Author: अनंत पांगारकर

संगमनेर, दि. ९ मार्च – प्रतिनिधी  संगमनेर तालुक्यातील जागृत देवस्थान असलेल्या काकडवाडी येथील महालक्ष्मी माता मंदिरात जबरी चोरीची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी ५१ डोळे सोन्याच्या मुकुटासह २ किलो वजनाच्या चांदीच्या वस्तूंची चोरी केल्याचे समोर आले आहे. अज्ञात चोरट्याने धार्मिक स्थळावर मोठा डल्ला मारल्याने गुन्हेगारांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. चोरीच्या घटनेची माहिती समोर येताच संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह पोलीस घटनास्थळी तातडीने हजर झाले होते. दरम्यान चोरट्यांनी मंदिरातून केवळ सोन्या-चांदीचे दागिनेच चोरले नाही तर सुरक्षेसाठी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर (DVR) देखील चोरून नेला आहे. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.…

Read More

संगमनेर, दि. ९ मार्च – प्रतिनिधी शिवजयंती उत्सव आठवडाभरावर येऊन ठेपला असताना या उत्सवाच्या तयारीवरून संगमनेरात मोठे वादंग निर्माण झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये यावेळी वाद निर्माण झाला. दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस यंत्रणेकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नव्हती. घटनास्थळी संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी यांच्यासह पोलीस दल तसेच संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे पोहोचले होते. पोलिसांसमोरच काँग्रेस आणि शिवसेनेच्या दोन्ही गटात उत्सवावरून वाद सुरू होते. पोलिसांसह दोन्ही गट ठाण मांडून बसले आहेत. रविवारी पोलिसांनी प्रवेशद्वाराजवळ पोलीस व्हॅन…

Read More

राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात वादातील मंत्र्यांना आणि सत्ता समर्थकांना वाचवण्याची कसरत सुरू आहे. गैरवर्तणुकीचा जनठपका बसलेल्यांना सत्तेत सामील करून घेताना सारासार विचार न करणार्‍या मुख्यमंत्र्यांवर अशी वेळ याआधीही आली होती. तेव्हा फारकाळ न थांबता अशा मंत्र्यांना आणि सत्ता समर्थकांना वेळीच पायउतार व्हावं लागलं. सध्या त्यासाठी दिवसांवर दिवस आणि महिन्यांवर महिने घालवले जात आहेत. मंत्र्यांना वाचवण्याचा हा सिलसिला महाराष्ट्रासाठी घातक आहेच, पण देशभर गौरवल्या गेलेल्या राज्य विधिमंडळाच्या एकूणच परंपरेला छेद देणारा आहे. ज्यांना वाचवण्याची शिकस्त मुख्यमंत्र्यांना करावी लागत आहे ते सारे सत्ताधारी पक्षांशी संबंधित असल्याने युतीच्या सत्तेविषयी घृणा निर्माण होणं स्वाभाविक आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाने असंख्य चढ उतार पाहिले.…

Read More

संगमनेर, दि. ८ मार्च – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील कोंची गावच्या शिवारात असलेल्या वनक्षेत्राच्या जमिनीतून मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे मुरूमाची तस्करी होत असल्याचा प्रकार महसूलच्या कारवाईत समोर आला आहे. मुरूम उत्खनन करणारे काही वाहनांसह जण फरार झाले असले तरी एक डंपर आणि पोकलेन ताब्यात घेण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे. याप्रकरणी होणाऱ्या कारवाईकडे लक्ष लागले असून या परिसरातून हजारो ब्रास मुरूम चोरी झाल्याचा संशय आहे. शनिवारी दुपारी कोणत्याही कायद्याला न जुमानता बिनधास्तपणे मुरूम वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. नव्या सरकारच्या काळात राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातच बीड सारख्या जिल्ह्यात आका संस्कृती उदयास आली असून असे आका आता…

Read More

शनिवार, दि. ८ – प्रतिनिधी आम्‍ही माणसं जोडण्‍यासाठी आश्‍वी आणि परिसरात पाच पुल बांधून दाखविले आहेत. तोडण्‍याची भाषा आम्ही कधीही केली नाही, अपर तहसिल कार्यालय हे जनतेच्‍या सुविधेसाठी आहे. तुमच्‍या ‘यशोधनातून’ जनतेला मुक्‍तता हवी होती. विधानसभेला तालुक्‍यातील जनतेने परिवर्तन केले आहे. जनतेला मिळालेले स्‍वातंत्र्य आता तुम्‍ही हिरावून घेवू नका, असा खरमरीत टोला मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी थोरातांचे नाव न घेता लगावला. आश्‍वी बुद्रूक येथे प्रवरा मेडिकल ट्रस्‍टच्‍या आरोग्‍य केंद्राच्‍या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी विधानसभा निवडणूकीनंतर प्रथमच थोरातांचे नाव न घेता त्‍यांच्‍यावर टिकास्‍त्र सोडले. निमित्‍त होते अप्‍पर तहसिल कार्यालयाचे. हे कार्यालय आश्‍वी आणि पंचक्रोशीतील गावे तसेच अन्‍य शेजारील…

