Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे एका बंद घराचे कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३९,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी बाळासाहेब दादा आव्हाड (वय ६३ वर्ष, रा. निळवंडे, ता. संगमनेर) हे आपल्या नातेवाईकांच्या लग्नानिमित्त बाहेर गेले होते. दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजेपासून ते ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरात ठेवलेल्या बॅगेतून २३,००० रुपये रोख रक्कम आणि १६,५०० रुपये किमतीचे ३ ग्रॅम…
श्रीरामपूर, महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन शहरात विनापरवाना आणि नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गुंगीकारक गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी धाडसी कारवाई केली आहे. श्रीरामपूरच्या इराणी गल्ली भागात राहणारी झैनब जाफर इराणी (वय २४) ही महिला कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय नायट्रोझेपम या गुंगीकारक गोळ्यांची विक्री करत असताना रंगेहात पकडली गेली. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेला अटक करण्यात आली आहे. या कारवाईची पार्श्वभूमी अशी की, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, वार्ड नं १ मधील इराणी गल्लीत एक महिला नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी गोळ्यांची विक्री करत आहे. या माहितीची गांभीर्याने दखल…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील प्रसिद्ध व जागृत देवस्थान असलेल्या हरीबाबा मंदिराच्या विकासासाठी महायुती सरकार आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपण पूर्णपणे कटिबद्ध आहोत. या देवस्थानला ‘क’ वर्गाचा दर्जा मिळवून दिला असून, आगामी काळात त्याला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देऊन परिसराचा कायापालट करण्याचा आमचा संकल्प आहे, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. वेल्हाळे येथे आयोजित हरीबाबा यात्रा उत्सवानिमित्त आमदार खताळ यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि जत्रेचा आनंद लुटला. यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधताना त्यांनी देवस्थानच्या विकासकामांचा आढावा मांडला. ते म्हणाले की, यापूर्वीच मंदिरासाठी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर नगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि वसुलीतील पारदर्शकता टिकवण्यासाठी आता बाहेरील ठेकेदारांऐवजी पालिकेच्या स्वतःच्या मनुष्यबळाद्वारे बाजार कर संकलित करावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी पथविक्रेता समितीचे सदस्य दीपक साळुंके यांनी केली आहे. दीपक साळुंके म्हणाले की, दैनंदिन बाजार कराची पावती फाडण्यासाठी सध्या खासगी ठेकेदारांची नेमणूक केली जाते. यामुळे अनेकदा ठेकेदारांकडून होणारा हस्तक्षेप वाढतो आणि महसुलाची गळती होण्याची शक्यता असते. जर नगरपालिकेने स्वतःच्या कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ वापरून ही वसुली केली, तर जमा होणारा संपूर्ण महसूल थेट पालिकेच्या तिजोरीत जमा होईल. यामुळे पालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल आणि वसुली प्रक्रियेत शिस्त येईल. शहरातील फेरीवाल्यांच्या प्रश्नावर बोलताना साळुंके यांनी सर्व विक्रेत्यांची कायदेशीर नोंदणी करून…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर मतदारसंघातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न गंभीर असून, या विषयावर आपण यापुर्वी गांभीर्याने विधानसभेत आवाज उठवल्यामुळेच वसाहतीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असल्याची माहीती आमदार अमोल खताळ यांनी दिली.काम टप्प्यात आले की श्रेय घेण्याची धडपड काहींची सुरू होत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. आमदार खताळ म्हणाले की, संगमनेर शहर पोलीस ठाण्याशी संलग्न असलेली ३ अधिकारी निवासस्थाने व ६५ पोलीस कर्मचाऱ्यांची निवासस्थाने अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. ही निवासस्थाने सन १९५९–१९६० व १९६८ या कालखंडातील असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पी.आर.बी. रजिस्टरमध्ये त्याची नोंद आहे. पावसाळ्यात पाणी घरांमध्ये शिरणे, शौचालयांचे चेंबर व गटारी नादुरुस्त असणे अशा गंभीर समस्या असून, सार्वजनिक…
दैनिक राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. वैयक्तिक आयुष्यात जोडीदाराशी असलेले संबंध अधिक घट्ट होतील, मात्र रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ: आर्थिक दृष्टीने आजचा दिवस फायदेशीर ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि संध्याकाळी एखाद्या शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. मिथुन: विचारांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे आज थोडा गोंधळ उडू शकतो. महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. व्यवसायात नवीन संधी चालून येतील, पण घाईघाईने कोणताही करार करू नका. कर्क: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत भावूक असेल.…
पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा रविवारी संगमनेरमध्ये भव्य नागरी सत्कार; आमदार सत्यजित तांबे यांची माहिती
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्याचे भूषण आणि ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल, तालुक्यातील सर्वपक्षीय नागरिक आणि विविध संघटनांच्या वतीने रविवारी, (८ फेब्रुवारी) दुपारी ३ वाजता कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी या कार्यक्रमाबाबत माहिती देताना सांगितले की, स्वर्गीय कांताबाई सातारकर आणि रघुवीर खेडकर यांनी तमाशा लोककलेच्या माध्यमातून संगमनेरचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले आहे. त्यांच्या या समर्पित जीवनकार्याचा गौरव करण्यासाठी संपूर्ण तालुका सरसावला आहे. हा सोहळा महाराष्ट्राचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते…
संगमनेर, प्रतिनिधी – छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनिकेत घुले यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा येत्या बुधवारी, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. संगमनेर येथील बी.एस.टी. कॉलेजमधील के.बी. दादा देशमुख सभागृहात सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. छात्र भारती, राष्ट्र सेवा दल आणि जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज एकाच व्यासपीठावर येणार आहेत. या गौरव सोहळ्याचे अध्यक्षस्थान माजी आमदार डॉ. सुधीर तांबे भूषविणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विभागाचे माजी शिक्षक आमदार कपिल पाटील, राष्ट्र सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष राजा कांदळकर आणि छात्र…
अकोले, प्रतिनिधी – लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी प्रसंगी सरकार नसले तरी चालेल, परंतु मुक्त पत्रकारिता असणे ही काळाची नितांत गरज आहे. ज्या समाजात मुक्त पत्रकारिता नसते, तो समाज आंधळा ठरतो, असे परखड प्रतिपादन ‘न्यूज १८ मराठी’चे वृत्त संपादक विलास बढे यांनी केले. अकोले तालुका पत्रकार परिषद आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थित होते. व्यासपीठावर मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलीक, प्रकाश टाकळकर, प्रा. बाळासाहेब मेहत्रे आणि श्रीनिवास रेणूकादास यांच्यासह अन्य…
मुंबई, प्रतिनिधी – राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने या वसाहतीच्या निर्मितीला अधिकृत मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाच्या नियोजनासंदर्भात आमदार तांबे यांनी मंगळवारी (३ फेब्रुवारी) महाराष्ट्र राज्य पोलीस हाऊसिंग बोर्डाच्या महासंचालक अर्चना त्यागी (IPS) यांची मुंबईत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यामुळे संगमनेर शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न आता मार्गी लागला असून, शहरात आधुनिक आणि सुसज्ज पोलीस वसाहतीची निर्मिती होणार आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, या भेटीदरम्यान त्यांनी पोलीस वसाहतीच्या कामाला गती देण्याबाबत आग्रही मागणी केली. संगमनेरमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना उत्तम दर्जाची निवासस्थाने मिळावीत, यासाठी या वसाहतीचा आराखडा अत्यंत…
