरण सामंत, महसूली कर्मचारी, तलाठी आदी उपस्थित होते. विखे म्हणाले, नायगाव वाळू केंद्रावर पंधरा हजार…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक न करता त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर व्हावा यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात तीस हजार रुपयांची मागणी करत तडजोडीअंती पंचवीस हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करणाऱ्या अहमदनगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे अहमदनगर जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. विवेक अशोक पवार (वय ३५ वर्ष) असे या लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती आहे. पवार यांनी तक्रारदाराचा मावस भाऊ आणि त्याच्याबरोबर असलेले चार सहआरोपी यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना अटक न करता अटकपूर्व जामीन…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेरात दुचाकीचोरांनी आपले टार्गेट बदलले असून आता जुन्या दुचाकी ऐवजी नव्या दुचाकीकडे लक्ष वळविले आहे. दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास दुचाकीचोरांनी कोल्हार-घोटी मार्गावरील गांधी मोटर्स टीव्हीएस शोरूमचे पत्र्याचे गोडाऊन फोडत पावणेतीन लाख रुपये किमतीच्या तीन दुचाकी चोरून नेल्या आहे. अधिकारी बदलूनही नव्या अधिकाऱ्यांना शहरात कायद्याचा धाक निर्माण करण्यात यश येताना दिसत नाही. दररोज सुरू असलेल्या चोऱ्यांमुळे संगमनेरकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांवर नियंत्रण आणण्यास अपयशी ठरलेल्या पोलीस यंत्रणेमुळे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारांच्या माहितीचा अभाव असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे चोरट्यांचे फावले आहे. तक्रार देण्यास गेलेल्या तक्रारदाराचीच पोलीस यंत्रणा उलट तपासणी घेऊ लागल्याने नागरिकांना देखील पोलीस ठाण्याची…
नवी दिल्ली (महाराष्ट्र संवाद न्यूज) सध्याचे सीबीआयचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा कार्यकाल संपत आल्याने त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागी कर्नाटकचे पोलीस महासंचालक राहिलेले प्रवीण सुद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रातील मोदी सरकारने महासंचालकपदी ही निवड केली आहे. सीबीआयच्या महासंचालकपदाचा सूद यांचा कार्यकाळ दोन वर्षाचा असला तरी तो पाच वर्षापर्यंत वाढविला जाऊ शकतो. सध्याचे सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचे ते जागा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावांमधून प्रवीण सूद यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मोदींच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश आहे. कर्नाटकचे बीजेपी…
