Author: अनंत पांगारकर

मेष: आज तुम्ही ठरवलेली कामे सहज पूर्ण करू शकाल, पण प्रयत्न चुकीच्या दिशेने होत आहेत असे वाटेल. व्यवसायात धोका पत्करल्यास तो फायदेशीर ठरेल. कुटुंबात मतभेद होऊ शकतात, ते चांगले वागून दूर करा. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरी/व्यवसायात बुद्धिमत्तेचा वापर करून यश मिळवाल. एखादे मंगल कार्य किंवा प्रवासाचे योग संभवतात. वृषभ: आज हाती घेतलेले काम पूर्ण न झाल्याने थोडी निराशा येऊ शकते. कार्यात यश मिळायला विलंब लागेल. नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. प्रवासात अडथळे येऊ शकतात. कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवेल, मानसिक शांततेसाठी प्रयत्न करावे लागतील. मिथुन: आजचा दिवस शुभ आणि आनंददायी असेल. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणुकीतून…

Read More

संगमनेर – थोरात परिवाराने सात दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राची सेवा केली असून सर्वांना सोबत घेऊन जाणारे, अत्यंत स्वच्छ व पारदर्शी काम करणारे बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळेच संगमनेर तालुक्याची सर्व क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे, असे गौरवोद्गार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार व संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी काढले. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी रविवारी संगमनेरला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, सुधीर म्हस्के, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ. सुजित खिलारी…

Read More

आपल्या खोटारडेपणाला लगाम न घालणार्‍या राज्य आणि देशाच्या निवडणूक आयोगाला आता राज ठाकरे यांची भाषाच आवश्यक आहे, असं दिसतं. असंख्य चुकांचं गाठोडं घेऊन तरीही स्वत:ला साव समजणार्‍या निवडणूक आयोगाला राज ठाकरे यांनी थेट आव्हान दिलं आहे. तुम्ही केलेल्या चुका सुधारल्याशिवाय निवडणुका घ्यायच्या नाहीत, असे खडेबोल राज ठाकरे यांनी सुनावले आहेत. देशभर मतचोरीचा आरोप होत असताना निवडणूक आयोग दगडाच्या मूर्तीसारखा निस्तेज आहे. आपणच खरे, असा रुबाब आयोगाच्या अधिकार्‍यांचा आहे. सेवेतून निवृत्त झालेल्या यातल्या बर्‍याचशा अधिकार्‍यांची आयोगावर वर्णी लावण्यात आली, हे सरकारने आपल्यावर केलेले उपकारच आहेत, अशा मश्गुलीत अधिकारी वावरत आहेत. सरकार आणि सत्ताधारी पक्षाच्या वाटचळणीला त्यांनी आपली बुध्दी टाकली आहे. यामुळेच…

Read More

मेष (Aries): महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. आपले विचार स्पष्ट ठेवणे फायद्याचे ठरेल. वृषभ (Taurus): आरोग्याच्या लहान-सहान तक्रारी जाणवतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कामात सावधगिरी बाळगा. मिथुन (Gemini): हितशत्रूंचा त्रास संभवतो, सावध रहा. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. कर्क (Cancer): महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आर्थिक क्षेत्रात धाडस करण्यास हरकत नाही, उत्तम लाभ मिळण्याची शक्यता आहे. सिंह (Leo): बौद्धिक आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल. कन्या (Virgo): राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. अनावश्यक वाद टाळा. तूळ (Libra): एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.…

Read More

संगमनेर – विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मोठे परिवर्तन होईल, भारतीय जनता पक्षात (भाजप) जिल्ह्यातून अनेकजण प्रवेश करण्यास इच्छुक असून, पक्षाची क्षमता वाढवणाऱ्या लोकांना बरोबर घेण्याचे धोरण आहे. या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाच्या विस्ताराचे काम सुरू आहे, अशी माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.  महायुतीच्या संगमनेरमधील दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांच्या भेटीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना विखे पाटील म्हणाले की, श्रीमती सुनिता भांगरे आणि अमित भांगरे यांनी भेट घेतली, यावेळी माजी आमदार वैभव पिचड उपस्थित होते. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ‘ऑपरेशन लोटस’…

