Author: अनंत पांगारकर
मुंबई, दि. ११ – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व प्रार्थनास्थळावर भोंगे वाजविण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे बंद असले पाहिजे. विनापरवानगी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भोंग्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच याबाबतीत असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाकडे विनंती करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. आमदार देवयानी फरांदे यांनी अनधिकृत भोंगे लावून ध्वनी प्रदूषणाबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य अतुल भातखळकर यांनी सहभाग घेतला. सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या भोंग्यांची परवानगी, नियमांच्या पालनाबाबत तपासणी करण्याची जबाबदारी…
संगमनेर दि. ११ मार्च – प्रतिनिधी सहकारासाठी दीपस्तंभ असलेल्या अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या १५ व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी (१४ मार्च) सकाळी ९ वाजता अमृतेश्वर मंदिराजवळील प्रेरणास्थळ येथे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत अभिवादन व पुष्पांजली कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली आहे. अगदी तरुण वयात स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेऊन ब्रिटिशांविरुद्ध लढा देणारे व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तालुक्यातील सर्वसामान्य व गोरगरीब माणसांच्या जीवनामध्ये सहकाराच्या माध्यमातून समृद्धी निर्माण करणारे स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जीवन कार्य हे पुढील पिढीसाठी सदैव प्रेरणादायी आहे. त्यांनी सहकारात आर्थिक शिस्त, पारदर्शकता, काटकसर…
संगमनेर, दि.११ मार्च – प्रतिनिधी शिवद्रोही राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर, सुधांशु त्रिवेदी, भगतसिंग कोशारी, अबू आझमी, मनोहर भिडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच बीड व परभणी जिल्ह्यातील संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कमी पडलेल्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा मागण्यांचे निवेदन मंगळवारी संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांना देण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेडच्यावतीने हे निवेदन देण्यात आले आहे. तहसीलदार, पोलीस निरीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवद्रोही असलेले वरील सर्व गुन्हेगार वारंवार स्वराज्य प्रेरिका जिजाऊ, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवराय, स्वराज्य रक्षक छत्रपती शंभुराजे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महामानव आंबेडकर आशा बहुजनांच्या…
संगमनेर – नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणार्या कारची त्याच लेनवरुन येणार्या आयशर टेम्पोशी समोरासमोर धडक झाली. या अपघातात प्राजक्ता गिरीश गिरमे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांचे पती आणि मुलगाही गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर डोळासणे महामार्ग पोलिसांनी टोल कर्मचार्यांच्या मदतीने अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केले. याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (दि ९) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास डोळासणे शिवारातील बांबळे वस्तीजवळ ही घटना घडली. सध्या सिन्नर ते खेड या नाशिक-पुणे महामार्ग कॉक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. साकूर फाट्यापासून पुण्याच्या दिशेने एकाच लेनवरुन दोन्ही बाजूची वाहतूक वळवण्यात आली आहे. रविवारी दुपारी गिरीश गिरमे (वय ३५) हे त्यांची पत्नी प्राजक्ता (वय…
संगमनेर, दि. ११ मार्च – प्रतिनिधी मार्च महिना असल्याने संगमनेर नगर परिषदेची वसुली मोहीम जोरात सुरू आहे. पालिकेने लावलेल्या जाचक शास्ती आणि दंडामुळे नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असून पालिकेच्या तिजोरीत मात्र कोट्यावधी रुपयांची भर पडणार आहे. शास्ती आणि दंडाच्या पठाणी वसुलीमुळे संगमनेरकर नागरिक हैराण झाले असून सत्ताधारी आणि विरोधकांनी या प्रश्न मौन बाळगले आहे. सत्ता बदल होऊनही संगमनेरकरांच्या पदरी निराशाच आली आहे. संगमनेर नगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात विनापरवाना बांधकामे करण्यात आली आहे. विनापरवाना करण्यात आलेल्या बांधकामांना संकलित कराच्या दोन पट शास्ती, दंड वसूल केला जात आहे. यामुळे छोटेसे घर बांधून राहणाऱ्या संगमनेरकरांना मात्र मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यातच पालिकेच्या…
विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठया गाजावाजात सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील नागरिकांना काय मिळणार? याकडं सर्वांचं लक्ष होतं. सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी या अर्थसंकल्पात ३६ हजार कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र, महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. यामुळे लाडक्या बहिणींची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो, केली विकासाची कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो.. पुन्हा आलो.. असे म्हणत लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्याचं अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना…
मुंबई, दि. १० मार्च “महाराष्ट्र आता थांबणार नाही..”राज्य सरकारचा वादा पूर्ण करणारा असा हा अर्थसंकल्प असल्याचे स्पष्ट करत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी व जनकल्याणासाठी आज सादर झालेला अर्थसंकल्प महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सोमवारी (१० मार्च) २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाबाबत खताळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सादर झालेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत करत खताळ म्हणाले, राज्याच्या गोरगरीब, शेतकरी, महिला तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी महायुती सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. हा अर्थसंकल्प राज्यातील ग्रामीण भागाचा विकास, शेतकरी कल्याण, महिला सशक्तिकरण, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत…
देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पसिद्धीला बळ देणारा अर्थसंकल्प अजित पवार यांच्याकडून सादर शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास क क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला, ‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प मुंबई, दि. 10 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या संकल्पपूर्तीला बळ देणारा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’ असे सांगत शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास…
अहिल्यानगर, दि. १० – प्रतिनिधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम.किसान) योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पीएम किसान लिस्ट एपीके किंवा पीएम किसान एपीके या संदेशाची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील रक्कम गायब होत आहे. शेतकऱ्यांनी वरील संदेशाची लिंक उघडू नये. तसेच अशी काही घटना घडल्यास अथवा आढळून आल्यास तात्काळ सायबर पोलीसांकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगर दि. १० मार्च – प्रतिनिधी राज्यात हायटेक ठरलेल्या संगमनेरच्या बसस्थानकामध्ये बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलामध्ये तीन टक्के कोठ्यातील दर्शनी भागातील बांधीव गाळे दिव्यांग तक्रारदारांना देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. सात ते आठ वर्षांपासून प्रदीर्घ लढा देणाऱ्या दिव्यांग बांधवांना यामुळे मोठे यश मिळाले आहे. संगमनेर बसस्थानकामध्ये बांधकाम ठेकेदार रामहरी कातोरे यांच्या मार्फत बांधा वापरा व हस्तांतरित करा (BOT) या तत्त्वावर व्यापारी संकुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बांधव क्षेत्रातील तीन टक्के गाळे हे दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित असल्याने त्यासाठी शिवाजी संभाजी खुळे यांच्यासह जालिंदर कचरू लहामगे, पुरुषोत्तम बिषणलाल जोशी, शिवाजी गवराम कासार, सुनील बाबुराव खरे…