Read More

संगमनेर, दि. ८ मार्च – प्रतिनिधी राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठित असलेल्या आणि वर्षानुवर्ष अध्यक्ष राहिलेल्या, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भाऊसाहेब कुटे याने आर्थिक गैरव्यवहार करत वाट लावलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेला गैरव्यवहाराच्या दृष्टचक्रातून सावरण्यासाठी आता नव्या संचालकांची टीम मैदानात उतरली आहे. संस्थेच्या संचालक मंडळाचे निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. संगमनेरच्या सहकारातील अग्रगण्य असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत चेअरमन भाऊसाहेब कुटे याने संस्थेतील काही जणांना हाताशी धरत मोठा आर्थिक गैरव्यवहार केला. तब्बल ८१ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चेअरमन भाऊसाहेब कुटे, संस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह तब्बल २१ जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात लेखा परीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे. यातील मुख्य…

Read More

शनिवार, दिनांक ८ मार्च साहेबांशी बोलून मोजणी झालेल्या जमिनीच्या हद्दी खुणा दाखवून नकाशा काढून पूर्ण काम करून देण्याच्या मोबदल्यात चार लाख रुपये लाचेची मागणी करून साडेतीन लाख रुपये स्वीकारणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाला लाच लुचपतच्या पथकाने पकडले आहे. नितेंद्र काशिनाथ गाढे (वय ३५ वर्ष) असे साहेबांसाठी लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर शिपायाचे नाव आहे. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, पोलीस हवालदार पंकज पळशीकर, पोलीस हवालदार प्रमोद चव्हाणके यांनी ही कारवाई केली. तक्रारदारांच्या मावशीची दीक्षि (ता.निफाड) येथे शेतजमीन आहे. या जमिनीच्या मोजणीसाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय निफाड येथे २५ जानेवारी २०२५ रोजी अर्ज केला होता. तक्रारदारांनी वारंवार पाठपुरावा…

Read More

अहिल्यानगर, दि. ७ मार्च – प्रतिनिधी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या अहिल्या नगरच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार नवे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी आज स्वीकारला. प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना पदभार सोपवला. डॉ. आशिया हे २०१६ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. येथे रुजू होण्यापूर्वी ते यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी डॉ. आशिया जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त, नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. डॉ. आशिया यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातून झाली आहे. या सेवेत आल्यानंतर एक वर्ष परिविक्षाधीन कालावधीत आर्णी येथे नगरपरिषदेचे…

Read More

संगमनेर, दि. ७ मार्च – प्रतिनिधी सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेला संगमनेर व पारनेर तालुका हा पर्जन्य छायेतील तालुका आहे. तालुक्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अनेक दिवसांच्या कामांमधून तालुक्यात विकास साधला आहे. मुंबई–नाशिक-पुणे या गोल्डन ट्रँगलवर असलेल्या संगमनेर व पारनेर तालुक्यामध्ये नव्याने मोठी एमआयडीसी उभारावी, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे. मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार तांबे म्हणाले, अहिल्यानगर जिल्हा हा विस्ताराने मोठा आहे. संगमनेर व पारनेर तालुके हे दुष्काळी तालुके आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात मागील ३५-४० वर्षांमध्ये सततच्या विकास कामांमधून मोठे परिवर्तन झाले आहे. गावोगावी विकासाच्या योजना…

Read More

अहिल्यानगर, दि. ७ मार्च – महाराष्ट्र संवाद न्यूज  महसूलच्या पथकाने पकडलेले वाळू वाहतुकीचे दोन वाहने सोडवून देण्यासाठी दोन लाखाची लाच मागणाऱ्या पैठणच्या तहसीलदारासह महसूल सहाय्यक आणि एका खासगी व्यक्तीवर अहिल्यानगरच्या लाच लुचपत पथकाने कारवाई केली आहे. या तिघा लाचखोराविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाजगी इसम सलील करीम शेख (वय- ३८ वर्षे, व्यवसाय शेती, रा. लक्ष्मीनगर, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर), हरिष शिंदे (महसूल सहाय्यक, वर्ग ३, तहसिल कार्यालय पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि तहसीलदार सारंग भिकूसिंग चव्हाण, वय ४८ वर्ष, रा. ए विंग, फ्लॅट नंबर ३०५, द प्राईड इग्निमा, सुतगिरणी चौक, गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर) अशी तिघा…

Read More