Author: अनंत पांगारकर
मुंबई : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यात राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावरुनच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात २०१४ ते १९ दरम्यानचे फडणवीस सरकार असो वा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आत्ताचे भाजपा-युती सरकार असो, या सरकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. मलई खाण्याची स्पर्धाच तीन पक्षात सुरु असून केवळ एखादा मंत्री भ्रष्ट आहे असे नाही तर संपूर्ण भाजप युती सरकारच भ्रष्ट आहे, असं नाना पटोले यांनी केली. “भाजपा युती…
शिर्डी, दि. ०४ – पुरातन मंदिरे ही हिंदू धर्म आणि संस्कृतीची प्रतिके आहेत. विकासाची प्रक्रिया राबविताना आध्यात्मिक वारसा जोपासणे हे आपले कर्तव्य असून मंदिर परिसरांच्या विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राहाता शहराचे आराध्यदैवत श्री वीरभद्र महाराज मंदिराला ‘क’ वर्ग देवस्थानाचा दर्जा प्राप्त करुन दिल्याबद्दल पालकमंत्री विखे यांचा विश्वस्त मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच वीरभद्र महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, मुकुंदराव सदाफळ, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाणे, ॲड.रघुनाथ बोठे, उपाध्यक्ष सचिन बोठे, माजी नगराध्यक्ष…
संगमनेर दि. ०४ फेब्रुवारी – संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा फसवी ठरली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा निधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने पालकमंत्र्यांनी संगमनेरकरांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचे बोलले जात आहे. यावरून पालकमंत्री साहेब राजकारण करा पण संगमनेर तालुक्याच्या अस्मितेशी खेळू नका, छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता आहे. अशा शब्दात शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी आपली नाराजी जाहीर केली आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी जाहीर केलेल्या निधीचे काय झाले, तो निधी अद्याप का मिळाला नाही अशी विचारणा केली…
संगमनेर दि. ०४ फेब्रुवारी – राज्य शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर संगमनेरमध्ये दहा ई टॉयलेट व शहरातील जोर्वे नाक्यावर भव्य क्रीडांगण विकसित करण्यासाठी प्रत्येकी एक-एक कोटींचा निधी मंजूर झाल्याने ही कामे सुरू होत असल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. आमदार तांबे म्हणाले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरात विकासाच्या अनेक योजना सातत्याने राबविल्या गेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून संगमनेरला वैभवशाली संगमनेर शहराची ओळख मिळाली आहे. तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर स्वच्छतेसाठी नगर परिषदेला विविध पारितोषिक मिळाली आहे. शहरातील नागरिकांची वर्दळ लक्षात घेता शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची टॉयलेटची व्यवस्था व्हावी यासाठी १० ई टॉयलेटसाठी १ कोटीचा निधी,…
अनंत पांगारकर संगमनेर दि. ०४ फेब्रुवारी – संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी तत्कालीन व विद्यमान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १ एक कोटी रुपये देण्याची केलेली घोषणा खोटी ठरली आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या संबंधीचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरामुळे ही बाब उघड झाली. तांबे यांनी बैठकीत घोषणा केल्याप्रमाणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तातडीने एक कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली होती. मात्र जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी तांबे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, अश्वारूढ पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून असा निधी देता येत नाही त्यावर…
मुंबई दि. ०४ फेब्रुवारी – विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने निवडणुकीच्या काही महिने आधी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेची घोषणा करत या योजनेचा बहिणींना लाभ देणे सुरू केले होते. महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामागे या योजनेचं मोठ योगदान असल्याचं सांगितलं जातं. मात्र सत्तेमध्ये येतात महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेर पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत अनेक बोगस अर्ज आल्याचं आता सरकारला वाटत आहे. तशा तक्रारी प्राप्त झाल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा पडल्याचं सांगितलं जातं. तो कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली…
कोल्हार (ता. राहाता) येथे जनसेवा फाउंडेशनच्यावतीने संक्रांतीनिमित्त खास महिलांसाठी भव्य हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व धनश्री विखे यांचा सहपत्नीक ग्लॅमरस रॅम्प वॉक, ज्याने उपस्थितांना विशेष आनंद दिला. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महिला सक्षमीकरण विषयक चर्चा तसेच पारंपरिक पोशाखातील रॅम्प वॉकने कार्यक्रमात रंगत आणली. डॉ. विखे पाटील दांपत्याने उपस्थित महिलांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देत महिलांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि महिला सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले.
अहिल्यानगर दि. ०४ – जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जाहीर केल्याप्रमाणे पुतळ्यासाठी तातडीने एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी तांबे यांनी समितीच्या बैठकीत केली असता जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी समितीच्या माध्यमातून अशा प्रकारचा निधी देता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान या संदर्भात काय उपाययोजना करता येऊ शकते यासाठी सरकारकडे देखील मार्गदर्शन मागविल्याची माहिती त्यांनी दिली आहे. संगमनेर मध्ये बस स्थानकाच्या जागेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय सध्या राजकारणात अडकल्याचे दिसत आहे. नुकत्याच पालकमंत्री राधाकृष्ण…
मुंबई, दि.३ : राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ उभी करण्यात आली आहे. महायुती सरकार जुन्या प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभालीकरीता नवीन धोरण आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मृद व जलसंधारण विभाग आणि संबंधित विविध संस्था आणि संघटना यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, सचिव गणेश पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव अश्विनी भिडे, नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, टाटा मोटर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी जुने आणि अर्धवट राहिलेले जलसंधारणाचे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याची योजना मांडली आहे.…
मुंबई, दि. ०३ : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’चा) वापर अनिवार्य आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. राज्यातील कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल (दूरदृष्यप्रणालीद्वारे), सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अखिल…
