Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहरात ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून आणि कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी न घेता मोठ्या आवाजात डीजे वाजवणाऱ्या चालकावर शहर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी डीजे साहित्यासह मुद्देमाल जप्त केला असून संबंधित चालकावर गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी (६ फेब्रुवारी) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घुलेवाडी परिसरातील ‘अमृता लॉन्स’ येथे नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजे वाजत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी जाऊन खात्री केली असता, त्या ठिकाणी ‘जनता बँड’ मालकीचा डीजे संच कोणताही अधिकृत परवाना नसताना अत्यंत मोठ्या आवाजात वाजवला जात असल्याचे निदर्शनास आले. या…
संगमनेर/श्रीरामपूर: राज्यात नवीन फौजदारी कायदा ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ ची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून, उत्तर नगर जिल्ह्यात सराईत गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी ‘मोक्का’ सदृश कारवाईचा धडाका लावला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दरोड्याच्या तयारीत असताना पकडलेल्या टोळीवर आता भारतीय न्याय संहितेचे कलम १११ (संघटित गुन्हेगारी) लागू करण्यात आले आहे. या कठोर कारवाईमुळे केवळ ८-१० दिवसांत जामिनावर बाहेर येणाऱ्या गुन्हेगारांना आता किमान एक वर्ष जेलमध्येच राहावे लागणार असून, त्यांना जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेला सामोरे जावे लागू शकते, अशी माहिती श्रामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री संगमनेर शहर पोलिसांनी कोल्हेवाडी रोड परिसरात गस्त घालत असताना,…
संगमनेर, प्रतिनिधी – टोल नाक्यावरील २२ ते २३ कामगारांना व्यवस्थापनाने अचानक कामावरून कमी केल्याने निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर आमदार अमोल खताळ यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली असून, कामगारांच्या हक्कासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि सन्मानजनक तोडगा न निघाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करून टोल नाका कायमचा बंद पाडू, असा सज्जड इशारा दिला आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील टोल प्लाझावर कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आता शिवसेना महायुती पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे. गेल्या नऊ-दहा वर्षांपासून इमानदारीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जे.आर.आर. रोडवेज कंपनीच्या चालक राजपाल यांनी कोणताही पूर्वविचार न करता कामावरून हटवले असून, काही जणांच्या पगारातही मोठी कपात केली आहे. या दडपशाहीविरोधात…
महाराष्ट्रातील प्रगतशील आणि सर्वांगीण विकसित तालुक्यांचा विचार केला, तर आज बारामतीपाठोपाठ संगमनेर तालुक्याचे नाव अत्यंत अग्रक्रमाने घेतले जाते. संगमनेरची ही शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगती एका दिवसात झालेली नसून, त्यामागे १९८५ पासून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलेले अथक परिश्रम आणि अविश्रांत कष्ट आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आणि राज्याचे माजी महसूल व कृषिमंत्री राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांनी आपल्या दूरदृष्टीने संगमनेरचा कायापालट केला आहे, म्हणूनच त्यांना या तालुक्याच्या विकासाचे खरे शिल्पकार मानले जाते. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांचा आणि संघर्षाचा वारसा घेऊन बाळासाहेबांनी राजकारणात प्रवेश केला. एका दुष्काळी तालुक्याला सधन बनवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि त्याची सुरुवात १९८९ मध्ये…
महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि कर्तृत्ववान नेतृत्वाची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा या भूमीला लाभला आहे. याच विचारांच्या पायावर स्व. यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राची उभारणी केली. हाच विकासाचा वारसा अत्यंत निष्ठेने आणि संयमाने पुढे नेणारे नेतृत्व म्हणून आज माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहिले जाते. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि विकासाची दूरदृष्टी यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील खऱ्या अर्थाने ‘सर्वांगीण विकासाचे आर्किटेक्ट’ ठरले आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्तृत्वाचा पाया त्यांच्या कौटुंबिक संस्कारांत दडलेला आहे. स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.…
आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. आर्थिक बाबतीत काही चांगले व्यवहार होण्याची शक्यता आहे, मात्र घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. वृषभ – आज तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो. आर्थिक गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम बाळगा, अन्यथा लहान गोष्टीवरून वाद होऊ शकतात. मिथुन – तुमच्यासाठी आजचा दिवस प्रगतीकारक असेल. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान मिळेल. प्रवासाचे योग असून त्यातून फायदा होण्याची शक्यता आहे. मित्र-मैत्रिणींच्या…
संगमनेर: संगमनेर शहरात अवैध धंद्यांनी अक्षरशः कळस गाठला असून, स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शहरातील जमजम कॉलनी भागात स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या एका मोठ्या गोवंश कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पहाटेच्या सुमारास छापा टाकला. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत ५ लाख ५३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एकाला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या कारवाईमुळे शहर पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष आणि कत्तलखाने बंद करण्यात प्रशासनाला आलेले अपयश आता चव्हाट्यावर आले आहे. ६ फेब्रुवारीच्या पहाटे जमजम कॉलनीतील गल्ली क्रमांक ९ मध्ये रक्ताचा सडा पडलेला असताना आणि जनावरांची कत्तल सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिथे…
संगमनेर, प्रतिनिधी – तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांमध्ये राजकीय हेतूने अडथळा आणणाऱ्या आणि कामे जाणीवपूर्वक अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांची गय केली जाणार नाही. जनतेला वेठीस धरणारे काम आणि दर्जाहीन रस्ते करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करून त्यांना तातडीने काळ्या यादीत टाकण्याचे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत आमदार खताळ बोलत होते. यावेळी त्यांनी तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. काही ठेकेदारांनी कामांची मक्तेदारी निर्माण करून अनेक कामे हाती घेतली आहेत, मात्र ती वेळेत पूर्ण न केल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.…
अहिल्यानगर: जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात मोठ्या प्रमाणावर खांदेपालट करण्यास सुरुवात झाली असून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुरुवारी बदलीचे पहिले आदेश निर्गमित केले आहेत. या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी एकाच पोलीस ठाण्यात दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे, अशा अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू होत्या, त्याला आता खऱ्या अर्थाने मुहूर्त मिळाला आहे. आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांची साईमंदिर सुरक्षा कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागी राहुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचप्रमाणे सोनई पोलीस…
आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तुत्वाचे कौतुक होईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र घाईघाईत कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. प्रलंबित कामे मार्गी लागल्यामुळे मानसिक समाधान लाभेल. नवीन गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवल्यास घरात आनंदी वातावरण राहील. मिथुन: आज बोलण्यावर संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. वादविवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे थोडा वेळ विश्रांतीसाठी काढा. अचानक धनलाभाची शक्यता आहे, पण खर्चही वाढू शकतो. कर्क: आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.…