Read More

संगमनेर: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये मोठा राजकीय फेरबदल घडला आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये एमआयएम (AIMIM) पक्ष आपले उमेदवार उभे करणार असल्याची व त्यासाठी पक्षप्रमुख माजी खासदार इम्तियाज जलील हे संगमनेरात लवकरच यासंबंधीची घोषणा करणार असल्याची माहिती एमआयएमचे शहराध्यक्ष दानिश मिर्झा यांनी दिली आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत एमआयएमची एन्ट्री झाल्यास राजकीय गणिते बदलू शकतात. नगरसेवकांचे थेट नगराध्यक्ष पदासाठी एमआयएम कडून उमेदवार मैदानात उतरवला जाण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत संगमनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक शरीफ शेख यांच्या पत्नीचे नाव चर्चेत आले आहे. शहरात मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या असल्याने एमआयएम पक्षाने ही निवडणूक लढवण्याचा…

Read More

संगमनेर – पठारभागातील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते बुवाजी भागाजी खेमनर (वय ४९) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. खेमनर यांच्या निधनाचे वृत्त समजताच, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज खेमनर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी थोरात यांनी खेमनर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. खेमनर यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण परिसरात आणि राजकीय, सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. समाजकारण, लोकसेवा आणि कार्यकर्त्यांशी आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. खेमनर यांच्या निधनामुळे साकूर पठारभागातील राजकीय, सामाजिक आणि लोकसेवेच्या क्षेत्रात मोठी…

Read More

संगमनेर – संगमनेरच्या विकासासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘आय लव्ह संगमनेर’ या संस्थेच्या माध्यमातून दि. १६ नोव्हेंबर रोजी संगमनेर ‘श्री’ म्हणजेच शरीरसौष्ठव (बॉडी बिल्डिंग) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील युवक-युवतींना फिटनेस, स्नायूंचा विकास आणि शरीरसौष्ठव प्रदर्शन करण्याची संधी देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. या स्पर्धेचे आयोजन संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे होणार आहे. स्पर्धेत पुरुष आणि महिला Classic, Physique व Fitness अशा विविध विभागांमध्ये सहभागी होऊ शकतील. इच्छुक स्पर्धकांनी ‘ilovesangamner.org’ या संकेतस्थळावर जाऊन लवकरच नोंदणी करावी आणि आपला सहभाग सुनिश्चित करावा, अशी माहिती प्रकल्प प्रमुख नचिकेत खोले यांनी दिली. यावेळी बोलतांना खोले म्हणाले की, आमदार सत्यजीत तांबे…

Read More

मेष (Aries): आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. खर्च आणि मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रातील कामांचा ताण जाणवेल, परंतु महत्त्वाच्या कामांमध्ये धैर्य ठेवल्यास यश मिळेल. अचानक येणारे धोके आणि घाईने घेतलेल्या निर्णयापासून दूर राहा. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ (Taurus): आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. आत्मविश्वास, वाढ आणि फायद्याचे योग आहेत, विशेषतः व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत. नवीन गुंतवणूक संधी मिळू शकतात. जुनी कामे पूर्ण होतील. भावना व्यक्त करण्यासाठी चांगला दिवस आहे. मिथुन (Gemini): कार्यक्षेत्रातील गोष्टी तुमच्या बाजूने राहतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. छोट्या व्यापाऱ्यांसाठी चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.…

Read More

संगमनेर: पोलीस ठाण्यातच बेकायदेशीर जमाव जमवून गोंधळ घालणे, पोलीस अंमलदाराच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि त्यांना अश्लील शिवीगाळ करणे, या गंभीर आरोपांखाली संगमनेर शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी सहा निष्पन्न आरोपींसह एकूण १२ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश लक्ष्मण हासे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झालेल्या सहा आरोपींमध्ये सागर बागे, सुरज बागे, ऋषी आव्हाड, सागर पगारे, मनोज पगारे आणि सनी धारणकर यांचा समावेश आहे. या सहा आरोपींव्यतिरिक्त अन्य ०६ अनोळखी व्यक्तींवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बुधवारी (२२ ऑक्टोबर) रात्री ८.०० वाजेपासून ते…

Read More