Author: अनंत पांगारकर
अकोले: छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या अन्यायाविरोधात लढा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ज्या प्रेरणेमुळे त्या काळात सर्व समाज महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि स्वराज्याप्रति अतुलनीय निष्ठा दाखवली, त्या प्रेरणेचा शोध घेण्याची आज खऱ्या अर्थाने आवश्यकता निर्माण झाली आहे. आजचा समाज तोच असला, तरी शिवरायांच्या काळातील समाजातील विविध घटकांनी जी निष्ठा जपली, ती आजच्या समाजात तितकीशी दिसून येत नाही, असे प्रतिपादन अकोले तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी केले. तालुक्यातील गणोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी येथे आयोजित शिवजयंती उत्सव, शाळेच्या संरक्षक भिंतीचा भूमिपूजन समारंभ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी अनिल…
संगमनेर, प्रतिनिधी – तालुक्यातील राजापूर येथील वीज उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यात आल्याने राजापूर, गुंजाळवाडी आणि वेल्हाळे परिसरातील वीज प्रश्न मार्गी लागला आहे. आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नातून आणि सततच्या पाठपुराव्यामुळे महावितरण प्रशासनाने या उपकेंद्रातील ५ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बदलून त्याठिकाणी १० एमव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित केला आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून नागरिकांची सुटका झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरातील वीज उपकेंद्रांवर अतिरिक्त भार वाढल्याने शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. कमी दाबाने वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांचे शेतीपंप वारंवार बंद पडत होते, याचा थेट परिणाम पिकांना पाणी देण्यावर आणि शेती उत्पादनावर…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या कवी अनंत फंदी खुल्या नाट्यगृहाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच याठिकाणी मराठी नाटकांचे प्रयोग सुरू होणार आहेत. ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनी नुकतीच आमदार सत्यजित तांबे यांच्या समवेत या नाट्यगृहाची पाहणी केली. संगमनेरची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेले प्रोत्साहन यामुळे या शहरात नाटक सादर करण्याची आपली अनेक दिवसांची इच्छा आता लवकरच पूर्ण होणार असल्याचे दामले यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. नाट्यगृहाच्या भेटीदरम्यान प्रशांत दामले यांनी संपूर्ण वास्तूची बारकाईने पाहणी केली आणि अद्ययावत सुविधांबाबत काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले…
संगमनेर, प्रतिनिधी – समाजातील अठरापगड जाती-धर्मातील जनतेला सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. सामाजिक न्याय, समता, महिलांचा सन्मान, लोकशाही आणि शेतकऱ्यांप्रती असलेला आदर हे महाराजांचे जीवनकार्य आजही जगातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जयहिंद लोकचळवळीच्यावतीने कवी अनंत फंदी खुले नाट्यगृहात ‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ हे महानाट्य सादर करण्यात आले. या महानाटकाने आजचा इतिहास आणि सध्याची सामाजिक स्थिती यावर जळजळीत भाष्य करत उपस्थितांच्या डोळ्यात अंजन घातले. याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे,…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेरमध्ये ‘गांधी, नेहरू का नकोत?’ या विषयावर दैनिक लोकमत समूहाचे संपादक संजय आवटे यांचे रविवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक विचारमंचाच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, व्याख्यानमालेच्या मालिकेतील हे दुसरे पुष्प आवटे गुंफणार आहे. ‘गांधी, नेहरू का नकोत?’ असा अत्यंत कळीचा आणि महत्त्वपूर्ण विषय या व्याख्यानासाठी निवडण्यात आला आहे. व्याख्यानाचा हा प्रबोधनात्मक कार्यक्रम येत्या रविवारी, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता संगमनेरमधील पडतानी कॉम्प्लेक्स येथील व्यापारी असोसिएशन हॉलमध्ये होणार आहे. संगमनेर लोकपंचायतने या कार्यक्रमाचे सौजन्य स्वीकारले आहे. सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत गांधी-नेहरूंच्या विचारांची प्रासंगिकता तपासून पाहण्यासाठी हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.…
आजचे राशीभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेचा आणि उत्साहाचा असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाजू भक्कम राहील, मात्र घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि जुन्या वादांवर पडदा पडेल. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा हा उत्तम काळ आहे. वृषभ आज तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. धावपळीमुळे थोडा थकवा जाणवू शकतो. व्यावसायिकांना आज नवीन गुंतवणुकीसाठी चांगल्या संधी मिळतील, पण व्यवहारांत पारदर्शकता ठेवा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि प्रिय व्यक्तींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. आज कोणत्याही प्रकारच्या वादात पडणे तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. मिथुन मिथुन राशीच्या…
सिन्नर: नाशिक-पुणे महामार्गावरील मनेगाव शिवारामध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका आंतरराज्य टोळीचा सिन्नर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मंगळवारी (१७ फेब्रुवारी) मध्यरात्री करण्यात आलेल्या या धाडसी कारवाईत केरळ राज्यातील दहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे महामार्गावर सक्रिय असलेल्या एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास मनेगाव शिवारातील ‘सिन्नर गेस्ट हाऊस’ या हॉटेलमध्ये काही संशयास्पद हालचाली होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार समाधान बोराडे, नितीन डावखर, कृष्णा कोकाटे आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला. पोलिसांनी…
अहिल्यानगर – अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मिरजगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत २५ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने ही धडक कारवाई केली. यामध्ये १३२ किलो गांजासह दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तस्करीसाठी वापरलेली स्कॉर्पिओ गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, कर्जत येथून पाथर्डीच्या दिशेने एका स्कॉर्पिओ गाडीतून (MH 14 GH 2330) दोन व्यक्ती गांजाची मोठी खेप घेऊन जात आहेत. या माहितीची गांभीर्याने दखल घेत, पोलीस निरीक्षक कबाडी यांनी मिरजगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक…
संगमनेर, प्रतिनिधी – लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर बसस्थानकासमोर महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा लवकरच उभारला जाणार असून येत्या वर्षभरात या पुतळ्याचे काम पूर्ण करून पुढच्या वर्षीची जयंती याच ठिकाणी साजरी केली जाईल. यासोबतच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा, संविधान स्मारक आणि १०० फूट उंचीचा भव्य तिरंगा उभारून बसस्थानक परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले. शिवजयंती निमित्त शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. ढोल-ताशांचा गजर, पारंपारिक वेशभूषा आणि मर्दानी खेळांच्या सादरीकरणाने संपूर्ण शहर शिवमय झाले होते. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार सत्यजित तांबे यांनी ही महत्त्वपूर्ण…
संगमनेर, प्रतिनिधी – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज संगमनेर शहरात अत्यंत उत्साही वातावरणात अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार व फुले अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. महापुरुषांच्या कार्याचा आदर्श समाजासमोर ठेवत त्यांच्या विचारांचे स्मरण याप्रसंगी करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, त्यांचे स्वराज्य स्थापनेतील अतुलनीय योगदान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्याय व समतेसाठी केलेले कार्य यावर प्रकाश टाकला. या दोन्ही महापुरुषांचे विचार आजही समाजाला प्रगतीची दिशा दाखवणारे आहेत, असा सूर याप्रसंगी उमटला. या सोहळ्याला विहिंप प्रांत सहमंत्री…
